मुलीच्या केस गळतीने 85-वर्षाच्या जोडप्याला दिली प्रेरणा!! केलं हेअर ऑइल लाँच

keshpallav hair oil

मुलीच्या केस गळतीने 85-वर्षाच्या जोडप्याला दिली प्रेरणा!!

50 औषधी वनस्पतींसह केलं हेअर ऑइल लाँच

सुरत इथं राहणारं एक जोडपं, व्यवसायात निवृत्ती स्वीकारून मजेत राहत होतं.

पण या जोडप्यांनं वयाच्या 85 व्या वर्षी केशपल्लव हेअर ऑइल लॉन्च केलं.

अर्थात त्यांना कुठलाही आर्थिक प्रॉब्लेम नव्हता, तर लाडक्या लेकीच्या केस गळती वरती उपाय म्हणून त्यांनी तेल निर्मितीला सुरूवात केली.

नेमकं काय झालंय? चला जाणून घेऊया !

तुम्हाला चेस खेळायला आवडतं? गाणं गायला आवडतं? गाणं ऐकायला आवडतं?नृत्य करायला आवडतं? मग आता सांगा वयाच्या कोणत्या टप्प्यावर तुमची ही आवड कमी होते?

काय म्हणलात? अशी ही आवड कधी कमी होत नसते? मग ज्यांच्या मनात उद्योगशीलतेचं बीज रुजलेलं आहे त्यांना स्वस्थ कसं बसवेल?

राधाकृष्ण आणि त्यांच्या पत्नी शकुंतला ह्या गुजरातमधल्या सुरत शहरात राहतात.

कौटुंबिक व्यवसायात ५० वर्षे काम केल्यानंतर राधा-कृष्ण चौधरींनी २०२० मध्ये निवृत्ती स्वीकारली.

पण त्यांच्या लाडक्या लेकीनं २०२१ मध्ये केस गळतीची तक्रार केल्यानंतर, घरगुती उपचार किंवा बाजारात उपलब्ध असणाऱ्या तेलांची नावे सुचवण्याऐवजी केस गळतीच्या कारणांवर संशोधन करायला राधाकृष्ण चौधरी यांनी सुरुवात केली.

नेटवर तसंच पुस्तकं शोधनिबंध घेऊन राधाकृष्णन चौधरी संशोधन करायला ठिय्या मांडून बसले.

इंटरनेटवर तर काय हो, अनेक उपचार, हेअर मास्क, घरगुती उपचार अशा प्रकारे अनेक गोष्टींचा त्यांच्यावरती भडीमार झाला.

पण खात्रीशीर म्हणावा असा इलाज काही राधाकृष्ण चौधरी यांना मिळाला नाही.

त्यांचे परिश्रम पाहुन त्यांच्या पत्नी शकुंतला प्रभावित झाल्या आणि त्याही या संशोधनामध्ये सहभागी झाल्या.

या दोघांनी मिळून केस गळतीची वेगवेगळी कारणं आणि त्यावरती प्रभावी औषधी वनस्पती कोणत्या याचे वर्गीकरण केलं.

जसं स्त्रियांमधली केस गळती पुरुषांमधल्या केस गळती पेक्षा वेगळी असते.

चौधरी दाम्पत्यांना शोधलेल्या वनस्पती काही प्रमाणात (DHT) ला रोखू शकतात.

या दाम्पत्यांना पुढं कोल्ड प्रेस तंत्रानं नारळ, काळे तीळ, ऑलिव्ह, एरंडेल, कलोंजी या पदार्थांचं तेल काढून 50 पेक्षा जास्त औषधी वनस्पतींचे मिश्रण त्याच्यामध्ये घातलं.

सुरुवातीला तीन महिने या तेलाचा वापर चौधरी दांपत्याने स्वत: केला.

राधाकृष्ण चौधरी यांना टक्कल पडलेल्या ठिकाणी नवे केस उगवल्याचं लक्षात आलं आणि त्यांचा उत्साह वाढला.

त्यानंतर हे तेल मित्रांमध्ये परिवारामध्ये वाटण्यात आलं.

त्याचे सकारात्मक रिझल्ट तर आलेच पण मागणी सुद्धा वाढली.

चौधरी दाम्पत्याने लवकरच “केश पल्लव हेयर ऑईल ब्रँन्ड लॉन्च केला.

गुणवत्ता हेच ब्रीद

राधाकृष्ण आणि शकुंतला चौधरी तेलाच्या गुणवत्तेबाबत आग्रही आहेत.

पोत चांगला राखण्यासाठी किंवा तेलांचा नैसर्गिक उग्र वास जाऊन सुगंधी वास येण्यासाठी ते त्यात कोणतंही कृत्रिम रसायन घालत नाहीत त्यामुळे तेल तयार व्हायला जास्त वेळ लागतो.

औषधी तेल तयार करणं ही एक लांबलचक कंटाळवाणी आणि थकवणारी प्रक्रिया आहे.

हे तेल तयार व्हायला जवळपास एक महिना लागतो.

“आम्ही ग्राहकांची कोणत्याही प्रकारे फसवणूक करत नाही, जर 50 औषधं, तेलात मिसळण्याचं वचन आम्ही देत असू, तर त्या ५० औषधी तेलात योग्य त्या प्रमाणात मिसळल्या जाणारच यात शंका नाही.

राधाकृष्ण आणि शकुंतला चौधरी यांचा हा प्रयोग जेंव्हा जगजाहीर झाला तेंव्हा त्यांना शेकडो कॉल आले, मोठ्या प्रमाणात ऑर्डर सुद्धा मिळायला लागली.

या सगळ्याला भुलून खोटा व्यापार करण्याऐवजी या दाम्पत्यांनं सगळ्यांना “एक महिना वाट पहायला लागेल” असं स्पष्ट कळवलं.

फक्त नफा कमावण्यासाठी नकली तेल उपलब्ध करून देण्यापेक्षा “गुणवत्ता हेच आमचे ब्रीद” असल्याचं चौधरी दांपत्यांन जाहीर केलं.

हे तेल वापरून मिळालेल्या प्रतिक्रिया जबरदस्त होत्या.

एकानं लिहिलं कोविंड नंतर आम्हा सगळ्यांचेच केस गळत होते पण या तेलाचा वापर केल्यानंतर आश्चर्यकारकरित्या गळती खूप कमी झाल्याचे जाणवत आहे.

इतक्या प्रतिसादानंतर चौधरी दांपत्य आता व्यवसायाच्या पुढच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहेत

८५ हे वय विश्रांतीच मानलं जातं. पण या टप्प्यावरती अनुभव सुद्धा भरपूर असतो.

याच अनुभवाचा वापर करत नवा स्टार्ट अप सुरू करणं ही खरं तर कौतुकाची गोष्ट आहे.

“एकत्र काम करणे, ब्रँडची भरभराट होताना पाहणे आणि कृतज्ञ असलेल्या अनेक अनोळखी लोकांशी संवाद साधणे हे आमच्यासाठी नक्कीच उत्तम फळ आहे.” असं राधाकृष्ण चौधरी यांचं म्हणणं आहे.

प्रत्येक तरुणाला प्रेरणा देईल अशी ही खरीखुरी कहाणी तुम्हांला कशी वाटली ?

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

10 Responses

  1. Niteen says:

    Where can I get this oil in Pune?
    Please share contact details

  2. Avinash bagade says:

    किधर मीलेगा मुझे चाहिए

  3. Bhakti Ahire says:

    How to order this hair oil & Pp

  4. Vrushali Ghodchar says:

    Kuthe mile he oil

  5. Pravin S More says:

    Want to buy this product

  6. Ajay Jadhav says:

    Kute milel Oil

  7. Bharat Dalvi says:

    Plz give me contact no.

  8. smitha suresh says:

    How can I get This oil . My daughter has dandruff issues. Is This oil effevtive for it.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!