नयनरम्य बृहडेश्वराच्या शिवमंदिराची विस्मयकारक माहिती वाचा या लेखात

भारतातील मंदिर हा एक अभ्यासाचा विषय आहे. अनेक वर्षे, शतके उलटून गेल्यावर पण त्यांच्या सौंदर्यात कमी तर सोडाच उलट भर पडत आलेली आहे.

किंबहुना २१ व्या शतकात जेव्हा तंत्रज्ञान एका उच्च पातळीवर पोहचलेल आहे तेव्हा त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जेव्हा आपण ह्या मंदिरांकडे बघू तेव्हा श्रद्धेचं घर असलेली हि मंदिरे आपल्याला वेगळीच जाणवतात.

त्यांना उभारताना त्यात जे प्रगत तंत्रज्ञान आणि विद्वत्ता वापरली गेली ते आजही कोड्यात टाकणारं आहे. पण त्याला आज ह्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून बघितलं तर त्याचे सौंदर्य वेगळे जाणवते आणि आपण त्या विद्वत्तेपुढे नतमस्तक होतो. मंदिरांचं विज्ञान हि लेखमाला अश्याच भारतातील मंदिरांचा वेध घेणार आहे. आज येथे आपण बृहडेश्वराच्या शवमंदिराबद्दल बोलू.

तामिळनाडू राज्यात असलेलं बृहडेश्वराचं शंकराला समर्पित असलेलं मंदिर आजही एका अतिशय प्रगत, श्रीमंत अश्या राजवटीचे अस्तित्व आपल्यासोबत घेऊन तब्बल एक हजार वर्ष उभं आहे.

ह्या मंदीराच निर्माण म्हणजे आजही विज्ञान आणि तंत्रज्ञानाला केलेला कुर्निसात तर आहेच पण त्या सोबत विज्ञान आणि कलेचा सुंदर मिलाफ आहे. ह्या मंदीराच निर्माण राजा चोला एक ह्याने केल.

बृहडेश्वराच्या मंदिर निर्माणाची सुरवात साधारण १००३ साली झाली आणि १०१० मध्ये ते पूर्णत्वाला गेल. ह्या मंदिराची अनेक वैशिष्ट्य आहेत. भारतातील सगळ्यात मोठ्या शंकराच्या पिंडी पेकी एक पिंडी ह्या मंदिरात आहे. पण त्या पलीकडे ह्या मंदिराचं बांधकाम म्हणजे तंत्रज्ञान, विद्वत्ता आणि श्रद्धा ह्याचा अविष्कार आहे.

मंदिराच्या बांधकामात अनेक गोष्टींचा प्रचंड खुबीने वापर केला गेला आहे. ते समजून घेणं म्हणजेच ह्या मंदिराकडे वैज्ञानिक दृष्टीने बघण. बृहडेश्वराच मुख्य मंदिर बनवलं गेल आहे ग्र्यानाईट दगडामधून.

ह्या मंदिराच्या निर्माणासाठी तब्बल १३०,००० ( एक लाख तीस हजार टन ) वजनाचा ग्र्यानाईट दगड वापरला गेला आहे. हा आकडा चकित करणारा नाही स्तिमित करणारा आहे.

इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात सगळ्यात कठीण असा खडक ग्र्यानाईट वापरताना हे मंदिर भव्य दिव्य असेल ह्याचा विचार निर्मिती करताना केला गेला. ग्र्यानाईट हा दगड आजही सगळ्यात कठीण दगड मानला जातो. ह्याला तोडण्यासाठी आजही अतिशय प्रगत कटर ना सुद्धा हा दगड कटिंग करताना वेळ लागतो.

त्याकाळी ह्या महाकाय ग्र्यानाईट दगडांना आकार देण्यासाठी त्यांना फोडण्यासाठी लाकूड, पाणी ह्यांचा वापर केला गेला. दगडात काही अंतरावर भोक करून त्यात लाकूड भरलं जात असे. त्यावर पाणी टाकून लाकडाला ओलं ठेवल जात असे. पाण्यामुळे फुगलेल्या लाकडामुळे दगडावर प्रचंड दाब निर्माण होत असे.

असा दाब काही काही अंतरावर निर्माण करून कालांतराने पूर्ण दगड हवा तसा चिरला जात असे. असं करत ह्या मंदिरातील दगडांना हवा तसा आकार दिला गेला.

ह्या मंदिरापासून जवळपास १०० किलोमीटर च्या त्रिज्येत कुठेच ग्र्यानाईट हा दगड मिळत नाही. म्हणजे मंदिर निर्माणासाठी लागणारा हा दगड १०० किलोमीटर किंवा त्याहून जास्ती अंतरावरून आणला गेला असणार म्हणजे ह्या महाकाय वजनदार ग्र्यानाईट दगडाच्या शिळ्या वाहून आणण हेच एक मोठ अग्निदिव्य ठरलं असेल.

असे म्हंटले जाते कि १००० पेक्षा जास्त हत्ती ह्या कामासाठी वापरले गेले असतील. हे दगड मंदिर निर्माण ठिकाणी आणून त्यांना योग्य तो आकार देणं हा तर ह्या मंदिराच्या बांधकामातला एक छोटा भाग झाला. हे महाकाय दगड रचून २०० फुटा पेक्षा जास्त मुख्य विमानम् बनवणं म्हणजे तंत्रज्ञानाचा अत्युच्य अविष्कार आहे.

दक्षिण मेरू म्हणजेच विमानम् आतून पोकळ आहे आणि बाहेरून दगड रचून पूर्ण बांधकाम केलं गेलं आहे. ह्यात दगड एकमेकांना सांध्यात जोडताना कोणतही बाइंडिंग मटेरियल वापरण्यात आलेल नाही. म्हणजे जसं आजच्या काळात सिमेंट वापरले जाते.

कोणत्याही बाइंडिंग मटेरियल शिवाय हे कोरलेले दगड एकमेकात जोडून २०० फुटापेक्षा जास्ती उंची त्याला देण्यात आलेली आहे. आज जरी हि उंची कमी वाटली तरी १००० वर्षापूर्वी भारतातील काय जगातील सगळ्यात उंच मानवनिर्मित वास्तु हि असू शकेल.

आज केलेल बांधकाम १०० वर्ष टिकू शकत नाही तिकडे हे मंदिर १००० वर्षापेक्षा जास्ती काळ उन, वारा, पाउस ह्या शिवाय ६ मोठ्या भूकंपांना (जे कि मोजले गेले त्या आधीच माहित नाहीत किती असतील ते) पुरून उरून आजही दिमाखात उभं आहे.

brihadeshwara-temple-plan
बृहडेश्वर मंदिराचा आराखडा

ह्या दक्षिण मेरू च्या वर एक गोल घुमट बसवलेला आहे. ज्याचं वजन प्रचंड असं ८० टन ( ८०,००० किलोग्राम ) इतकं आहे. हा एकसंध दगड इतक्या उंचीवर कसा नेला असेल हे अजूनहि न उलगडलेल कोडं आहे.

मुख्य विमानम् किंवा दक्षिण मेरू १६ मजली आहे. त्यात १३ मजले हे तिरके असून त्याच्या वर हा दगड बसवलेला आहे. हे पूर्ण बांधकाम आतून पोकळ आहे. म्हणजे पूर्ण वजन हे बाहेरील दगडांनी पेलून धरलेलं आहे.

काळाच्या ओघातहि हे बांधकाम आपलं वैशिष्ठ आपल्या सौंदर्यासोबत टिकवून आहे. इकडे फक्त तंत्रज्ञान आणि आकार ह्या बद्दल बोललो आहे. ह्यावर असणारी कलाकुसर आणि शिल्पकला हा वेगळाच विषय आहे. म्हणजे बांधकाम भव्यदिव्य करताना त्यात कलाकुसरहि जपली गेली आहे.

हे सगळं विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि स्थापत्यशास्त्र ह्याच्या अभ्यासाशिवाय शक्यच नाही. असा दगड जो वजनाचा स्ट्रेस घेऊ शकेल. त्याचं गणित करून होणारं बांधकाम त्याच सोबत तयार निर्माण होणारी कलाकारी त्यातून हे भव्य दिव्य सौंदर्य काळाच्या ओघात टिकून राहील ह्यासाठी केला गेलेला विचार हे सगळच एका भव्यदिव्य संस्कृतीचं द्योतक आहे.

हे तर झालं मंदिराच्या वरचं तंत्रज्ञान. बृहडेश्वराच मंदिर अजून एका गोष्टीसाठी आपल्याला खिळवून ठवते ते म्हणजे मंदिराच्या खाली असलेली भुयारी रचना.

ह्या मंदिरात १०० पेक्षा जास्त भुयार आहेत. ह्यातील अनेक भुयार वेगवेगळ्या ठिकाणी उघडतात. भूयारांच्या रचनेत एकात दुसरा असे अनेक रस्ते असून ती वेगवेगळ्या दिशेने गेलेली आहेत.

ह्यातील भुयार राजाच्या घरात तर काही मंदिरात तर काही तंजोर च्या विविध ठिकाणी उघडतात. तसेच रस्ता चुकल्यास त्यात धोका हि उदभवू शकतो अशी भूयारांची रचना केली आहे.

हे मंदिर तंत्रज्ञानात आणि विज्ञानात सरस आहेच पण कलेच्या बाबतीत हि उत्कृष्ठ आहे. ह्या मंदिरातील चित्र आजही त्यांचे खरे रंग राखून आहेत. १००० वर्षानंतर पण त्यांच्या सुंदरतेत कोणतीही कमी आलेली नाही.

हे रंग कसे बनवले गेले असतील ह्यावर आजही संशोधन सुरु आहे. जगातल पाहिलं रॉयल पोट्रेट हि इकडे आजही आहे. राजा चोला आपल्या गुरूची भक्ती करतांनाच चित्र आजही आपल्या गुरु प्रती आदरभाव व्यक्त करताना ते सर्व भाव बघणाऱ्याकडे आजही १००० वर्षानंतर पोहचतात ह्यातच त्या कलेचे समर्पण दिसून येते.

राजा चोला ने ह्या मंदिरात अनेक दागदागिने, सोन, हिरे, अनेक जवाहीर दान केले होते ह्याचे पुरावे इथल्या शिलालेखात आढळून येतात.

मंदिराचं निर्माण करणं हे फक्त दैवी शक्तींनी शक्य नव्हतं तर त्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड दिली गेली होती. म्हणूनच बृहडेश्वरा सारखं मंदिर साकारलं जाऊ शकलं.

देवावर श्रद्धा असली तरी अश्या एखाद्या भव्यदिव्य कलाकृतीची कल्पना करणं आणि ती प्रत्यक्षात साकारणं हे विज्ञान आणि तंत्रज्ञाना शिवाय अशक्य आहे.

हे उभारताना सर्वोत्तम विज्ञान आणि तंत्रज्ञान वापरलं गेलच पण त्यापलीकडे त्याचा अभ्यास हि केला गेला. कारण काळाच्या कसोटीवर आजही आपल वैभव दाखवत तब्बल १००० वर्ष उभं असलेल हे मंदिर भारताच्या एका प्रगत संस्कृतीचा सर्वोत्तम आरसा आहे.

Manachetalks

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय