फ्रिज साफ करण्यासाठी सोप्या टीप्स

आपले घर म्हणजे आपली राहण्याची जागा. ती स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक असायला हवी.

घरातील वातावरण सुंदर, पवित्र असावे. सकाळी पूजा घरात दरवळणारा धूप, अगरबत्तीचा सुगंध, दरातील सुंदर रांगोळी, अंगणातील उमललेली तुळस, घरात रेंगाळणाऱ्या स्वच्छ प्रकाश. असे सुंदर वातावरण जिथे पाहायला मिळते ते घर, घर नाही मंदिरासारखे भासते. हो ना.

पण असे घर ठेवण्यासाठी घरातील फक्त स्त्री नव्हे तर सर्वांनीच स्वच्छ्ता ठेवली पाहिजे. घर नेहमी झाडलेले, पुसलेले, स्वच्छ आणि नीटनेटके असायला हवे. ही स्वच्छ्ता नेहमीच राखायला हवी.

पण पावसाळ्यात जास्तच जागरूक असायला हवे कारण पावसामुळे आजार पसरण्याची शक्यता दुपटीने वाढलेली असते. म्हणून निरोगी राहण्यासाठी स्वच्छ्ता महत्त्वाची असते.

ही स्वच्छ्ता फक्त किचनपुरती मर्यादित नसून घरातील किचनमधील प्रत्येक गोष्ट धुवून, पुसून स्वच्छ ठेवायला हवी. गॅसची शेगडी, हात पुसण्याचे कपडे, भांडे ठेवतो ते कपाट, पाणी साठवण्याची भांडी अगदी सगळेच स्वच्छ असायला हवे.

अशीच अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट जिथे आपण भाज्या, फळे, दूध, अन्नपदार्थ ठेवतो ती म्हणजे फ्रिज. फ्रिज ही कीचनमधील रोजच वापरात येणारी वस्तू आहे.

त्यामुळे किचनची साफसफाई जितकी महत्त्वाची तितकीच फ्रिजची सुद्धा. कारण आपले फ्रिज खराब असेल किंवा उघडल्यावर वास म्हणजेच दुर्गंधी येत असेल तर, त्यात ठेवलेले सर्व पदार्थ खराब होतात.

अन्न पदार्थात जंत वाढू शकतात. त्यामुळे किचन बरोबरच फ्रिजची स्वच्छ्ताही तितकीच महत्त्वाची असते.

आपण वेळीच योग्य पद्धतीने स्वच्छ्ता केली नाही तर आजार होण्याची शक्यता असते. शिवाय फ्रिज मधील अन्न पदार्थ वापरणे घातक ठरू शकते. म्हणून योग्य वेळी फ्रिज साफ करणे महत्त्वाचे आहे.

आजच्या लेखात बघुया फ्रिज साफ करण्याच्या काही सोप्या टीप्स

१. फ्रिज साफ करण्यापूर्वी पूर्ण रिकामा करून बटण बंद करा.

२. फ्रिज मधील सगळ्या भाज्या, फळे हवेशीर ठिकाणी ठेवा.

३. फ्रीज खाली एखादे जाड कापड किंवा कागद ठेवा म्हणजे फ्रिज खालची जागा साफच राहील.

४. फ्रिज डी फ्रॉस्ट करा म्हणजेच साचलेल्या बर्फापासून फ्रिज मोकळे करा. त्यामुळे बाहेर पडणारे पाणी सगळीकडे पसरणार नाही.

५. फ्रिजचा खूप वास येत असेल तर एका भांड्यात बेकिंग सोडा किंवा लिंबू रस मिसळा आणि त्याने आतील भाग पुसून घ्या.

७. फ्रिज मधील सर्व ट्रे बाहेर काढा आणि धुवून घ्या. नंतर कपड्याने कोरडे करून फ्रिज मधे ठेवा.

८. फ्रिजमध्ये लसूण कधीही उघडा ठेवू नका त्याने वास पसरतो.

९. सगळे खाद्य पदार्थ बंद डब्यात ठेवा.

१०. फ्रिज साफ करूनही वास येत असेल तर व्हिनेगरने साफ करून घ्या.

फ्रिज साफ कसा करायचा

अशा रीतीने फ्रिज साफ ठेवले तर फ्रीजमधील सगळेच अन्न पदार्थ छान राहतील. फ्रिजचा वास येणार नाही उलट फ्रिज छान चमकून जाईल.

तर अशा या साध्या सरळ आणि सोप्या पद्धतीने फ्रिज साफ करून घरातील वातावरण अजून सुंदर बनवा आणि निरोगी रहा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!