तुम्ही कधी साजरा केलाय “Husband Day” अर्थात पती कौतुक दिवस? यावर्षी साजरा करा अनोख्या पद्‌धतीनं

Husband Day

सोशल मिडीयावर, पूर्वीच्या काळी कसं सहजीवन होते या बद्दल खूप वाचायला मिळतं.

आज आपण बघतो की ब-याच जोडप्यांमध्ये ताणतणाव असतात.

मात्र नवरा बायकोचे नातं फार युनिक आहे, ते ज्यांनी स्वीकारलय त्यांनाच या नात्याची किंमत कळते.

‘व्हँलेंटाईन डे’ तुम्हाला माहित असेल, ‘महिला दिन’ कधी साजरा करतात हे माहीत असेल पण ‘Husband Appreciation Day’ / “पती कौतुक दिन” बद्दल तुम्हांला माहीती आहे का?

Husband Appreciation Day कधी आणि का साजरा करतात?

खरं तर फार पुर्वी नवरा या प्राण्याची दहशतच फार असायची. चार चौघात नवऱ्याचं  नावही घेण्याची मुभा स्त्रियांना नव्हती.

नव-याच्या तालात, शिस्तीत बायकांना धावावं लागायचं.

पती, पत्नी ही संसार रथाची दोन चाकं आहेत, वगैरे विचार तुम्ही वाचले, ऐकले असतील.

अगदी मोजक्या महिलांना पुरूषांची मदत मिळायची….

पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना पती गोपाळरावांची उत्तम साथ मिळाली, सावित्रीबाईंना ज्योतीरावांनी शिकवलं.

मोजकी उदाहरणं वगळता इतिहासात महिलांना नव-याकडून मदत मिळण्याची शक्यता कमीच होती.

पण हळूहळू परिस्थिती बदलत होती. महिला शिकल्या, नोकरी करायला लागल्या.

या महिलांच्या धावपळीत आता नव-याची साथ मिळायला लागली.

आजच्या छोट्याशा कुटुंबात स्त्रीला गगनाला गवसणी घालण्यासाठी नवऱ्याकडून खूप प्रोत्साहन, पाठिंबा आणि मदत मिळते.

ऑफीसमध्ये निश्चिंतपणे जाणे, प्रमोशन स्वीकारणे स्त्रीला आज सहज शक्य आहे.

घरी आल्यावर घरकामात मदत करायला ही नवरा तत्पर असतो.

तो साजरा केला जातो 16 एप्रिलला. ‘Husband Appreciation Day’ म्हणजेच “पती कौतुक दिन”. आता व्हॅलेंटाईन डे प्रमाणेच हेही फॅड आलं आहे पाश्चात्त्य देशांतुन, पण काय हरकत आहे चांगल्या गोष्टी जवळ करायला. एकमेकांप्रती कृतज्ञता दाखवणं हे संबंध मजबूत करण्यासाठी गरजेचं आहेच कि…

पुर्वीच्या काळाप्रमाणे आजही पुरुष कुटुंबाची काळजी घेतात, पण आता घराची आणि मुलांची जबाबदारी ही ते आनंदाने स्वीकारतात.

किचनमध्ये स्वयंपाक करणं आता नवरे लोकांना कमीपणाचं वाटत नाही.

हा सहज सुंदर बदल झाल्याबद्दल या नात्याचं कौतुक करायला हवं ना!!

करिअर आणि घर सांभाळताना पतीची मोलाची मदत किती महत्त्वाची आहे हे त्याला बायको म्हणून तुम्हीच सांगायला हवं….

या दिवसामागील इतिहास 

जगाच्या सुरुवातीपासूनच पती आणि पत्नीच्या नात्याची सुरुवात झालेली असेल.

त्यात काळानुरूप प्रचंड बदल घडतो आहे.

वेगवेगळ्या प्रकारचे दिवस आज आपण साजरे करतो.

पुरुष दिवस पण साजरा होतोच पण Husband Appreciation Day किंवा “नवरा दिवस” ही कल्पना कोणाला? आणि कशी सुचली असेल?

हा दिवस नक्की कधी सुरू झाला हे सांगता येत नाही.

ज्यांनं सुरुवात केली त्या वीराचं किंवा कदाचित एखादी स्त्री असेल तर तिचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे.

आज पर्यंत एखादा अपवाद वगळता सगळयाच संस्कृतीमध्ये नवऱ्यानंच कुटुंबाच्या पालनपोषणासाठी आर्थिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे हा अलिखित नियम होता.

मात्र “की अँन्ड का” या चित्रपटातल्यासारखा हाऊस हजबंड ही संकल्पना रुजवायला आता फार दिवस उरले नाहीत.

त्याआधी दोघांनी कमावणं ही संकल्पना सर्वदूर पोहोचली आहे.

पण त्याच वेळेला लहान बाळाची, घराची काळजी घेणं ही फक्त स्त्रियांची जबाबदारी होती.

पुरुष कठोर होता कणखर होता पण आता चित्र बदलतं आहे…

हळवा पुरुष आर्थिक भार उचलताना ही बाळासाठी रात्री जागरण करतो, बाळाचे डायपर बदलतो.

मुलगाच हवा हा त्याचा अट्टाहास नसतो.

आपल्या छोट्या परिचा तो सुपरहिरो ही असतो.

बायकोसाठी आणि मुलांसाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ असतो.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोडीदाराविषयी खूप प्रेम असतं आणि भक्कम पाठिंबा ही तो देतो हे सगळ्यात महत्त्वाचं.

या सगळ्या गोष्टींसाठी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन Husband Appreciation Day साजरा केला जातो.

या वर्षी तुम्ही ही हा दिवस साजरा करा.

कशा पद्धतीने साजरा कराल?

हा दिवस दोघांनी मिळून एकत्र साजरा करा किंवा गृपनं साजरा करा, कृतज्ञता व्यक्त करणं महत्वाचं.

अर्थात तुमच्या नवऱ्याला सगळ्यांसोबत धमाल करणं आवडतं, की शांतपणे दोघांचा सहवास आवडतो, की एकटेपणाने आपल्या आपल्या कामात गुंतून जाणं आवडतं हे तर तुम्हीच जास्त चांगल्या पद्धतीने जाणता.

त्यानुसार तुम्ही सेलिब्रेशनची पद्धत ठरवू शकता.

नवऱ्याला एक दिवसाची सुट्टी द्या.

ऑफिसच्या कामातून मिळणाऱ्या सुट्टी बरोबरच तुमच्या नवऱ्याला रोजच्या कामातल्या मदतीलाही सुट्टी द्या.

एक दिवस त्याला काय करावसं वाटतं ते करू द्या.

आनंदाने त्याच्या छोट्या छोट्या ट्रिपसाठी, खेळासाठी, संगीतासाठी प्रोत्साहन द्या, मोकळीक द्या.

प्रेमाची भाषा शिका

“सिखो ना नैंनो की भाषा पिया” अशी आर्जवं करणारी स्त्रियांच्या दृष्टिकोनातून असंख्य गाणी तुम्हाला माहिती असतील.

पण नवऱ्याच्या दृष्टिकोनातून एखादं प्रेमाचं गाणं, एखादी प्रेमाची पद्धत तुम्हाला माहिती आहे का?

असल्यास उत्तमच. नसल्यास यावर्षी ती शिकण्याचा प्रयत्न करा.

तुमचं प्रेम व्यक्त करण्याची ती उत्तम पद्धत ठरेल.

तुम्हाला तुमच्या नवरा विषयी काय वाटतं ते सांगण्याची ही एक उत्तम संधी आहे.

प्रत्येकाची प्रेमाची तऱ्हा वेगळी असते ती समजून घेणे गरजेच असतचं. नाही का?

“माझं तुझ्यावर प्रेम आहे” हे फक्त शब्दांतून व्यक्त होते असं नाही तर छोट्याशा कृतीतून स्पर्शातूनही ते व्यक्त होत असतं.

म्हणूनच वैयक्तिक आवड बाजूला ठेवून नव-याला आवडणाऱ्या गोष्टीतही थोडासा रस कधीतरी घ्यायला काय हरकत आहे ?

कारण त्यातूनच मग मखमली आठवणींचा खजिना तयार होतो.

छोटी-छोटी सरप्राइजेस नवरा-बायकोच्या नात्याला फुलायला वाव देतात.

एखादा पुरुष कुटुंबाच्या भल्यासाठी कित्येक वेळा स्वतःची आवड बाजूला ठेवतो.

आर्थिक तडजोड करताना आपल्या छंदाला तिलांजली देतो.

ती आवड, तो छंद पूर्ण करण्याचा मार्ग त्याला मिळवून द्या.

संगीताची, पेंटिंगची किंवा कुठल्याही छंदाची खेळाची आवड पूर्ण करण्यासाठी एखादया वाद्याची, रंगाची भेट तुम्ही नवऱ्याला देऊ शकता.

काहीह प्लॅन करताना तुमचं प्रेम व्यक्त होतंय ना? याकडे मात्र लक्ष ठेवा.

आणि मैत्रिणींनो तुम्ही तुमच्या नवऱ्याला पक्कं ओळखून असता, त्यामुळे खरंच तुम्ही त्याच्या साठी एक सुंदर दिवस खूप छान पद्धतीने प्लॅन करु शकता.

पण हो ! हो ! आमचा नवरा रसिक नाही, हळवा नाही, अशा तक्रारी करण्याआधी जरा थांबा!

विचार करा. पूर्वीच्या वातावरणात आणि आताच्या वातावरणात फरक जाणवतो तसा तुमच्या नवऱ्याच्या स्वभावातही फरक झालेला असेल.

आज तोच धागा पकडून “हजबंड ॲप्रिसिएशन डे” म्हणजेच “पती कौतुक दिन” साजरा करा.

कदाचित तुम्हांलाच यामध्ये एखाद Pleasant Surprise मिळेल!

कशा पद्धतीने तुम्ही हा “हजबंड ॲप्रिसिएशन डे” साजरा केला आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका!! किंवा कमेंट मध्येच तुमच्या नवऱ्याला टॅग करून तुमच्या मनातलं बोला… नाहीतर तुमच्या पत्नीला टॅग करून आठवण द्या…

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!