या २० गोष्टी करा, आणि छोटे बदल करून मोठे बदल घडवण्याचं सामर्थ्य मिळवा

एक पाऊल यशाकडे! एक प्रेरणादायी कथा

आयुष्य थिजल्यासारखं, थांबल्यासारखं वाटत असेल तर, या २० गोष्टींवरती लक्ष केंद्रित करा आणि बघा तुमच्या जगण्याची गाडी कशी सुसाट धावायला सुरू होईल!!

प्रत्येकाला प्रगती तर आवडते त्यात कधी कधी स्पीड ब्रेकर ही येतात….

मग वाटतं, संपलं सगळं!!!

पण मित्रांनो हीच वेळ असते पुन्हा एकदा स्वतःवरती काम करण्याची.

किंवा कधी कधी असंही होतं, रोजची ठरलेली कामं करून कंटाळा येतो, जगणं निरस वाटायला लागतं. काहीतरी बदल पाहिजे असं वाटायला लागतं….

आयुष्यात बदल करणं सोपं नसतं… पण तुम्हाला माहीत आहे का, काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही केल्या तर मोठे बदल घडवण्याचं सामर्थ्य आपोआपच तुमच्यात येईल.

पण कुठून सुरुवात करावी?

त्यासाठी आम्ही काही टिप्स घेऊन आलेलो आहोत.

त्या वाचा आणि करा पुन्हा नव्याने सुरुवात!!!

१) अखंडीत वाचीत जावे

हळूहळू पुस्तक वाचन अडगळीत जात आहे असं तुम्हाला वाटतंय का?

यशस्वी माणसांचा संघर्ष वाचा त्यांच्या दिनक्रमात पुस्तक वाचन असतंच.

आज पुस्तका शिवायही वाचण्याचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही वाचन करू शकता.

कधी कुठे वाट बघण्याची वेळ आली तर या काळात सुद्धा अगदी मोबाईलवरही तुम्ही वाचन करू शकता.

मात्र रोज वाचाच.

आत्मविश्वास निर्माण करणारी आणि रोजच्या जीवनात नाविन्य दाखवणारी नवीन भाषा शिकताना तुम्ही बऱ्याच गोष्टी सुद्धा शिकाल

तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये वेगळी भाषा येते हा पैलु, ॲड होईल.

३) न जमणारी एक गोष्ट करण्याचा ध्यास ठेवा

मित्रांनो, आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात ना, ज्या आपल्याला कधीच जमणारच नाही असं तुम्हाला खात्रीने वाटंत असतं.

तर अशी एखादी गोष्ट निवडा आणि ती शिकायची असं ठरवा.

शिकता शिकता तुमच्या प्रगतीची गाडी सुसाट जाईल हे तुम्ही नक्की अनुभवू शकता.

तर यासाठी कमेंट मध्ये सांगा अशी कोणती गोष्ट आहे, जी तुम्हाला बरेच प्रयत्न करून जमली नाही, म्हणून तुम्ही सोडून दिली आणि आता ती करण्याचं तुम्ही ठरवणार आहात.

४) प्रेरणादायी जागा तयार करा

तुमच्या घरात एखादी रूम किंवा एखादा कोपरा असा तयार करा जिथे शांतता असेल. जिथे कोणत्याही पसारा नसेल.

नवा रंग, नवं फर्निचर किंवा आहे त्याच फर्निचरची मांडणी करा आणि एक जागा तयार करा, जिथे कायम शांत, प्रेरणादायक वाटेल.

५) भीतीला दुर सारा.

अनिश्‍चिततेची भिती सगळ्यांच्याच मनावर कायम असते.

मात्र कुठल्याही प्रकारची भीती ही तुम्हाला पाऊल पुढे टाकायला थांबवते.

त्यामुळे त्या भीतीला दूर करण्याचा उपाय शोधा कारण भीती प्रगतीला खीळ घालते.

भीतीवर मात करायला तुमचं तुम्हीच शिकायला हवं.

त्याच्यासाठी तुम्ही तज्ञांची मदत ही घेऊ शकता.

६) कौशल्य वाढवा

एकदा नोकरी मिळाली की आहे तिथून, पुढे आहे तेच चालू ठेवण्यापेक्षा नवनवीन कौशल्य शिकून पुढे जाण्याचा प्रयत्न करा.

बिजनेस सेट झाला म्हणून थांबू नका तर नव्या कौशल्यानं नवी उंची गाठावी.

७) सकाळी लवकर उठा

प्रगती करण्यासाठी कुठे अडकून पडल्याची भावना तुमच्या मनात असेल तर यातून बाहेर पडण्यासाठी पटकन एक काम करा सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्या.

सगळे उठायच्या आधीच जर तुम्ही उठला तर तुमच्याकडे इतरांपेक्षा जास्त वेळ असेल.

सकाळची ताजी हवा, स्वच्छ सूर्यप्रकाश तुम्हाला अधिक कार्यक्षम करायला मदत करेल.

८) नियमित व्यायाम करा

आठवड्याभरात किमान ५ दिवस तरी नियमित व्यायाम केला ना तुमचं शरीर सुदृढ होईल आणि त्यामुळे मनही उत्साहित होईल.

वेगवेगळ्या व्यायाम प्रकारांचं एक वेळापत्रक आखून घ्या

९) स्वतःला पत्र लिहा

पत्र लिहा पण हे पत्र तुम्ही तुम्हालाच लिहायचं आहे.

आणि हे पत्र पाच वर्षानंतर तुम्ही कुठे असाल त्याची कल्पना करून लिहायचं आहे

त्यात तुम्हाला जे जे हवं त्याचं डिटेलिंग करा पत्र पाकीटबंद करा.

दीड वर्षांनी ते पाकीट फोडा आणि तुमचा प्रवास योग्य दिशेने सुरू आहे ना याची खात्री करा.

१०) तुमचा कम्फर्ट झोन सोडा

खरी प्रगती कठोर परिश्रमाने होते,

त्यामुळे ज्या प्रकारच्या वातावरणात तुम्ही रिलॅक्स असता त्या विरुद्धच्या वातावरणात जाऊन तिथं ऍडजेस्ट होण्याचा प्रयत्न करा.

११) एखाद्या गोष्टीचं आव्हान स्वीकारा.

निकोप स्पर्धाच तुम्हाला यशाच्या मार्गावर नेऊ शकते.

या स्पर्धेसाठी स्वतःला आव्हान द्या.

त्यात वजन कमी करणे असेल, नियमित व्यायाम करणे असेल, किंवा आर्थिक घडी बसवणं असेल.

अशा गोष्टींसाठी तुमचं तुम्ही स्वतःला आव्हान द्या आणि ते स्वीकारून कामाला लागा.

१२) अदृश्य कडी शोधा

आयुष्यात धावताना काही गोष्टी नजरेआड राहतात त्यामुळे प्रगतीचा वेग मंदावतो.

हा अदृश्य भाग कोणता? आयुष्याच्या साखळीतले ही अदृश्य कडी कोणती? कोणती गोष्ट आपल्याला फारशी महत्त्वाची वाटली नाही? कोणती गोष्ट तुमच्या प्रगतीत अडथळा बनते याचा मुद्दामून शोध घ्या.

१३) अभिप्राय

आयुष्यातला अदृश्य भाग, अदृश्य कडी सोडण्यासाठी अभिप्रायाची मोठी मदत होईल.

तुमच्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना सहकाऱ्यांना एका विशिष्ट टप्प्याविषयी अभिप्राय किंवा मत नोंदवायला सांगा.

यातून बऱ्याच सुधारणा तुम्हांला करता येतील.

१४) कृती करा

फक्त विचार करून नशीब बदलत नाही तर त्याला कृतीची जोड द्यावीच लागते.

कृतीसाठी उचलेलं एक पाऊलही यशाचा प्रवास सोपा करायला मदत करेल.

त्यामुळे ठाम निश्चय करा आणि करून पहा एखादी गोष्ट धाडसाने

१५) तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या लोकांकडून धडा घ्या

ज्यांची प्रगती ज्यांचे विचार तुम्हाला प्रेरणा देतात, अशा लोकांकडून जीवन जगण्याचे धडे गिरवा.

त्यांच्यामध्ये असे कोणते गुण आहे जे त्यांना वेगळं बनवतात ते शोधा आणि त्या गुणांना तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.

१६) चुकीच्या सवयी सोडा.

कोणताही माणूस परिपूर्ण नसतो. प्रत्येकाकडे काही ना काही तरी दुर्गुण किंवा वाईट सवयी असू शकतात.

त्या वेळेत ओळखा. जसं की जास्त झोप, एखाद्याला वेळीच नकार न देता येणं किंवा एखादा व्यसन.

तर या वाईट गोष्टींना वेळीच राम राम म्हणा.

१७) मित्रांकडुन शिका

प्रत्येक माणसाचं एक वैशिष्ट्य असतं. प्रत्येकाकडे काही ना काही गुण असतात.

त्या गुणांना समजून घ्या आणि ते शिकण्याचा प्रयत्न करा.

१८) बुद्धिबळ शिका.

रणनीती शिकण्यासाठी आणि मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी बुद्धीबळा सारखा दुसरा खेळ नाही.

बुद्धिबळातून फक्त मनोरंजन होत नाही तर त्यात तुम्हाला विश्लेषण करायला शिकता येत.

१९) सभोवतालच्या लोकांशी स्नेहाने वागा.

स्नेहपूर्ण वागण्यामुळे तुमच्यात करुणा, सहनशीलता आणि प्रेम हे गुण विकसित होतात.

तुमचे इतरांशी स्नेहपूर्ण संबंध असतील तर तुम्ही आशावादी व्हाल आणि कृतज्ञता अनुभवाल.

२०) विश्रांती घ्या.

तुम्ही स्वतःला कामाला जुंपून घेतलं असेल, एकच एक काम करत असाल तरीही तुम्ही थकून निराश होऊ शकता.

प्रगतीसाठी विश्रांती घेणं फार गरजेचं असतं.

पेट्रोल भरल्या शिवाय कार कशी चालणार? आणि हे पेट्रोल भरायला तरी थांबायला हवं ना?

तसं तुमची ऊर्जा विकसित करायला विश्रांती घ्या किंवा कामात बदल करा.

तर मित्रांनो, स्वतःत बदल घडवण्यासाठी कुठून सुरुवात करायची याचा विचार करत न बसता या टीप्‍स वाचल्यावर तुम्ही लगेच कामाला लागणार याची खात्री आम्हाला आहेच.!

तर तुमच्या या नव्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा !

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

2 Responses

  1. N.B.JIRWANKAR says:

    kharch chhan lihiile tumhi, khar tar tumhi sangitlele pretkalach kalate pn saglyanch walte as nahi. pn kharch aajchya dhavatya jivnamadhe varil ghostich anukaran karan titkch imp aahe jitak ki swahtachi athrik drustya growth…!!

    • नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.

      मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

      #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇

      व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

      https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE

      टेलिग्राम चॅनल👇

      https://t.me/manachetalksdotcom

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!