टेस्टोस्टेरोनचे प्रमाण वाढल्याने पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या शरीरावर होणारे वाईट परिणाम

टेस्टोस्टेरोनचे प्रमाण वाढल्याने

आपल्या शरीरात असंख्य पेशी, कॅलरीज, रक्तघटक, रसायने, संप्रेरके, ग्रंथी असतात. आपण जर योग्य पद्धतीने आहार घेतला, सगळी पोषकतत्वे योग्य प्रमाणात मिळाली तरच हे शरीर नीट चालते / काम करते. पण यात जर काही घटक कमी जास्त झाले तर आपल्या शरीराचे संतुलन बिघडते.

वैवाहिक आयुष्याची घडी सुरळीत चालू ठेवणारा एक महत्त्वाचा भाग म्हणजे लैं-गि-क आरोग्य. हेच लैं-गि-क आरोग्य स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये उत्तम असेल तरच आपल्या वैवाहिक जीवनाचा गाडा सुरळीत चालू शकतो. आपल्या शरीरातील लैं_गि_क वाढ नियंत्रित करणारा घटक म्हणजेच टेस्टोस्टेरोंन.

हा एक संप्रेरक आहे जो स्त्री आणि पुरुष दोघांच्याही लैं_गि_क वाढीवर नियंत्रण ठेवतो.

मात्र हा घटक अगदी योग्य प्रमाणात असायला हवा. कमी असेल तरीही शरीराला हानी पोहचवतो आणि जास्त असेल तरीही. ही हानी दोघांच्याही म्हणजेच स्त्री आणि पुरूष दोघांच्याही शरीराला पोहचते.

बघुया नक्की काय होते.

टेस्टोस्टेरोन जास्त असल्याने पुरुषांच्या शरीरावर होणारे परिणाम किंवा नुकसान 

१. पुरळ

पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन जास्त असल्याने चेहऱ्यावर पुरळ येण्याची समस्या उद्भवते. याचे कोणतेही स्पष्ट कारण समोर आले नसले, तरीही रिपोर्ट नुसार टेस्टोस्टरोंन जास्त असेल तर आणि जास्त शारीरिक हालचाल करण्यात आली तर खूप घाम येऊन अतिरिक्त पुराळ येऊ शकते.

२. रक्तदाबमध्ये बदल

शरीरात टेस्टोस्टरोंन जास्त असेल तर काही पुरुषांना कमी रक्तदाब तर काही पुरुषांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. त्यामुळे मग चक्कर येणे, बेशुध्द होणे, डोकेदुखी, अस्वस्थता आणि थकवा या तक्रारींना सामोरे जावे लागते.

३. लैं-गि-क आरोग्यावर परिणाम

वर सांगितल्या प्रमाणे टेस्टोस्टरोन हे संप्रेरक लैं_गि_क वाढीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. पण जर याचे प्रमाण अधिक असेल तर लैं-गि-क आरोग्यावर त्याचा विपरीत परीणाम होतो. वंध्यत्वाची समस्या निर्माण होते. हा त्रास असलेल्या व्यक्तींची से~क्स~ड्राइव्ह म्हणजे संबंध प्रस्थापित करण्याची आवड जास्त असते.

काही पुरुषांमध्ये शु~क्रा~णूंची संख्या कमी असल्याचे दिसून येते. तसेच काही पुरुषांना जास्त काळ संबंध ठेवण्यास त्रास होऊ शकतो ज्याला आपण ‘पुरुषी गु~प्तां~गामध्ये ताठरतेची कमतरता असणे’ असेही म्हणतो.

४. अंगावर जास्त केस असणे

हे संप्रेरक जास्त प्रमाणात असेल तर, केसांपासून ते शरीराच्या प्रत्येक भागात जास्त केस उगवतात. छातीवर, हाता पायांवर आणि पाठीवर प्रमाणापेक्षा जास्त केसांची वाढ झालेली असते.

५. सतत मुड बदलतात

स्त्रियांमध्ये या संप्रेरकाचे प्रमाण जास्त असेल तर चेहऱ्यावर, पाठीवर आणि छातीवर खूप केस उगवतात.

२. अनियमित मासिक पाळी

स्त्रियांमध्ये टेस्टोस्टरोनचे प्रमाण जास्त असेल तर मासिक पाळी अनियमित होते. महिना होऊन गेला तरी पाळी येत नाही, बऱ्याचदा अनेक महिने पाळीच येत नाही.

३. लैं_गि_क समस्या

ज्या स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण अधिक आहे अशा स्त्रियांमध्ये शारीरिक संबंधाच्या आवडीचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते. याशिवाय यो~नी कोरडी असणे आणि गर्भावस्थेत त्रास होऊ शकतो.

४. अचानक मुड बदलतात

टेस्टोस्टेरॉन वाढल्याने पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही बरेचदा मूड स्विंग्ज अनुभवावे लागतात. निराशा, चिडचिड आणि चिंताग्रस्त मनस्थितीचा सामना करावा लागतो.

तसेच चेहऱ्यावर पुरळ येणे, स्तनांचे प्रमाण कमी असणे, घोगरा आवाज, गर्भधारणेमध्ये अडचण आणि वजनवाढ अशा ही तक्रारींना सामोरे जावे लागते.

तर अशा प्रकारे टेस्टोस्टरोन जास्त प्रमाणात असेल तर स्त्री आणि पुरूष दोघांना येणाऱ्या अडचणी किंवा शारीरिक समस्या आपण पहिल्या.

दोघांनाही होणारे नुकसान बऱ्याच प्रमाणात सारखे आहे. म्हणजे मुड बदलणे, अंगावर जास्त केस उगवणे किंवा लैं-गि-क समस्या. यापैकी कोणत्याही समस्येला आपण सामोरे जात असाल तर वेळ वाया न घालवता त्वरित वैद्यकीय उपचार करून घ्या.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

  1. Avinash says:

    उपचार नाही सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!