आहारात रिफाईनड ऑइल वापरताय? जाणून घ्या असे करणे योग्य की अयोग्य?

तेल घाणा उद्योग माहिती

आहारात रिफाइंड ऑइलचा समावेश असावा का? रिफाइंड ऑइल शरीरासाठी हानिकारक आहे का?

तसे असेल तर रिफाइंड ऑइल ऐवजी आहारात कशाचा समावेश करावा?  या विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी  हा लेख शेवटपर्यंत वाचा.

भारतीय आहार पद्धतीत तेल हा स्वयंपाकघरातील एक प्रमुख घटक आहे.

आपल्या आहारातील बहुतांश पदार्थ तेलाच्या खमंग फोडणी शिवाय अपूर्ण असतात. तेलाचा वापर न करता बनवले जाणारे पदार्थ अगदी मोजके असतात.

बाकीच्या सर्व पदार्थांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तेल असतेच असते.

आपल्या स्वयंपाकाची सुरुवातच कढई किंवा पातेल्यात तेल घालून खमंग चुरचुरीत फोडणी करून होते. असे असताना आपण वापरत असलेले तेल आरोग्यासाठी चांगले असणे फार महत्त्वाचे ठरते.

आपण नेमके कोणत्या प्रकारचे खाद्यतेल वापरतो? ते आपल्या प्रकृतीसाठी चांगले आहे की वाईट हयाविषयी मूलभूत माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे.

भारतात फार पूर्वीपासून वेगवेगळी नैसर्गिक तेले आहारात वापरली जात असत. परंतु मध्यंतरीच्या काळात आधुनिकीकरणानंतर सगळीकडे रिफाइंड तेल वापरले जाऊ लागले. नैसर्गिक तेलाला येणाऱ्या एक प्रकारच्या वासामुळे ग्राहकांचा ते तेल वापरण्याचा कल कमी होऊन, वास विरहित, रंग विरहित आणि दीर्घकाळ टिकणारे रिफाईंड तेल लोकप्रिय होऊ लागले.

दीर्घकाळ टिकणाऱ्या रिफाइंड तेलाच्या वाढत्या मागणीमुळे तेल उत्पादकांनी देखील नैसर्गिक तेलांवर वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया करून मोठ्या प्रमाणात रिफाइंड तेलाची निर्मिती सुरू केली.

बाजारात सगळीकडे रिफाइण्ड तेल सहज उपलब्ध होऊ लागले आणि त्याचा खप आणखीनच वाढला.

रिफाईंड तेल नेमके कसे बनते?

नैसर्गिक तेलावर हायड्रोजनेशनची प्रक्रिया करून त्यात असणारे Liquid unsaturated fat याचे रूपांतर सॉलिड फॅटमध्ये केले जाते. असे केल्यामुळे ते तेल दीर्घकाळ टिकणारे बनते.

परंतु त्यामधील ट्रान्स फॅटचे प्रमाण अतिशय वाढल्यामुळे ते आरोग्यासाठी मात्र हानिकारक बनते.

त्याचप्रमाणे रिफाईनड व्हेजिटेबल ऑइल बनवताना खूप मोठ्या प्रमाणात उष्णता, प्रेशर आणि केमिकल पदार्थांचा वापर केला जातो.

असे करण्यामुळे तेलामध्ये असणारी नैसर्गिक गुणवत्ता आणि स्निग्धता जवळ जवळ नष्ट होते.

आहारात नियमितपणे रिफाइंड तेलच वापरले जात असेल  तर त्याचे शरीरावर खालीलप्रमाणे परिणाम होऊ शकतात. 

१.  हृदय आणि मेंदूवर होणारे परिणाम

नैसर्गिक तेलाचे रिफाइंड तेलात रूपांतर करताना अति उच्च तापमानाचा  वापर केला जातो.

त्यामुळे तेलातील पोषक घटक तर नष्ट होतातच, शिवाय रिफाइंड तेलात ट्रान्स फॅटचे प्रमाण खूप जास्त वाढते.

अशा तेलाचे नियमित सेवन केल्यामुळे  शरीरातील एल. डी. एल. म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसेराईडस आणि इन्शुलिनचे प्रमाण अतिशय वाढते, तर एचडीएल या चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.

शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे मेंदू आणि हृदयाकडे होणारा रक्तपुरवठा  कमी होऊ लागतो, त्यामध्ये अडथळा येऊ लागतो.

मेंदू आणि हृदयाकडे होणाऱ्या रक्तपुरवठा मध्ये अडथळा आल्यास किंवा रक्तामध्ये गुठळ्या निर्माण झाल्यास हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका असतो.

रक्त वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असल्यामुळे धाप लागणे, छातीत दुखणे अशी लक्षणे दिसू शकतात.

अतिशय गंभीर स्वरूपात जर हा आजार झाला तर जीवावर देखील बेतू शकते.

२. आतड्यांच्या आणि पचनसंस्थेच्या आरोग्यावर होणारा परिणाम

आपणा सर्वांना हे माहीतच आहे की omega-3 फॅटी ऍसिड हे शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात, तर ओमेगा 6 चे आहारातील प्रमाण कमी असणे आवश्‍यक असते.

परंतु रिफाइंड तेलात नेमके ओमेगा-3 चे प्रमाण कमी असून ओमेगा 6 चे प्रमाण जास्त असते.

असे असल्यामुळे दीर्घकाळ रिफाइंड तेलाचे सेवन केल्यास निरनिराळे पचनसंस्थेचे आजार, आतड्यांना आतून व्रण होणे, जखमा होणे, कोलायटीस सारखे आजार आणि प्रतिकारशक्ती कमी होणे असे परिणाम दिसून येतात.

म्हणूनच आहारातील ओमेगा थ्रीचे प्रमाण योग्य ठेवणे अतिशय आवश्यक असते. ओमेगा ३ चे योग्य प्रमाण असणारे तेल आहारात असणे फायदेशीर ठरते.

ओमेगा ३ फॅटी ऍसिडच्या कमतरतेची दुष्परिणाम आणि त्यासाठी आहारात कशाचा समावेश करावा याबद्दलच्या लेखाची लिंक शेवटी दिलेली आहे.

३. कॅन्सर सारखे गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. 

रिफाइंड तेलाच्या दीर्घकाळ सेवनाबाबत केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, दीर्घकाळ रिफाइंड तेलाचे सेवन करणाऱ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या कॅन्सरचे प्रमाण नैसर्गिक तेले खाणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आढळून आले आहे.

स्तनांचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग इत्यादी कर्करोग होण्याचे प्रमाण अशा लोकांमध्ये जास्त आढळून आले आहे.

याचाच अर्थ आपण वेगवेगळी रिफाईंड तेल आपल्या आहारातून वगळली पाहिजेत. 

आहारात कोणत्या तेलाचा समावेश असावा?

आपल्या आहारात नैसर्गिक पद्धतीने तयार केल्या गेलेल्या तेलाचा समावेश असावा. पूर्वापार आपल्याकडे लाकडी घाण्यावर काढलेले तेल खाण्याची पद्धत होती.

लाकडी घाण्यावर काढले गेलेले शेंगदाणा तेल, खोबरेल तेल , करडई तेल यांचा आपल्या आहारात आवर्जून समावेश करावा त्याचप्रमाणे ऑलिव ऑइल आणि जवसाचे तेल यांचादेखील आहारात समावेश असावा.

कोल्ड प्रेस ऑईल अशा नावाने ही नैसर्गिक तेले बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी योग्य तेलाचा आपल्या आहारात अवश्य समावेश करावा.

हल्ली लोकांचा तेलाचे आहारातील प्रमाण कमी करण्याकडे कल असतो. परंतु तेल आहारातून संपूर्णपणे बंद करणे किंवा त्याचे प्रमाण अतिशय कमी करणे देखील आपल्या आरोग्याला हानीकारक ठरू शकते.

योग्य प्रमाणात फॅट्स म्हणजेच चरबीचे सेवनदेखील शरीरासाठी आवश्यक असते. ते तेल आणि तूप यांच्या सेवनामुळे मिळते.

त्यामुळे आहारातून तेल संपूर्णपणे बाद करण्यापेक्षा, तसेच चुकीच्या तेलाचे सेवन करण्यापेक्षा आपल्या भारतीय आहार पद्धतीत पूर्वापार वापरली गेलेली नैसर्गिक तेले आपल्या आहारात आपण आणूया.

तुम्ही तुमच्या घरी स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरता आणि तुम्हाला त्याचे कसे अनुभव आले आहेत हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.

तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी हा लेख शेअर करायला विसरू नका.

ओमेगा -3 चे आहारातील प्रमाण योग्य राखण्यासाठी कसा आहार घ्यावा हे समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!