पाच वर्षांची लढाई जिंकली आणि आता रेल्वेला द्यावे लागणार तब्बल २.५ कोटी रुपये

चुकीच्या गोष्टींच्या विरोधात लढणाऱ्या लोकांना बरेचदा इतरांची टीका सहन करावी लागते, कि हे उगाचच आपली शक्ती वाया घालवताय, यातून पुढे काहीही होणार नाही. पण असाच हा एक किस्सा
केवळ ३५ रुपयांच्या रिफंडसाठी ‘या’ व्यक्तीनं प्रशासनाला जागं केलं, आता रेल्वेने द्यायचे आहेत अडीच कोटी रुपये, जाणून घ्या कसे?
भारतीय रेल्वेकडून ३५ रुपयांचा परतावा मिळविण्यासाठी एका व्यक्तीनं आपली पाच वर्षांची लढाई जिंकली आहे.
यामध्ये त्या व्यक्तीने जवळपास ३ लाख लोकांना मदत केली.
रेल्वेनं २.९८ लाख IRCTC ( Indian Railway Catering and Tourism Corporation) च्या प्रवाशांना २.४३ कोटी रुपयांचा परतावा मंजूर ही केला आहे.
आपल्या आणि आपल्या बरोबरच्या ३ लाख लोकांसाठी वादविवाद करणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे सुरजीत स्वामी.
स्वामी म्हणाले की GST प्रणाली लागू होण्यापूर्वीच तिकीट रद्द केल्यावर सेवा कर म्हणून ३५ रुपये कापले जात होते.
सुरजीत स्वामींनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी माहिती अधिकाराचे ५० अर्ज दाखल केले. याशिवाय चार सरकारी विभागांना पत्रंही लिहिलं.
सुरजित स्वामी यांनी असा दावा केला की इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने त्यांच्या RTI उत्तरात म्हटले आहे की ते २.९९ लाख प्रवाशांना प्रत्येक तिकिटावर ३५ रुपये परत करतील.
ही सगळी रक्कम मिळून एकूण २.४३ कोटी रुपये होतात.
GST च्या नावाखाली रेल्वेनं पैसे कापले.
सुरजित स्वामी म्हणाले की, मी वारंवार ट्विट करत पैसे परत करण्याची मागणी केली.
मी पंतप्रधान, रेल्वे मंत्री, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, GST परिषद आणि वित्त मंत्रालय यांना टॅग केलं.
ज्याचा परिणाम असा झाला की २.९८ लाख प्रवाशांना त्यांचे हक्काचे ३५ रुपये परत मिळायला मदत झाली.
सुरजित स्वामी यांनी स्वतः २०१७ मध्ये रेल्वेतिकीट बुक केलं होतं.
स्वामी यांनी सांगितलं की २ जुलै २०१७ ला प्रवास करण्यासाठी ८ एप्रिलला गोल्डन टेंपल मेलमध्ये कोटा ते दिल्लीचे तिकीट त्यांनी बुक केलं होतं.
१ जुलैपासून जीएसटीची नवी प्रणाली देशभर लागू करण्यात आली.
स्वामी म्हणाले की सेवा कर म्हणून IRCTC ने त्यांच्याकडून ३५ रुपये जास्त कापले.
आपलं रेल्वे रिझर्वेशन रद्द करताना लखो प्रवाशांचे जास्तीचे ३५ कापून घेतले होते ते रुपये मिळवण्यासाठी स्वामींनी रेल्वे आणि अर्थ मंत्रालयाकडे RTI द्वारे ३५ रुपयांसाठी लढा सुरू केला.
RTI ला उत्तर देताना IRCTनं सांगितले होतं की, प्रवाशांचे ३५ रुपये परत केले जातील.
१ मे २०१९ला IRCTCनं प्रवाशांना ३३ रुपये परत केले आणि २ रुपये कापून घेतले.
त्यामुळे स्वामींचा लढा तिथेच संपला नाही.
त्यानंतर स्वामींनी पुढची ३ वर्षे २ रुपये परत मिळविण्यासाठी संघर्ष केला आणि नंतर त्यांना २ रुपये परत मिळाले.
मित्रांनो, न्यायासाठी सुरजित स्वामींनी चिकाटीने दिलेला हा लढा पाहून प्रश्न पडतो, खरचं आपण आपल्या हक्कासाठी सजग असतो का?
अशीच तुमचीही एखादी चुकीच्या गोष्टीला सुधारण्यासाठी लढा देण्याची, गोष्ट असेल तर कमेंट मध्ये शेअर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
मला २ वर्षांपूर्वी नोकरी गमवावी लागली आहे. मी न्यायालयीन लढाई करतोय.