वाया गेलाय तो….

vaya-gela-to

धर्म, रूढी, परंपरांच्या प्रतिप्रश्न करू लागलाय तो,
अनिष्ठ प्रथांच्या नियमांवर बोट ठेऊ लागलाय तो,
कर्मकांडांपेक्षा स्वत:च्या बुद्धीचा वापर करू लागलाय तो,
पण लोकं म्हणत आहेत,
वाया गेलाय तो…!!

स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी धडपडत आहे तो,
मरगळलेल्या वाटांवरती न जाता,
नव्या ऊमेदीचा रस्ता तयार करत आहे तो,
नियतिचे चटके सहन करत,
जिव्हाळ्याची सावली शोधत आहे तो,
कारण… वाया गेलाय तो…!!

अन्यायाविरूद्ध कायम वाचा फोडत राहणार तो,
शाहण्यांसारखे मूग गिळून गप्प बसणाऱ्यातला नाही तो,
ह्रुदयात माणुसकी ठेवून ताठ मानेने जगणारा आहे तो,
कारण… वाया गेलाय ना तो…!!

आता कोणत्याही गोष्टीची तमा नाही,
चुकला तरी हरकत नाही,
जिंकला तर आनंदात सहभागी होणाऱ्यांची कमी नाही,
मागे न पाहता पुढे – पुढे वाटचाल करत राहणार तो

कारण…. वाया गेलाय तो…!!!

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!