गुळाचा चहा प्यावा? की टाळावा? याबद्दल आयुर्वेद तज्ञांचं मत काय आहे?

आयुर्वेद तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, चहा आणि गुळाच्या मिश्रणामुळे आम किंवा विषारी कचरा तयार होतो ज्याचा पचनावर विपरीत परिणाम होतो.
फिटनेसच्या बाबतीत जागरूक असणा-या उत्साही लोकांकडून साखरेऐवजी गूळ आणि मध यासारखे आरोग्यदायी पर्याय वापरण्याचा अलीकडचा ट्रेंड प्रचलित आहे.
कारण गूळ आणि मध हे नैसर्गिक गोडवा असणारे पदार्थ आहेत.
साखरेमुळे न मिळणारे आरोग्यासाठीचे फायदे गुळात आहेत.
बरेच जण आपल्या दिवसाची सुरुवात गुळाच्या गोड चहाने करतात.
आयुर्वेदानुसार, मात्र हे चुकीचं आहे.
प्राचीन औषधी पद्धतीनुसार, विरुद्ध आहार किंवा चुकीच्या अन्नाचं एकत्र सेवन केल्यामुळे अग्नी किंवा पचन खराब होऊ शकतं
आम किंवा विषारी कचरा शरीरात साठू शकतो, ज्यामुळे पचनावर आणखी विपरीत परिणाम होतो.
गूळ फायदेशीर आहे आणि त्यात, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम ही जीवनसत्त्वे असतात.
पण दुधाबरोबर गुळाचं मिश्रण हानिकारक ठरतं.
“आयुर्वेदानुसार, प्रत्येक खाद्यपदार्थाची स्वतःची विशिष्ट गुणवत्ता, चव, सामर्थ्य, पचनानंतरचे प्रभाव असतात,” असं आयुर्वेद तज्ञ नेहमी सांगतात.
दूध थंड तर गूळ उष्ण असतो.
जेव्हा तुम्ही गरम प्रकृतीचं अन्न विर्या’ शीत म्हणजेच थंड प्रकृतीच्या अन्नाबरोबर एकत्र करता तेंव्हा त्याच्या प्रकृतीमधल्या फरकामुळे ते विसंगत ठरतं.
जे लोक त्यांच्या चहासाठी निरोगी नैसर्गिक गोड पदार्थ शोधत आहेत, त्यांच्यासाठी आयुर्वेद तज्ञ मिश्री किंवा रॉक शुगरचा पर्याय सुचवतात.
कारण मिश्री हे दुधासारखे थंड आहे.
त्यामुळे गुळाचा चहा हा आरोग्यासाठी लाभदायक नाही हे लक्षात घ्या.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा