आईचा ‘लाडका लेक’ पत्नीसाठी मात्र त्रासदायक ठरू शकतो? कसं ते बघा

आईचा 'लाडका लेक' पत्नीसाठी मात्र त्रासदायक ठरू शकतो? कसं ते बघा

आईचा ‘लाडाचा लेक’ बायकोसाठी मात्र त्रासदायक ठरू शकतो? काय वाटतं तुम्हाला?

भारतीय संस्कृतीत आईला फार महत्व आहे आई स्वतःच्या मुलावरती प्रचंड प्रेम करते.

त्यासाठी स्वतःची ओळख पुसून जगत राहते.

पण तिचं हेच वागणं काही दिवसांनी दुसऱ्या स्त्रीसाठी म्हणजे त्या मुलाच्या बायकोसाठी मात्र त्रासदायक ठरू शकतं.

प्रत्येक आईला तिचा मुलगा इतका प्रिय असतो, त्याच्यावर इतका विश्वास असतो की आपला मुलगा कधी चुकीचं वागेल असं वाटतच नाही.

आपल्या मुलांनं केलेली प्रत्येक गोष्ट आईला अगदी बरोबरच वाटत असते.

त्याच्या प्रत्येक गोष्टीचं आईला कौतुकच असतं. आणि म्हणूनच त्याला घरकाम किंवा स्वयंपाक करायला कधीच शिकवलं जात नाही.

मुलगी असेल तर अगदी लहानपणापासून तिला घरकाम, स्वयंपाक आवर्जून शिकवलं जातं.

मुलांना मात्र सोफ्यावरती आरामात रेलून घरातल्या स्त्रिया त्याला कधी वाढतील ह्याची वाट बघायला शिकवलं जातं.

पितृसत्ताक पद्धतीचा इतका जबरदस्त पगडा आजही आपल्या मनावर आहे की, एका सर्वेक्षणात असं आढळून आलं आहे की, भारतीय पुरुष घरकामात दिवसभरातले फक्त १९ मिनिटं घालवतात.

त्यातही सहजभाव नसतोच, तर स्त्रियांना मदत केल्याचा तो अभिमान असतो.

एका सर्वेक्षणानुसार भारतीय महिला दिवसभर घरातील कामासाठी खपत असतात.

अगदी आधुनिक स्त्री म्हटली तरी जवळपास ६ तास तरी ती घर कामात अडकते.

पुरुष मात्र तासभर ही घर कामासाठी वेळ देत नाही.

हा एवढा फरक का बरं असतो?

याचं कारण अगदी सोपं आहे. खोलवर रुजलेली पितृसत्ताक पद्धती हे यामागचं एक मोठं कारण आहे.

काय म्हणताय? हे तुम्हाला पटत नाहीये? मग या ५ गोष्टी वाचाच.

मग तुम्हाला पटेल की आईचा हा लाडका लेख बायकोसाठी किती त्रासदायक ठरतो आणि हे होऊ नये म्हणून मुलांना वाढवताना काय काळजी घेतली पाहिजे.

१) या छकुल्याला निरागस बाळ म्हणूनच वाढवलं जातं.

अगदी लहानपणापासून मुलांच्या मनावरती हेच बिंबवलं जातं की त्यांची कोणी ना कोणी तरी काळजी घेईल.

लग्नापूर्वी पुरुषांची काळजी घेणं ही त्याच्या आईची जबाबदारी असते, तर लग्नानंतर ही जबाबदारी बायकोच्या खांद्यावर येते.

खरं तर प्रत्येक आईला एक प्रश्न आवर्जून विचारायला हवा की, जर तुमचा मुलगा आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, तुमच्या सुनेला अन्न-वस्त्र-निवारा पुरवू शकत असेल तर तो स्वतःची काळजी घेण्याइतपत परिपक्व का नसतो?

स्वतःचे कपडे जागेवर ठेवणे, ते वेळच्या वेळी धुवायला टाकणे हे खरंच त्याच्यासाठी इतके अवघड असतं का हो?

२) कुठल्याही चुकीसाठी मुलाला दोषी मानलं जात नाही.

सगळ्या जगाचे नियम एका बाजूला आणि भारतीय आईचं हृदय एका बाजूला.

भारतीय आईला वाटतं माझा मुलगा सगळ्याच दृष्टीने परिपूर्ण आहे.

या आईनं डोळ्यावरती इतकी घट्ट पट्टी बांधलेली असते की त्या मुलाने केलेल्या अनेक चुका तिला कधी दिसतच नाही. (याला नक्कीच अपवादही असूच शकतात)

खरं तर तिनं आपलं मुल घडवताना त्याच्या चुकांवर पांघरूण घालण्याऐवजी त्याची चूक वेळच्या वेळी त्याला जाणवून दिली पाहिजे आणि ती सुधारण्यासाठी मदतही केली पाहिजे.

३) या छकुल्याला “तूच सगळ्यात पात्र व्यक्ती आहेस”, असंच शिकवलं जातं.

पुरुषाचं कुटुंबातलं स्थान जाणून घ्यायचं तर कुटुंबातल्या कर्त्या पुरुषाकडे नीट लक्ष देऊन पहा.

कामावरून परतल्यानंतर आराम करत, रात्रीच्या जेवणात काय काय पदार्थ असावे याचे हुकूम सोडणारा कर्ता पुरुष तुम्ही प्रत्येक घरात पाहिला असेल.

महिलांनी नवऱ्याला किंवा मुलाला स्वयंपाक करायला किंवा स्वयंपाकासाठी मदत करायला सांगितलं तर त्याचा तो अपमान मानला जातो.

४) असा प्रत्येक ‘लाडावलेला लेक’ पत्नीची तुलना आईशी करतो.

भारतीय पुरुषांनी मुळात हे समजून घ्यायला हवं की त्यांची आई आणि त्यांची बायको या दोन स्वतंत्र व्यक्ती आहेत.

त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे संस्कार झाले आहेत.

त्यामुळे त्यांच्यामध्ये कधीच तुलना करू नये.

आईला संसाराचा अनेक वर्षांचा अनुभव असतो, तर तुमच्या बायकोने संसाराला तुमच्या बरोबरच सुरुवात केलेली असते.

आजच्या मुली तर शिक्षणात मुलांपेक्षा जास्त मेहनत घेऊन टॉपला पोहोचत असतात.

त्यांच्याकडून लगेचच असून घरकामाची अपेक्षाच चुकीची आहे.

आई आणि बायको यांच्या पिढीतही फरक असतो.

त्यामुळे प्रत्येक मुलांनं स्वतःच्या पत्नीमध्ये आईचा प्रतिबिंब शोधणं थांबवलं पाहिजे.

५) ‘लाडावलेला लेक’ असेल तर तो करत असतो चुकीच्या गोष्टींचा प्रसार.

मुलांना स्वतःच्या पत्नीचा एक व्यक्ती म्हणून आदर करायला शिकवलं पाहिजे.

वेळच्या वेळी हा समज त्यांच्यात रूजवला नाही तर त्यांची वृत्ती अहंकारी राक्षसी होईल.

अशा राक्षसी वृत्तीच्या व्यक्तीबरोबर राहणं कुठलीही मुलगी पसंत करणार नाही.

ज्या मुलांच्या मनामध्ये पत्नी ही तुमची गुलाम नाही हे ठसवलं जात नाही तो मुलगा पत्नीकडून 24 तास सेवेची अपेक्षा करतो.

यासाठीच लहानपणापासून मुलांना लैंगिक समानतेविषयी शिकवायलाच हवं, तरंच पत्नी म्हणजे घरकाम करणारी, नव-याची २४ तास सेवा करणारी व्यक्ती हा चुकीचा समज पसरणार नाही.

लग्न झाल्यानंतर स्त्रीला समजून घेणारा साथीदार हवा असतो.

हुकूम सोडणारी व्यक्ती त्यांना आवडत नाही.

आधुनिक स्त्री वैवाहिक जीवनामध्ये समानता आणि साहचर्य शोधते.

आजच्या स्त्रीला जर हे मिळालं नाही तर ती एकटी राहण्याइतपत सक्षम असते.

तुमच्या लाडक्या लेकाचा संसार व्यवस्थित व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर लहानपणापासूनच त्याच्यावरती चांगले संस्कार घडवून स्त्रिचा आदर करायला, सन्मान करायला शिकवणं खूप महत्त्वाचं आहे.

सासूला आपली मैत्रीण बनवण्याच्या खास टिप्स

सूनही मैत्रीण बनू शकते, नाही पटत? मग वाचा हा विशेष लेख

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!