पायांच्या तळव्यांची आग होते? वाचा कारणे आणि आयुर्वेदिक उपाय

आपले मानवी जीवन खूपच धावपळीचे आणि धकाधकीचे झाले आहे. त्यात हल्ली नवनवीन आजार डोकं वर काढत आहेत.

त्यामुळे कधी कोणता आजार होईल काही सांगता येत नाही. याशिवाय वाढते प्रदूषण आणि रोजचे घड्याळाच्या काट्यावर धावणारं आपलं जीवन यामुळे आजारांच प्रमाण वाढले आहे.

टेन्शन, अशक्तपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, डोकेदुखी यासारखे आजार दहा पैकी नऊ जणांना असतात. ही खरंतर खूप चिंताजनक बाब आहे. सततचा अशक्तपणा, डोकेदुखी, अंगदुखी यासारखे आजार आपण दुर्लक्षित करतो.

त्यातच दुर्लक्षित केला जाणारा अजून एक आजार म्हणजे पायांची जळजळ किंवा दाह. वरवर जरी तो आपल्याला किरकोळ वाटत असला तरी एकदा का हा त्रास सुरू झाला की मग ही जळजळ खूप असह्य होते आणि काय करावे ते सुचत नाही.

पायाची जळजळ ही खूप त्रासदायक असते आणि याची सुरुवातीची लक्षणे म्हणजे पायदुखी, पायांना मुंग्या येणे आणि पायांना सुन्नपना किंवा जडपणा येणे ही आहेत. ही समस्या मधुमेह, किडनीचे आजार, दारू पीण्यामुळे आणि शरीरातील नसा (शिरा) खराब झाल्यामुळे उद्भवते.

कधी कधी हा त्रास इतका वाढतो की गोळ्या घेतल्याशिवाय पर्याय उरत नाही. आपल्याला थोडे काही झाले की आपण अँटीबायोटिक किंवा पेनकिलर गोळ्या घेतो, त्याने थोडे बरे वाटते आणि आपण लगेच कामाला लागतो. पण हे तात्पुरते असते.

आपण कधी विचार केला आहे का, की आपण जे अँटीबायोटिक घेतो त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो ??

नाही!! अजिबात याचा विचार आपण करत नाही. पण यावर काही अँटीबायोटिक किंवा पेनकिलर औषधे घेण्यापेक्षा कायमस्वरूपी बरे करणारे आयुर्वेदिक उपाय केले तर खूप फायदेशीर ठरते. कारण आपली भारतीय जीवनशैली ही आयुर्वेदवर आधारलेली आहे. त्यामुळे आयुर्वेदात खूप छान आणि कायमस्वरूपी बरे करणारे उपाय आहेत.

चला तर मग बघुया पायांच्या जळजळी वरील खात्रीशीर उपाय

१. अश्वगंधा गोळ्या

पायांची जळजळ होण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे वात. अश्वगंधा वात शमनासाठी खूप लाभदायक आहे. अश्वगंधा हे आपल्या शरीराला नवी ऊर्जा देते आणि शरीरातील पेशींना पोषण देते. त्यामुळे मासपेशी आणि हाडांना शक्ती मिळते आणि शरीराला आराम मिळतो. या गोळ्यांचा उपयोग मुख्यत्वे मानसिक ताण दूर करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी केला जातो.

आपल्या शरीरातील मज्जासंस्था / नर्व्हस सिस्टीम सशक्त करण्याची क्षमताही यात असते. शरीरातील आजार मुळापासून अश्वगंधा दूर करते. पायांच्या जळजळीवर तर हे प्रभावी आहेच शिवाय पायदुखी आणि मधुमेहात होणाऱ्या कमी वजनावर पण हा प्रभावी उपाय आहे.

२. चंद्रप्रभा वटी

या वटीत मूत्र विसर्जन सुलभ करणारा प्रभावी गुण आहे. या वटीमुळे मासपेशींना आराम मिळतो, तसेच पायांना होणाऱ्या सर्व त्रासापासून सुटका होते. यात नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिन असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते आणि पायांची जळजळ तसेच अशक्तपणा दूर करते.

लघवीच्या परिणामी किडनीच्या सर्व विकारांवर चंद्रप्रभा वटी हा एक उत्तम इलाज आहे.

३. कायाकल्प वटी

यात हळद, मंजिष्ठा, गुळवेल, बावची आणि करंज नावाची आयुर्वेदिक औषधी वनस्पती यांचा समावेश आहे. त्यामुळे शरीरासाठी ही अत्यंत गुणकारी मानली जाते.

शरीरातील रक्त शुद्ध करून सर्व तत्व संतुलन पुनर्स्थापित करण्याचे काम ही वटी करते. पायांच्या जळजळीवर हा प्रभावी उपाय तर आहेच शिवाय यातील हर्बल गुणधर्म शरीरातील नको असलेले सूक्ष्म जीव आणि विष बाहेर काढून टाकते. पर्यायाने शरीर निरोगी रहाते.

४. शिलाजीत गोळ्या

वातदोहांवर हे अतिशय परिणामकारक आयुर्वेदिक औषध आहे. अशक्तपणा आणि मधुमेहा सारखे आजार असतानाही पायांची जळजळ कमी करण्याची क्षमता या औषधात आहे.

पायांची होणारी जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त असलेले अँटी इंफ्लेमेट्ररी गुण यात आहेत.

पुरुषांमधील वीर्य वाढवण्यास तसेच टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स नियंत्रित करण्यास शिलाजीत उपयुक्त आहे. शिलाजीत शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीर मजबूत बनवते. जळजळी सोबतच पायांवरील सूज दूर करण्यासाठी मदत करते.

तर अशा या बहुगुणी आयुर्वेदिक औषधांचा वापर करा आणि निरोगी रहा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

4 thoughts on “पायांच्या तळव्यांची आग होते? वाचा कारणे आणि आयुर्वेदिक उपाय”

  1. सर पायात जलजल (आग)होण्या वर वरील सर्व गोळ्या घ्यावे किवा कोणती एक कृपया मार्ग दर्शन करावे

    Reply
  2. पाय जड पडतात व खूप दुखतात आणि पोटरीपर्यंत आग होते

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय