जमीन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी – ७/१२ उतारा कसा पाहावा

जमीन खरेदी करणे हा बराचसा किचकट व्यवहार आपण समजतो. पण त्यातील काही आवश्यक नियमांची माहिती खरेदी करण्याआधी घेऊन आपण खात्रीशीर व्यवहार नक्कीच करू शकतो.

आज आपण जमीन खरेदी करण्याआधी कुठली प्रार्थमिक काळजी घ्यावी याविषयी बोलू.

जमिनीचा सातबारा उतारा पाहणे

ज्या गावातील जमींन खरेदी करावयाची असेल तेथिल गावच्या तलाठ्या कडून जमिनीचा सध्याचा सातबारा काढून घ्यावा. त्यावर असलेले फेरफार व “आठ अ” तपासून पाहावा.

सातबारा पहाताना “वर्ग १” नोंद असली तर ती जमीन विक्री करणा-याची स्वतःच्या मालकी वहिवाटीची असून सदर जमीन खरेदी करण्यास विशेष अडचण येत नाही.

परंतु नि.स.प्र.(नियंत्रित सत्ता प्रकार किवा “वर्ग २”) अशी नोंद असेल तर सदर जमीन कुळ वाहिवाटी मार्फत मिळविलेली असते. अशी जमीन खरेदी करणे पूर्वी संबंधित कुळाला विक्री करण्यासाठी प्रांत अधिकारी यांची परवानगी घेणे अपरिहार्य ठरते.

ही परवानगी खरेदी करते वेळी घेणे आवश्यक असते. या करीता “३२ म” प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यासाठी साधारणत: महिनाभराचा कालावधी लागतो. प्रांत अधिकारी यांची परवानगी मिळल्यावर खरेदीखत करता येते.

N.A-Plotजमीन खरेदी करताना खालील गोष्टींचा आढवा घ्यावा.

I) जमिनी पर्यंतचा रस्ता – जमीन बिनशेती असल्यास जमिनी पर्यंतचा रस्ता नकाशामध्ये दाखवीलेला असतो परंतु जमीन बिनशेती नसल्यास व खाजगी रस्ता असल्यास रस्त्यासाठी दाखवीलेली जमीन व संबंधित मालक यांची हरकत नसल्याची खात्री करावी.

II) आरक्षीत जमिनी – शासनाने सदर सदर जमिनी मध्ये कोणत्याही करणासाठीचे आरक्षण उदा. हिरवा पट्टा पिवळा पट्टा इं. नसल्याची खात्री करावी.

III) वाहिवाटदार – सातबारावरील मुळ मालक व प्रत्यक्ष जमिनीचा वहिवाटदार वेगवेगळे असू शकतात याची खात्री कारावी.

IV) सातबारावरील नावे – सातबारावरील नावे ही विक्री करणाऱ्या व्यक्तीचीच आहे का ते पहावे. त्यावर मयत व्यक्ती किवा जुना मालक इतर वारसांची नावे असल्यास ती काढून घेणे आवश्यक असते.

V) कर्जप्रकरण, न्यायालयीन खटला व भाडेपट्टा – जमिनीवर कोणत्याही बॅंक किवा संस्था यांच्या कर्जाचा बोजा नसल्याची खात्री करावी. तसेंच न्यायालायीन खटला चालू असल्यास संदर्भ तपासून पहावे. कोणतीही जमीन खरेदी करताना प्रथम वकिलाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

VI) जमिनीची हद्द – जमिनीची हद्द नकाशा प्रमाणे मोजून तपासून घ्यावी. व लगतच्या जमीन मालकांची हरकत नसल्याची खात्री करावी.

NA-PlotVII) इतर अधिकारांची नोंद – सातबारावर इतर अधिकारमध्ये नावे असतील तर आवश्यक ती माहिती करूं घेणे. किवा बक्षीसपत्राने मिळलेल्या जमिनींची विशेष काळजी घ्यावी.

VIII)बिनशेती करणे – शेतघर सोडून कोणत्याही कारणासाठी बांधकाम करावयाचे असल्यास बांधकामाच्या प्रकारा प्रमाणे बिनशेती करणे आवश्यक असते शहरात असल्यास योग्य त्या ऑथॉरिटी प्रमाणे करावे.

IX) संपादित जमिनी – सदर जमिनीमधून नियोजित महामार्ग, रेल्वे मार्ग, तलाव इ. नसल्याची खात्री करावी. याची सातबारावर नोंद पहावी. तसेच जमिनिच्या बाजूने रस्ता, नदी, महामार्ग, असेल तर त्यापासूनचे योग्य अंतर सोडून पुरेशी जमीन असल्यास खरेदी करावी.

X) खरेदीखत – तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून व आवश्यक शुल्क भरून खरेदीखत करावे.
योग्य कालावधी नंतर खरेदी केलेल्या जमिनिचा नकाशा व आपल्या नावे सातबारा आहे का याची खात्री करावी.

महसूल विभागाचे शासन नियम हे नेहमी सारखेच राहत नाहीत. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळोवेळी बदलणारे शासन नियम पडताळून पहावेत.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

6 thoughts on “जमीन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी – ७/१२ उतारा कसा पाहावा”

  1. मला शेती खरेदी करावयाची आहे पण माझ्या नावे वडिलोपार्जित शेतीचा 7/12 नाही. तरी मी शेती कशी खरेदी करू शकतो?

    Reply
  2. mla punyat 2 guntyasthi 32lk lagat ahet amout detna jastit jast amount hi cash ne magta ahet plz suggest me how can i do

    Reply
  3. 11 गुंठे R झोन जागेवर बंगला बांधून daily rental वर द्यायचे आहे. देऊ शकते का, की NA प्लॉट ची गरज आहे, 11 गुंठे जागा N A करू शकतो का?

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय