डोकेदुखी आणि डोळेदुखी कारणे आणि उपाय

pain in eyes and headache dizziness

आजकाल बहुसंख्य लोक नैराश्य, मानसिक ताण तणाव, दडपण, चिडचिड याने ग्रासलेले आहेत.

अडचणी सगळ्यांच्याच आयुष्यात आहेत पण त्यांना कसे हाताळावे किंवा त्यातून कसे बाहेर पडावे हे बऱ्याचदा समजत नाही.

समजले तरी उमजत नाही. कळतंय पण वळत नाही अशी अवस्था होऊन जाते.

मग या तक्रारी हळूहळू डोके वर काढतात आणि गंभीर आजाराच्या स्वरूपात याचे रूपांतर होते.

डोकेदुखी आणि डोळ्यांचे दुखणे हे तर त्यातील एक कॉमन दुखणे झाले आहे. थोडा मेंदूला ताण पडला किंवा जास्त विचार केला तर लगेचच या समस्येला सुरुवात झालेली असते.

पण जरा या मागील कारणांचा नीट अभ्यास करायला हवा आणि मगच त्यावर कोणते उपाय करता येतील याकडे लक्ष द्यायला हवे.

डोकेदुखी आणि डोळेदुखी मागे बऱ्याचदा ताण तणाव, नैराश्य, चिंता, अपुरी झोप आणि डोक्याला झालेली दुखापत अशी करणे असू शकतात. या कारणांची जरा सविस्तर माहिती घेऊया.

डोकेदुखी आणि डोळेदुखी ची सर्वसाधारण कारणे

1) क्लस्टर डोकेदुखी 

ही साधी डोकेदुखी नाही. क्लस्टर डोकेदुखी म्हणजे पूर्ण डोके खूप दुखायला लागणे.

हे दुखणे गंभीर स्वरूपाचे आहे असे म्हणायला हरकत नाही. या डोकेदुखी मध्ये दिवसातून तीन चार वेळा काही तासांच्या फरकाने खूप डोके दुखते. शिवाय एकाच डोळ्याच्या मागे तीव्र स्वरूपाच्या वेदना जाणवतात.

2) साईनसायटीस

हा एक सायनसचा प्रकार आहे किंवा संसर्गाचा प्रकार आहे असे आपण म्हणू शकतो. यात सायनसची जी लाईन असते त्यावरील पेशींवर सूज येते आणि नाक बंद पडते.

अर्थातच त्यामुळे डोके दुखायला लागते आणि ही डोकेदुखी वाढून डोळ्यांचे दुखणे सुरू होते.

3) गलुकोमा

हा एक डोळ्यांशी संबंधित आजार आहे. हा आजार डोळ्यांबरोबर डोकेदुखीला पण कारण ठरतो.

आपल्या शरीरात ऑप्टिक नर्व्हचा म्हणजेच मज्जातंतूचा जवळपास दहा लाखांचा फायबरचा समूह असतो.

हा समूह ‘डोळ्यांनी काय पाहिले’ त्याची माहिती मेंदूपर्यंत पोहोचवतो. या नर्वसवर जेंव्हा सूज येते तेंव्हा हा त्रास सुरू होतो. या नर्वमध्ये कोणतीही अडचण आली तरीही डोकेदुखी आणि डोळ्यांचे विकार सुरू होतात.

5) मायग्रेन

हा त्रास नेहमीच्या डोकेदुखीपेक्षा खूप भयंकर आहे. डोळ्यांच्या मागे होणारी तीव्र वेदना म्हणजे मायग्रेन.

यात डोक्याचा अर्धा भाग दुखायला लागतो. हा त्रास काही तासांपासून ते काही दिवसांपर्यंत होऊ शकतो.

6) ताण, नैराश्य आणि चिंता

हे सगळे मानसिक स्वरूपाचे आजार आहेत. खूप दिवसांपासून हे त्रास जाणवत असतील तर मग डोके आणि डोळे दुखायला सुरुवात होते.

या दुखण्याचा परिणाम सरळ डोक्यावर होतो.

7) डोक्याची इजा 

डोक्याला जर काही कारणांमुळे दुखापत झाली असेल तर मग डोक्यासोबत डोळेदुखी पण होऊ शकते. या दुखण्याचा परिणाम डोक्याच्या सर्व भागात दिसू शकतो.

डोकेदुखी आणि डोळेदुखीची कारणे आपण सविस्तर पहिली. पण हा त्रास कमी करायचा असेल तर नियमित ध्यान, खाण्यापिण्याच्या सवई मध्ये केलेले बदल आणि काही डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेले औषध उपचार नक्कीच मदत करू शकतात.

डोकेदुखी आणि डोळेदुखी चा त्रास कमी करण्याचे उपाय 

1) पुरेशी झोप

अपुरी झोप ही बऱ्याच आजारांना निमंत्रण देते. आळस, चिडचिड, डोकेदुखी हे अपुऱ्या झोपेमुळे होणारे आजार आहेत. त्यामुळे रोज आपली शांत आणि पूर्ण झोप होणे गरजेचे आहे. त्यामुळे डोक्याला आणि डोळ्यांना आराम तर मिळतोच शिवाय दुखणे कमी होते.

2) ध्यान धारणा

मेडीटेशन केल्याने आपले डोके पूर्णपणे शांत करता येते. इतकेच नव्हे तर ताण, चिंता आणि डोक्याशी संबंधित बाकी आजार पण पळून जातात. पण यात सातत्य हवे. डोके शांत झाल्यामुळे डोळे आणि डोके यांना होणारा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

3) मसाज

खरतर सगळ्या अंगाला मसाज केल्याचे खूप फायदे मिळतात. ज्या भागावर आपण मसाज करतो त्या भागी रक्तप्रवाह सुरळीत होतो. अशाने मानसिक ताण दूर होतो पर्यायाने डोके आणि डोळे शांत राहतात. डोळ्यांना आणि डोक्याला आराम मिळतो.

4) खाण्या पिण्याच्या सवई

आपला आहार आपल्या शरीरावर होणाऱ्या परिणामात खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. आपला आहार जितका चांगला तितकीच आपली प्रकृती चांगली. अन्नातील काही पदार्थात अँटी oxidants असतात जे आपले मानसिक आरोग्य नीट ठेवण्यास मदत करतात. याशिवाय डोळे आणि डोके दुखत असेल तर आराम देतात.

5) औषधे

कधी कधी डोकेदुखी आणि डोळेदुखीचा त्रास इतका गंभीर होऊन जातो, की उपचार घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा वेळी डॉक्टर काही औषधे देतात त्यात सुमट्रिप्तन, जोलमिट्रीप्टान यासोबत काही अँटी डिप्रेशन गोळ्यांचा समावेश असतो. पण या गोळ्या किंवा हे उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत.

डोकेदुखी आणि डोळेदुखीची काही प्रमुख कारणे आणि त्यावरील उपाय आपण यात पाहिले. पण आपल्या दुखण्यामागचे नेमके कारण समजून घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यावरील उपचार घ्यावेत.

तरच दुखण्यावर योग्य इलाज होईल. त्यामुळे जर हा त्रास खूप जुना असेल किंवा त्रासदायक असेल तर वेळ न घालवता त्वरित उपचार करून घ्या आणि त्रासापासून सुटका करून घ्या.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

  1. Chakkar var lekh banwa

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!