इंजिनीअरिंगचा हा विद्यार्थी पुण्याच्या रस्त्यावर फिरतो आणि त्याच्याशी बोलण्यासाठी लोकांना पैसे का देतो?

राज डगवार

सध्या संध्याकाळी ६ ते ११ च्या दरम्यान, तुम्ही कधी पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेज रोडच्या रस्त्यावर गेला आहात का?

जर कधी तुम्ही तिथं गेलात तर तुम्हांला एक वल्ली भेटेल जी तिथं हातात फलक घेऊन त्याच्याशी बोलणाऱ्या लोकांच्या शोधात फिरत असेल.

त्याच्याशी बोलल्यानंतर हा तरुण पैसै ही देतो. ही व्यक्ती आहे २३ वर्षीय इंजिनिअर राज डगवार.

पण हा तरुण त्याच्याशी बोलल्यानंतर पैसे का देतो असा प्रश्न तुम्हांला पडला असेल ना?

त्याचं उत्तर लॉकडाऊन काळातल्या रोजच्या एकटेपणाच्या, विलगीकरणाच्या नैराश्याच्या अनुभवाशी निगडित आहे.

लॉकडाऊनमध्ये वाढलेली चिंता आणि विलगीकरण अनुभवल्यानंतर, पुण्यातील राज डगवार यांनी खिळखिळं झालेल्या मानसिक आरोग्याला सुदृढ करण्याच्या एक प्रकारच्या मिशनला सुरुवात केली आहे.

राजच्या हातात असणाऱ्या फलकावर कोणतीही जाहिरात नसते.

“मला तुमची कथा सांगा, आणि मी तुम्हाला १० रुपये देईन” चक्क असं त्या फलकावर लिहिलेलं असतं.

राजना वाटतं लोकांच्या मनावर ओझं आहे. नैराश्याने ती त्रस्त आहेत यातून बाहेर पडण्यासाठी मोकळेपणानं बोलायला हवं, तरंच त्यांचं मानसिक आरोग्य जपलं जाईल.

लॉकडाऊनच्या काळात राज यांच्यासमोर जेंव्हा मानसिक आरोग्याची समस्या उद्भवली तेंव्हाच या उपक्रमाचा जन्म झाला.

राजना जेंव्हा मानसिक अस्थिरता आली तेंव्हा, नातेसंबंध बिघडले, वेगवेगळ्या चिंतानी घेरलं आणि विलगीकरणाच्या भावनेनं तर राजचं मानसिक स्वास्थ पार बिघडवून टाकलं.

जेव्हा राज मानसोपचार तज्ज्ञाकडे स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी गेले तेंव्हा, त्याच्या मित्रांनी मदत करण्याऐवजी त्याची थट्टा केली.

निराशेच्या काळात जवळच्या व्यक्तींचं हे वागणं राजच्या जिव्हारी लागलं.

मानसिक आरोग्यासाठी उपचार घेणा-यांवर जग हसतं, त्यांचं खच्चीकरण करतं, कुणीच त्या व्यक्तीच्या भावना समजून घेत नाही.

तो शेकडो लोकांच्या मनातलं दु:खं ऐकतात, रडतात आणि दिलासा देतात.

मानसिक स्वास्थ बिघडणं ही काही तुमची चूक नाही, यावर उपचार घेऊन बाहेर पडणं गरजेचं आहे.

तुमच्या जवळचे लोक तुमच्या उपचारांना हसले तरी हरकत नाही मानसिक आरोग्य जपणं हा प्रत्येकाचा हक्क आहे, असं राजना वाटतं.

खरंचं मित्रांनो गेल्या २ अडीच वर्षात सगळयाच लोकांना वेगवेगळे अनुभव आले आहेत.

त्यातून येणारी निराशा कुणासमोर उघड केली तर चेष्टा केली जाते.

म्हणूनच, राज डगवारसारख्या व्यक्तींची समाजाला अतोनात गरज आहे, जी व्यक्ती संवेदनशील मनानं व्यथा ऐकेल. मनाची घुसमट व्यक्त केल्यानंतर त्यावर न हसता हळूच फूंकर घालेल.

पुण्यात राज डगवार यांची भेट झाली तर त्यांच्याशी आवर्जून बोला, मन मोकळं कराच.

पण तुमच्या अवतीभवती निराशेने ग्रासलेली एखादी व्यक्ती असेल, तर तिचं दु:ख ऐकून घ्या, त्या व्यक्तीच्या नैराश्यावर हसू नका, त्या व्यक्तीला थोडासा वेळ द्या.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

1 Response

  1. Deepak joshi says:

    Khup chan karat ahe dusryache dukha aikaylahi man lagte khup kahi bolayche aste pan sangnar kunala tasa vyakti javal hava na far kami lok astat je dusrryache dukha samjun ghetat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!