मानसिक स्वस्थतेसाठी निरोगी वातावरण तयार करा या ७ उपायांनी

marathi-prernadayi-vichar

मानसिक आरोग्य ही जागतिक स्तरावरची एक गंभीर समस्या आहे.

बऱ्याच लोकांना, त्यांना मानसिक समस्येने ग्रासलेलं आहे हेच माहिती नसतं.

आला दिवस पुढे ढकलत ते जगत असतात.

पण त्यांना पावलोपावली समस्यांना तोंड द्यावं लागतं.

या समस्या कामाच्या ठिकाणी, घरी लोकांशी संवाद साधताना, मनावर येणार्‍या ताणामुळे निर्माण होतात.

एका संशोधनात असं समोर आलेलं आहे की, मानसिक आरोग्याच्या तक्रारीमुळे होणारे मृत्यू, हे जगभरातील एकूण मृत्यूच्या 14 % इतके असतात.

मानसिक दृष्ट्या सक्षम असलेल्यांचा मृत्युदर 2.21% ने कमी असल्याचे अभ्यासात लक्षात आलेले आहे.

प्रौढ व्यक्तींपैकी 30 % लोकांना जीवनात कधी ना कधी मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवलेल्या असतातच.

आर्थिक उत्पन्न कमी असलेल्यांचा यात जास्त प्रमाणात समावेश होतो.

मानसिक आरोग्यावर नियंत्रण नसेल तर आ-त्मह-त्येचे विचार मनात यायला लागतात, त्यामुळे जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात मृत्यू होताना दिसून येतात.

मानसिक आरोग्य जपणं हे एक आव्हान आहे, ते पेलावंच लागतं.

तुमची मानसिक स्थिती उत्तम राहण्यासाठी आजूबाजूला निरोगी वातावरण निर्माण केलं पाहिजे.

या ७ उपायांनी तुम्ही सकारात्मक वातावरण निर्मिती करू शकता.

१) दुपारी एक डुलकी घ्या.

रोजच्या धावपळीच्या आयुष्यात पुरेशी झोप घेणं गरजेचे असतं.

प्रौढ व्यक्तीला किमान ७ तास झोप हवी असते असं म्हटलं जातं, पण काही वेळेला ही झोप ही पुरेशी ठरत नाही.

यापेक्षा जास्त झोप घेतली तर शरीरात आळस भरेल आणि रात्री लवकर झोप लागणार नाही.

दुपारची डुलकी घेतानाही आजूबाजूचं वातावरण शांत आणि प्रसन्न असावं.

या छोट्याशा डुलकीनं तुम्हाला तरतरी येईल मन मोकळं होईल आणि कामावरती चांगला परिणाम दिसून येईल.

दुपारच्या झोपेचे फायदे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्ही दुपारची झोप घेता का? जाणून घ्या ही वामकुक्षी चांगली की वाईट

२) तुमच्या छंदाला वेळ द्या.

छंदा मुळे तुमचं मन गुंतलेलं राहतं आणि नकारात्मक गोष्टींपासून दूर पळतं.

तुमच्या आवडत्या छंदासाठी दिवसभरात थोडा तरी वेळ राखून ठेवा, ज्यामुळे तुमचा स्वतःशी संवाद घडेल.

तुमचा छंद तुम्हांला उत्साही ठेवेल आणि क्षणार्धात तुमच्या मनातील ताण तणाव दूर करेल.

ज्यामध्ये मन गुंतून राहील असे छंद महत्त्वाचे ठरतात, कारण ते तुमचं मन सक्रिय करतात.

सक्रिय मन ठामपणे निर्णय घ्यायला सक्षम असतं.

शिल्पकला, लेखन, व्यायाम, वाचन, बुद्धिबळ अशा छंदांमुळे मनाला व्यायाम घडतो.

मित्रांनो आणि मैत्रीणींनो तुम्हाला तुमचा छंद नीट आठवतोय ना? आणि त्यासाठी वेळ काढता ना?

३) मानसिक आरोग्याविषयी स्वतःच्या मनाला प्रशिक्षित करा.

तुमचं मानसिक आरोग्य नीट राखण्यासाठी योग्य प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.

या प्रशिक्षणामुळे तुमचा इतरांशी आणि प्रतिकूल परिस्थितीशी घडणारा साद-प्रतिसाद तुम्हाला ओळखता येतो.

प्रतिसादाचा तुमच्या मानसिक आरोग्यावरती कसा प्रभाव पडतो? त्याला कशा पद्धतीनं सामोरं जावं? त्यातून मार्ग कसा काढावा? हेही तुम्हाला या प्रशिक्षणामुळे लक्षात येतं.

तुमची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन थेरपीची ही मदत तुम्हाला घेता येईल. मनाचेTalks वरील लेख तर यासाठी आवर्जून वाचत जा…

स्वतःला नीट ओळखा आणि सुधारणा करण्याचा प्रयत्न करा.

मानसिक स्थिती सुधारण्यासाठी उत्सुक असणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत असतात त्यांची ही आवर्जून मदत घ्या.

४) तुमचं घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवा.

तुमचं घर ही तुमच्या विश्रांतीची हक्काची जागा आहे.

ते जितके स्वच्छ नीटनेटकं असेल तितकं तुमचं मन प्रफुल्लित आणि ताणरहित असेल.

दिवसभराच्या थकावटीनंतर घरातला पसारा पाहून तुम्हाला जास्त ताण येतो.

त्यामुळे एकतर घर नेहमी नीटनेटकं व्यवस्थित ठेवा किंवा बऱ्याच गोष्टींना बंद कपाटा मागे दडवून ठेवा.

त्यामुळे दमलेल्या तनामनावर पसार्‍याचा ताण येणार नाही.

नुसत्या काही सवयी लावून तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकता का?

५) निसर्गाशी संवाद साधा.

तुम्ही जर सतत घरातच वावरत असाल तर ते दिवस कंटाळवाणी होतील.

तुम्ही चिडचिडे व्हाल.

घराबाहेरच्या मोकळ्या हवेची झुळूक अनुभवा.

नैसर्गिक गोष्टींच्या थेट संपर्कात जा.

एखाद्या बागेत थोडा वेळ गेलात तरी मन प्रसन्न होईल.

कारंज्याच्या तुषारांनी हलकं वाटेल. मोकळं आभाळ मनावरचं दडपण कमी करेल.

अशा वातावरणात तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचा सूर गवसेल, आणि मानसिक आरोग्य सुधारायला मदत होईल.

एखादी छोटीशी पिकनिक ही रोजच्या वातावरणात बदल घडवून तुम्हाला ताजतवानं करेल.

निसर्ग तुम्हाला आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी नेहमी मदत करतो.

६) संतुलित आहार.

योग्य सकस, पौष्टिक आहार हा फक्त शरीरावरच प्रभाव टाकत नाही तर तुमच्या मानसिक आरोग्यावरही मोठा प्रभाव टाकतो.

हिरव्यागार भाज्या, ताजी फळं आणि पौष्टिक पेज/सूप मनावरचा ताण तणाव दूर करायला मदत करतात, मानसिकदृष्ट्या तुम्हाला सुदृढ करतात.

७) समाजात मिसळा.

माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो एकटा जगू शकत नाही.

जास्तीत जास्त लोक हे जगण्यासाठी, अडथळ्यांवर मात करण्यासाठी, आनंद साजरा करण्यासाठी, दुःख विसरण्यासाठी माणूस दुसऱ्या व्यक्तीवरती अवलंबून असतो.

त्यामुळे तुमच्या वयाचे, तुमच्या आवडी-निवडीशी जोडले जाऊ शकणारे मित्र-मैत्रिणी शोधा.

त्यांच्यासमोर व्यक्त व्हा त्यांच्याबरोबर वेळ घालवा, स्वतःची नव्याने ओळख करून घ्या,

आणि आनंद लुटायचा प्रयत्न करा.

समाजात वेगवेगळ्या प्रसंगी मिसळून गेलात तर तुमच्या मनावरचा ताण हळूहळू कमी होतो मानसिक आरोग्य झपाट्याने सुधारत.

मित्रांनो शेवटी एक गोष्ट नक्की लक्षात घ्या आयुष्य उपभोगण्यासाठी कोणतंही ध्येय गाठण्यासाठी मानसिक आरोग्य हे उत्तमच हवं.

तुमच्या आजूबाजूचं वातावरण, तुमच्या आसपासची माणसं सकारात्मक असतील याची तुम्ही स्वतः काळजी घ्यायला हवी.

आव्हानांना कधीच घाबरून जाऊ नका तर त्यांच्याशी लढायला शिका. आपलं मानसिक आरोग्य सुदृढ करून आयुष्य भरभरून जगायला शिका.

तुमचं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही काय करता? कोणता छंद जोपासता? आम्हांला नक्की कळवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!