आरोग्यासाठी उसाच्या रसाचे १० फायदे तुम्हांला माहीत आहेत़ का ?

तापत्या वैशाखवणव्यात एक थंडगार ग्लास उसाचा रस मिळाला तर त्यापेक्षा उत्तम पर्याय दुसरा नाही.
फक्त तहान भागवण्यासाठी उसाचा रस प्यावा असं नाही, तर त्यातले फायदे जाणून घेऊन ही रस नियमित प्या.
उस गवत वर्गातली वनस्पती आहे आणि त्याच्यामध्ये कोणतेही चरबीयुक्त घटक नसतात.
१००% नैसर्गिक असं पेय म्हणजे उसाचा रस.
240 मिली शुद्ध उसाच्या रसात 30 ग्रॅम नैसर्गिक साखरेसह 250 कॅलरीज असतात.
उसामध्ये चरबी, कोलेस्ट्रॉल, फायबर आणि प्रथिनं यांचे प्रमाण शून्य असते.
उसामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह असतं.
उसाचा रस हा उन्हाळ्यातील गोडसर लोकप्रिय पेय आहे जे तुम्हाला हायड्रेट ठेवतं.
उसाच्या रसाचे बरेच फायदे आहेत मात्र त्यातले महत्त्वाचे १० फायदे आपण उसाच्या रसाच्या या सीझनमध्ये जाणून घेऊया.
उसाच्या रसाचे फायदे
१) उसाच्या रसामुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळते.
उन्हाळा सुरू झाला की एसटी स्टँड जवळ किंवा जागोजागी रस्त्याच्या कडेला घुंगरांचा लयबद्ध नाद ऐकायला मिळतो.
हा नाद रसवंतीगृहातून येत असतो.
या उसाच्या रसामुळे तापत्या गर्मीत शरीराला पटकन ऊर्जा मिळते, डीहायड्रेशन रोखलं जातं.
उसाच्या रसातली साखर शरीराद्वारे पटकन शोषली जाऊन त्याचा वापरही केला जातो.
२) यकृताची कार्यक्षमता वाढते.
३) कर्करोगाला प्रतिकार करायला मदत होते.
कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि मॅंगनीजची मात्रा भरपूर प्रमाणात असल्यामुळं उसाचा रस नैसर्गिक रित्या अल्कधर्मी बनतो.
उसाच्या रसात असणारी फ्लेव्होनॉइड्सची उपस्थिती शरीराला कर्करोगाच्या पेशी, विशेषतः प्रोस्टेट आणि स्तनाचा कर्करोग टाळायला मदत करते.
४) पचन संस्थेचे कार्य सुरळीत होतं.
उसाच्या रसाचे बरेच फायदे आहेत. यात पचनसंस्थेचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी तर हा रस खूप फायदेशीर आहे
उसाच्या रसात असणारं पोटॅशियम पोटातली PH पातळी संतुलित करतो, पाचक रसांचं स्त्रवणं सोपं करतो आणि पोटाचे कार्य सुरळीत ठेवतो, पोटातला संसर्ग टाळायला ही त्यामुळे मदत होते.
५) मधुमेही लोकांसाठी ही उपयुक्त.
उसाच्या रसात साखरेचे प्रमाण जास्त असतं, त्यामुळे खरंतर मधुमेही व्यक्ती या रसापासून दूरच राहणे पसंत करतात.
पण योग्य त्या प्रमाणात उसाचा रस प्यायला तर मधुमेही लोकांनाही याचा फायदा होऊ शकतो.
नैसर्गिक साखरेमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत वारंवार वाढ होण्यापासून बचाव होतो.
६) उसाच्या रसामुळे किडनीचे आरोग्य चांगले राहते
नैसर्गिक कमी-कोलेस्टेरॉल, कमी-सोडियमयुक्त अन्न, चरबी नसलेला, उसाचा रस मूत्रपिंडांचं आरोग्य उत्तम ठेवायला मदत करतो.
७) वेदना कमी करायला मदत करतं.
लिंबाचा रस नारळ पाणी आणि उसाचा रस योग्य प्रमाणात एकत्र करून घेतले तर लैंगिक रोगांमुळे होणारी वेदना, मूत्राशयातील संसर्गामुळे होणारी वेदना, किडनी स्टोन मुळे होणाऱ्या वेदना कमी व्हायला मदत होते
८) हाडं आणि दातांच्या विकासात मदत करतं
पूर्वीच्या काळी उस दातांनी तोडून चघळून खाल्ला जायचा.
त्यामुळे लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा ऊस खाणं हा अतिशय आनंदाचा भाग ठरायचा आणि दातही मजबूत व्हायचे.
उसाच्या रसात ही कॅल्शिअम असल्यामुळं हाडं, दात यांना बळकटी मिळते.
९) श्वासाची दुर्गंधी आणि दात किडणे रोखले जाते
दात किडल्यामुळे तुमच्या श्वासाला दुर्गंधी येते का?
उसाचा रस यावरती एक चांगला उपाय ठरू शकतो.
उसाचा रस कॅल्शिअम आणि फॉस्फरस या खनिजांनी समृद्ध असल्यामुळे दात मजबूत व्हायला मदत होते.
ज्यामुळे ते किडण्याची शक्यता कमी होते.
या पोषक तत्वांचा कमतरतेमुळेही जी दुर्गंधी येते ती कमी करायला ही उसाचा रस मदत करतो.
१०) मुरूम पुटकुळ्या कमी व्हायला मदत मिळते
उसाच्या रसामध्ये त्वचेवरील मुरूम पुटकुळ्या कमी करण्याची क्षमता असते
उसाच्या रसामध्ये ग्लायकोलिक ऍसिड सारखे अल्फा-हायड्रॉक्सी ऍसिड (AHAs) असल्याने ते पेशींची निर्मिती वाढवतं
त्यामुळे मुरूम पुटकुळ्या कमी होतात.
मुलतानी माती मध्ये उसाचा रस मिसळून चेहरा आणि मानेवर ते एक सलग लावून २० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुऊन टाका.
चेहऱ्यावरच्या मुरूम पुटकुळ्या कमी
होताना दिसतील.
मित्रांनो, उसाच्या रसाचे हे जनरल फायदे आहेत.
मात्र व्यक्ती तितक्या प्रकृती असतात हे लक्षात घेऊनच आणि उसाच्या रसातली साखर ही जरी नैसर्गिक असली तरी साखरच असते हे लक्षात घेऊन उसाचा रस योग्य त्या प्रमाणातच प्या.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
पण कधी कधी या रसाने अॕसिडीटी वाढते असे का होते ?