१८ वर्षाच्या विद्यार्थ्यांनं ई-बाईकचे केलं सौर सायकलमध्ये रूपांतर!

१८ वर्षाच्या विद्यार्थ्यांनं ई-बाईकचे केलं सौर सायकलमध्ये रूपांतर!
जे चालवण्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही!

गुजरातमधील वडोदरा इथल्या झेनिथ हायस्कूलमधल्या १२ वीच्या विद्यार्थ्याने म्हणजेच नील शाहने सौरऊर्जेवर चालणाऱ्या ई-बाईकचा असा एक नमुना तयार केला आहे, जो सूर्याच्या उर्जेच्या दुहेरी शक्तीवर आणि यांत्रिक शक्तीचं रूपांतर विदयुतशक्तीत करणा-या यंत्रावर चालतो.

आजकालचे तरुण करिअरचा निश्चित मार्ग शोधण्यासाठी ठाम निर्णय घेतात आणि वाटचाल करतात.

पण गुजरातमधील वडोदराच्या झेनिथ हायस्कूलमध्ये १२ वीत शिकणारा नील शाह हा फक्त नोकरी मिळवण्यासाठी शिकण्यापेक्षा आपल्या शिक्षणाचा योग्य वापर करण्यासाठी धडपडतो आहे.

त्याने स्थानिक जुन्या इलेक्ट्रिकल समानांचा वापर करून सौर बॅटरीवर चालणारी ई-बाईक बनवली.

तसं पहायला गेलं तर लहानपणापासूनच नीलला विज्ञानाची आवड होती.

सौरऊर्जा कशी कार्य करते? आणि लोकांच्या फायद्यासाठी अपारंपरिक ऊर्जा तयार करणाऱ्या यंत्रणा कशा कार्य करतात? यासारख्या प्रश्नांबद्दल त्याला नेहमीच उत्सुकता असते.

७ वीत असताना नीलने, ‘बेस्ट आउट ऑफ वेस्ट’ या गटात शाळेच्या स्पर्धेसाठी एकट्याने प्लास्टिकच्या बाटली आणि टाकाऊ पुठ्ठ्यातून हेलिकॉप्टर तयार केलं.

नीलच्या मनामध्ये शोधाचा किडा सतत वळवळत असल्यानं त्यानं या क्षेत्रातली आपली आवड जोपासण्यासाठी दहावीनंतर विज्ञान शाखा निवडली.

नीलने सांगितलं की त्याचे भौतिकशास्त्राचे शिक्षक संतोष कौशिक यांच्यामुळे त्याला या क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाली.

संतोष कौशिक यांनीच त्याला अभ्यास करण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी एक विषय निवडून दिला.

यामुळे नीलला काही व्यावहारिक अनुभव घेण्याची प्रेरणा मिळाली.

इंधनाच्या वाढत्या किमती आणि वादग्रस्त वीजबिल यांच्यामुळे सामान्य माणसाची होणारी दुरवस्था त्याला दिसत होती आणि त्याबद्दल काहीतरी करण्याची नीलची मनापासून इच्छा ही होती.

नीलने मग संशोधन करून इलेक्ट्रिक सायकलचा असा नमुना तयार केला ज्यामध्ये कोणतंही इंधन किंवा चार्जिंग खर्चाचा समावेश नाही, शिवाय प्रवाशांचा कार्बन फूटप्रिंट ही कमी होतो.

सायकल प्रकल्प

नीलचे वडील सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आहेत.

जेव्हा नीलने आपल्या वडिलांना, सौरऊर्जेवर चालणाऱ्या नवकल्पनांमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचं सांगितलं, तेंव्हा त्यांनी लगेच नीलला पाठिंबा दिला.

इतकचं नाही तर नीलच्या वडिलांनी नीलसाठी स्थानिक स्क्रॅप डीलरकडून एक सेकंड हँड ई-बाईक ही विकत घेतली.

नीलचा तो पहिलाच प्रयत्न होता आणि त्यात चूक होऊ शकते, याची त्याला पुर्ण कल्पना होती.

पण नील मागे हटला नाही, त्यानं प्रयत्न सोडले नाहीत फक्त 300 रुपये खर्च करुन त्यानं एक नमुना तयार केलाच.

पुढे, नीलनं १० वॅटचे २ सोलर पॅनेल, २ व्होल्ट बॅटरीची जोडी आणि डायनॅमो अल्टरनेटर विकत घेतले.

अशा प्रकारे सगळी गुंतवणूक रु. १२,००० पर्यंत पोहोचली.

डायनॅमो म्हणजे मोटर चालवणारे उपकरण जे टायरला जोडलेलं असतं.

जेव्हा चाक फिरतं तेंव्हा ते नैसर्गिक प्रवाहाद्वारे वीज निर्माण करतं.

याचा अर्थ असा आहे की सौर पॅनेल दिवसा बाईक चार्ज करते, तर डायनॅमो रात्री चार्ज करतं, ते ही एक पैचा ही खर्च न होता.

नीलने तयार केलेला हा नमुना रिले चार्जिंग सिस्टमवर कार्य करतो, म्हणजेच पॅनेल चालू असताना सुद्धा ते सूर्याखाली सक्रियपणे चार्ज होत रहातं.

नील सांगतो हे डिव्हाईस पूर्णपणे चार्ज व्हायला साधारण ८ तास लागतात आणि साधारण १५ किमी पर्यंत ते चालतं.

१८ वर्षाच्या विद्यार्थ्यांनं ई-बाईकचे केलं सौर सायकलमध्ये रूपांतर!

“तुम्ही जर पॅनेल किंवा बॅटरीची क्षमता वाढवली तर अंतर सुद्धा वाढतं, अशी माहिती ही नीलने दिली.

हे मॉडेल सुरु करण्यासाठी त्याला फक्त ३० दिवस लागले असले तरी, नीलनं स्पष्ट केलं की त्यातला अर्धा वेळ त्याला संशोधनासाठी द्यावा लागला.

या नूतनीकरणात यांत्रिक आणि विद्युत अभियांत्रिकीची जी तत्त्वं वापरली गेली, ती दोन्ही तत्त्वं त्याच्या शालेय अभ्यासक्रमाच्या बाहेरची होती.

“मला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे ते हे क्षेत्र नाही. मला भौतिकशास्त्रज्ञ व्हायचं आहे आणि त्याच विषयात मला पीएचडी करायची आहे.

पण या प्रकल्पाने मला अशी कौशल्ये शिकवली जी मला आयुष्यात मदत करतील आणि माझ्या सभोवतालच्या लोकांसाठी चांगल्या गोष्टी तयार करण्यासाठी प्रोत्साहन ही देतील” नीलनं आपला अनुभव सांगितला.

18 वर्षांच्या मुलानं या प्रकल्पात घेतलेली मेहनत, उत्कृष्टतेचा ध्यास, शिकण्याचा अनुभव आणि मिळालेलं यश यामुळे नीलच्या इच्छा शक्तीची कल्पना येते.

नीलने उत्पादनाचं मार्केटिंग करण्याची कोणतीही योजना अजून पर्यंत तरी जाहीर केलेली नाही.

पण सध्या नील स्वतः रोजच्या प्रवासासाठी आपल्या या नव्या बाइकचाच वापर करतो.

नीलसारख्या तरूणाईची ही सजगता, ही धडपड कौतुकाला नक्कीच पात्र ठरते , नाही का?

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “१८ वर्षाच्या विद्यार्थ्यांनं ई-बाईकचे केलं सौर सायकलमध्ये रूपांतर!”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय