डोळ्यांचा (चष्म्याचा) नंबर कमी करण्यासाठी १५ आयुर्वेदिक उपाय

How To Remove Specs permanently in marathi

शरीर हीच आपली खरी संपत्ती आहे. आपले शरीर ठीक तरच आपण ठीक. त्यामुळे देवाने दिलेल्या या संपत्तीची नीट काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे.

त्यासाठी आपला आहार, खाण्यापिण्याच्या सवयी, राहणीमान या सगळ्यांचा आपण नीट समतोल राखला पाहिजे जेणेकरून आपले शरीर स्वस्थ राहील आणि अर्थातच आपणही छान राहू.

तसेतर आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव हा खूपच महत्त्वाचा आणि नाजूक आहे. पण त्यातल्या त्यात महत्त्वाचा आणि नाजूक एक अवयव म्हणजे आपले डोळे.

डोळे नीट असतील तरच आपण हे जग नीट पाहू शकतो. कल्पना करा की थोडा वेळ आपले डोळे बंद करून आपल्याला एखादे काम करायला सांगितले आहे किंवा डोळ्यांवर पट्टी बांधून बसवले आहे तर…..

अवघड आहे ना डोळ्यांशिवाय काहीही करण्याची कल्पना करणे?? पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सतत तासनतास काम करणे, अपुरी झोप किंवा मोबाईल आणि कॉम्पुटर किंवा लॅपटॉपचा होणारा वापर यांचा परिणाम आपल्या डोळ्यांवर झाल्याशिवाय राहणार नाही.

परिणामी खूप लहान वयात चष्मा लागत आहे. ही समस्या आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच भेडसावत आहे. पण आयुर्वेदात असे काही खात्रीशीर उपाय आहेत ज्यामुळे आपल्या दृष्टीत स्पष्टता आणून चष्म्याचा नंबर कमी करता येऊ शकतो.

बघुया डोळ्यांचा (चष्म्याचा) नंबर कमी करण्यासाठी काही खास आयुर्वेदिक उपाय

१. जिरे आणि खडीसाखर एकत्र प्रमाणात घेऊन बारीक करा आणि हे मिश्रण रोज एक चमचा तुपासोबत घ्या.

२. रोज रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाने पायांना मसाज करा.

३. रोज ग्रीन टी चे सेवन करा. तसेच जेवणात नियमितपणे हिरव्या भाज्यांचा समावेश करा. यातील अँटी oxident डोळ्यांना निरोगी ठेवतात.

४. रोज रात्री त्रिफळा भिजवून सकाळी त्या पाण्याने डोळे धुवा.

५. रोज रात्री झोपण्यापूर्वी ६-७ बदाम भिजत घाला आणि सकाळी उठल्यावर ते खा.

६. हिरव्या वेलची ३-४ एक चमचा बडीशोप सोबत वाटून घ्या म्हणजेच बारीक करा आणि हे मिश्रण एक ग्लास दुधासोबत घ्या.

७. रोज नियमितपणे गाजराचा रस प्या.

८. एक चमचा बडीशोप, दोन बदाम आणि अर्धा चमचा खडीसाखर एकत्र बारीक करून रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधासोबत घ्या.

९. डोळ्यांच्या चारही बाजूंना अक्रोड तेलाने मसाज करा याचा तुमच्या डोळ्यांना खूप फायदा होईल.

१०. दोन्ही हातांच्या तळव्यांना घासून ते हात डोळ्यांवर ठेवा. डोळ्यांची आग (दाह) कमी होईल.

११. रोज डोळ्यात गुलाबजल टाका डोळ्यांना थंडावा मिळेल. रोज दोन- तीन वेळा याचा वापर तुम्ही करू शकता.

१२. रोज नियमितपणे दोनदा डोळ्यांचे व्यायाम करा.

१३. रोज रात्री झोपण्यापूर्वी कानांच्य मागे तुपाने मसाज करा. शिवाय डोळ्यांच्यावर हलक्या हाताने तूप चोळा. नंबर कमी होण्यास मदत होईल.

१४. रोज स्वच्छ पाण्याने डोळे धुवा.

१५. संगणकावर काम करताना दर दोन तासांनी ब्रेक घ्या.

हे सर्व उपाय केल्याने डोळ्यांचे आरोग्य अबाधित राहील आणि डोळ्यांच्या दृष्टीत स्पष्टता येईल.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!