स्वयंपाक करण्यापूर्वी तांदूळ का भिजवावे?

१) भिजवलेले तांदूळ आणि त्याचे फायदे

सध्याच्या अतीवेगवान जीवनात, मायक्रोवेव्ह आणि ओव्हनसारखी उपकरणं आयुष्य सोपं करतात.

मात्र यामध्ये याचा विसर पडतो की स्वयंपाकाच्या पारंपारिक पद्धतींचे तुमच्या आरोग्यासाठी ही काही फायदे आहेत.

आज, तुम्ही फक्त तांदूळ धुता आणि विशिष्ट वेळ सेट करून मायक्रोवेव्ह करता, आणि तुम्हांला मिळतो फ्लफी भात.

पण,तुमच्या आई आजी मंद आचेवर भात तांदूळ चांगला भिजवल्यानंतर करायच्या.

त्या तुलनेत हे पुरें पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे का?

स्वयंपाक करण्यापूर्वी तांदूळ भिजवणे खरच महत्त्वाचे का आहे ते आम्ही आज तुम्हांला सांगणार आहे.

२) तांदूळ भिजवण्याचे आरोग्याला मिळणारे फायदे

प्रसिद्ध आहारतज्ञ आणि लेखिका ऋजुता दिवेकर, यांच्या मते, स्वयंपाक करण्यापूर्वी तांदूळ भिजवले तर त्यात पौष्टिक गुण टिकून रहायला मदत होते.

अन्ननलिकेला चालना मिळते आणि तांदळातील जीवनसत्त्वे आणि खनिजे शोषून घेणं सहज शक्य होतं.

भिजवलेले तांदूळ लवकर शिजतात आणि एक सुंदर फुललेला पोत तयार होतो, त्यातले सुगंधी घटक टिकतात.

३) प्राचीन गृहविज्ञान काय म्हणतं?

१२ व्या शतकाच्या सुरुवातीच्या ज्ञानकोशात एका संस्कृत मजकुरात, तांदूळ धुणं आणि भिजवणं ही एक आवश्यक पायरी आहे असं म्हटलेलं आहे.

कारण तांदूळ भिजवल्यावर त्याच्या वरचा, नको असलेला स्तर निघून जातो.भात मऊ होतो.

तांदूळ भिजवल्यामुळे स्वयंपाकाच्या प्रक्रियेला गती मिळते, कारण धान्य पाणी शोषून घेतं आणि उष्णता धान्याला आणखी मऊ करते.

४) फायटिक ऍसिड निघून जायला मदत मिळते.

तांदूळ भिजवले की फायटिक ऍसिड निघून जातं.

वनस्पतीच्या बियांमध्ये आढळणारा हा एक पदार्थ जो शरीरातील लोह, जस्त आणि कॅल्शियमचं शोषण बिघडवतो.

बिया, धान्य, शेंगा आणि काजूमध्ये फायटिक ऍसिड जास्त प्रमाणात आढळतं.

तांदळात फॉस्फरसची मात्रा असते जी खनिजांचं शोषण थांबवते.

झिंक आणि लोहाच्या कमतरता ज्यांना जाणवते त्यांनी योग्य पद्धतीने आहे तांदूळ भिजवून तो शिजवावा, असा सल्ला दिला जातो.

५) कोणत्या प्रकारचे तांदूळ भिजवण्यासाठी चांगले आहेत?

साधा छोटा तांदूळ साधा भात करण्यासाठी भिजवायला चांगला असतो.

तर पुलाव किंवा बिर्याणीसाठी वापरला जाणार्‍या लांब दाण्यातील बासमती आणि इतर सुवासिक तांदळाचे प्रकार जास्त भिजवू नयेत
कारण भिजवल्यामुळे तांदळाच्या दाण्याच्या अखंडतेवर परिणाम होतो.

६) तांदूळ नेमके किती वेळ भिजवायचे?

तांदळाच्या प्रकारानुसार आणि तांदूळ किती जुना आहे त्यावर तो किती भिजवावा हे ठरतं.

प्रत्येक तांदळाला वेगवेगळा वेळ लागतो.

तरी साधारणपणे तपकिरी, काळा, लाल आणि पॉलिश न केलेले तांदूळ ६ ते १२ तास आणि पॉलिश केलेले तपकिरी तांदूळ ४ते ६ तास भिजत ठेवावेत.

चिकट तांदूळ रात्रभर भिजवतात आणि बासमती, चमेली आणि सुशी तांदूळ १५ ते २० मिनिटे भिजवतात.

स्वयंपाकापुर्वी तांदूळ कसे भिजवावे हे नीट माहिती करून घेतलं तर भात किंवा पदार्थ उत्तम व्हायला मदत मिळते.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय