दुरदर्शन आणि मी

तसं बघायला गेलं तर दूरदर्शनच आणी माझं नातं खूप जुनं आहे. लहानपणी चे ते दिवस खुपच छान होते. रविवारी सकाळी ७ वाजता ‘रंगोली’ लागायची. तेव्हा मला एका गोष्टीचं खुप अप्रुप वाटायचं की host हेमा मालीनी प्रत्येक गाण्याच्या आधी साडी कशी काय change करते आणी इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तीच्याकडे येतात कुठुन… त्यानंतर विष्णु पुराण, रामायण, महाभारत या पौराणिक मालिका लागायच्या. तेव्हा माझा नियम असायचा की मी अंघोळ केल्याशीवाय देवाची मालिका पाहत नसायचो (खुपच भोळा होतो मी तेव्हा) मग नंतर अलीफ लैला, कैप्टन व्योम, अलीबाबा चलीस चोर आदी जादुच्या मालिका लगायच्या.
त्या काळामधे आख्या वस्ती मधे फक्त आमच्याकडेच टीव्ही होता (तो पण black and white) so सगळी वस्ती आमच्या घरी टीव्ही पहायला यायची. देवाची मालिका लागल्यावर तर सगळी म्हातारी लोकं देवांच दर्शन झालं की टीव्ही च्या पाया पडायची. शुक्रवार, शनीवारी रात्री हिंदी सिनेमा आणी रविवारी मराठी चित्रपट पाहताना आमचं घर कायम गजबजलेलं असायचं. मग तीथे माझा रुबाब चालायचा, जर कोनी माझ्याशी पंगा घेतला की माझी धमकी असायची… “घरी येच टीव्ही पहायला मग बघतो तुझाकडे.”
पण आमचं लहानपण गाजवलं ते ‘शक्तिमान’ ने. शनिवारी सकाळी ११ वाजता लागायचं आणी आमची शाळा पण ११ ला सुटायची. माझी शाळा २ किलोमीटर लांब होती. शाळा सुटली की पळत सुटायचो तरीपण १५ मिनिटांचा भाग बुडायचाच. मग छोटी छोटी मगर मोटी बाते आणि सॉरी शक्तिमान म्हणायचो आणि खेळायला सुटायचो. पण बरं झालं नंतर शक्तिमान रविवारी लागायला सुरवात झाली आणि आमच्या जीवात जीव आला.
हिंदी मुवी रात्री ९:३० ला लागायची, आणि एव्हड्या ऊशीरापर्यंत मी कधीच जागायचो नाही. जरी कधी जागलो तरी १० मिनिटांच्या वर कधी मुवी पहीला नसेल कारण इतक्या जहीराती लागायच्या की ते पाहुनच मी झोपायचो. मग दुसऱ्या दिवशी आई ला स्टोरी विचारायचो आणि आई संपुर्ण मुवी ची स्टोरी सांगायची. स्टोरी ऐकता ऐकता मी माझ्या मनाने मुवी imagine करायचो, माझ्या मनाचा मीच डायरेक्टर आणि संपुर्ण मुवी मी माझाच बनवायचो.
आँखें, सुराग, हमसे बचके रहना रे यांसारख्या मालिकांन्नी मनात वेगळी जागा निर्माण केली होती. त्या मालिकांच्या कुतुहला पोटी आमच्या मित्रांमधे तासंतास गप्पा रंगायच्या. मराठी मालिकांमधे ‘दामिनी’ ‘दम दमा दम’ ‘ताक धीना धीन’ ‘चालता बोलता’ यांन्नी तर संपुर्ण महाराष्ट्रावर राज्य केलं होतं.
तो काळच वेगळा होता. ती life खुपच मस्त होती. त्या दूरदर्शन आणि black and white टीव्ही ची जागा आत्ताचे smart TV आणी ५००+ channels कधीच घेऊ शकणार नाहीत.