जाणून घ्या अंडी खाण्याचे दहा आरोग्यदायी फायदे | आणि अंडे उकडून का खावे?

अंडी – एक सुपर फूड

टीव्हीवर अंड्यांची जाहिरात करताना असे म्हणतात की ‘ संडे हो या मंडे रोज खाओ अंडे‘

ही जाहिरात तर आपण नेहेमी पाहतो पण ती आचरणात आणतो का?

जाहिरातीत म्हटले आहे ते एका अर्थी ते खरेच आहे. आहारात नियमितपणे अंड्यांचा समावेश करणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे दररोज अंडी खाणे किंवा आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस अंडी खाणे नक्कीच उपयोगी ठरते.

जगभरात सगळीकडे अंडे हे सुपरफुड मानले गेले आहे. अतिशय पौष्टिक आणि चवदार असणारे अंडे जगभरात सगळीकडे लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे.

अंडी नुसती उकडून, कमी तेलात शिजवून किंवा ओम्लेट/ करी अशा स्वरूपात खाल्ली तरी ती सारख्याच प्रमाणात पोषण देतात. त्यामुळे अंड्याचे विविध पदार्थ हे खवय्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत.

चवदार असणारे हे अंडे पोषक आणि आरोग्यदायी सुद्धा आहे ही किती चांगली गोष्ट आहे ना!

आज आपण अंडी नियमित स्वरूपात खाण्याचे आरोग्यासाठी नेमके कोणते फायदे होतात ते सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

अंडी खाण्याचे दहा फायदे

१. अतिशय पौष्टिक

अंडे हे अतिशय पौष्टिक आहे. एक संपूर्ण अंडे म्हणजे संपूर्ण पोषण आहे. जगभरात बहुतेक सर्व देशात अंडी सकाळी न्याहारी करताना खाल्ली जातात. कारण शरीराला जेव्हा भरपूर प्रमाणात न्यूट्रिशनची गरज असते तेव्हा अंडी खाल्ली तर त्याचा खूप मोठा फायदा होताना दिसतो.

एका मोठ्या उकडलेल्या अंड्याचे घटक खालीलप्रमाणे

विटामीन ए : ६%

फोलेट : ५%

विटामीन बी ५ : ७%

विटामीन बी १२ : ९%

विटामीन बी २ : १५ %

फॉस्परस : ९%

सेलेनियम : २२ %

ह्याशिवाय उकडलेल्या अंड्यामध्ये विटामीन डी , ई , के, बी ६ , कॅल्शियम आणि झिंक

देखील असते.

एका अंड्यामध्ये ७७ कॅलरी असतात. ६ ग्राम प्रोटीन आणि ५ ग्राम हेल्दी फॅट्स असतात.

तर अशा प्रकारे अंडे हा एक परिपूर्ण पोषक आहार आहे.

२. रक्तातील कॉलेस्ट्रॉलचे एकूण प्रमाण वाढू देत नाही

अंडे हा खरंतर जास्त कोलेस्ट्रॉल असणारा पदार्थ आहे. परंतु अंड्याचे वैशिष्ट्य असे की ह्याच्या सेवनामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे एकूण प्रमाण वाढत नाही. त्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावण्याचा धोका उरत नाही.

३. HDL हे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते

शरीरातील HDL किंवा चांगले कोलेस्ट्रॉल योग्य प्रमाणात असणे अतिशय आवश्यक आहे. कारण त्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो. नियमित अंडे खाण्यामुळे हे HDL चांगल्या प्रमाणात वाढते असे दिसून आले आहे. ह्याचाच अर्थ असा की नियमितपणे अंडी खाल्ल्यास शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढून वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते. हे चांगल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे.

४. कोलीन नावाचे पोषकद्रव्य मिळते

कोलीन नावाचे पोषकद्रव्य जे अतिशय दुर्मिळ आहे आणि सहसा इतर कुठल्या अन्नपदार्थामधून मिळत नाही ते अंडी खाण्यामुळे मिळते. हे पोषणद्रव्य मेंदूच्या कार्याशी निगडीत आहे. मेंदूचे आरोग्य चांगले राखण्यासाठी ह्या पोषकद्रव्याचा उपयोग होतो. त्यामुळे त्याचे योग्य प्रमाण शरीरात असणे अतिशय आवश्यक आहे. एका अंड्यामध्ये १०० मिलिग्राम इतके कोलीन मिळते.

५. हृदयविकाराचा तसेच स्ट्रोकचा धोका कमी होतो

शरीरातील LDL नावाचे कोलेस्ट्रॉल जे वाईट कोलेस्ट्रॉल म्हणून समजले जाते त्याचे प्रमाण कमी असणे हे शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते. जर हे प्रमाण वाढले तर रक्तात गुठळी होणे, रक्तवाहिन्या आकुंचन पावणे असे परिणाम होतात. असे झाल्यास शरीरातील रक्ताभिसरण नीट न होऊन हृदयविकाराचा अथवा पक्षाघाताचा झटका येऊ शकतो. नियमित अंडे खाण्यामुळे ह्या वाईट कोलेस्ट्रॉलचे शरीरातील प्रमाण कमी होते आणि त्यामुळे हृदयविकाराचा तसेच स्ट्रोकचा धोका टळतो.

६. डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त

वयोपरत्वे दृष्टी कमी होणे किंवा मोतीबिंदू होणे ह्या अगदी कॉमन समस्या आहेत. परंतु आहारात सुरुवातीपासून नियमित अंडे सेवन केले असता हा धोका कमी होतो. अंड्यामध्ये ल्यूटीन आणि झिक्झांथिन नावाचे अॅंटी आक्सिडेंट असते ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते तसेच मोतिबिंदुचा धोका कमी होतो. शिवाय अंड्यामध्ये विटामीन ए असते, तेदेखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

७. प्रोटीनयुक्त आहार

अंडी हा अर्थातच प्रोटीनयुक्त आहार आहे. प्रोटीन आपल्या शरीराच्या मासपेशी घडवण्यासाठी आवश्यक असते. म्हणजेच शरीर सुदृढ होण्यासाठी योग्य प्रमाणात प्रोटीन घेणे आवश्यक असते जे अंडी खाण्यामुळे मिळते. म्हणूनच कसरतपटू आणि अॅथ्लीट नियमित अंडी खातात.

८. पोटभरीचे खाणे

अंडी खाल्ल्यामुळे पोटभर खाणे खाल्ल्यासारखे वाटते. भूक भागते. त्यामुळे कमी खाऊन देखील पूर्ण आहार घेतला असे वाटते. तसेच अंडे हा परिपूर्ण आहार असल्यामुळे नुसते अंडे जरी खाल्ले तरी शरीराला सर्व प्रकारचे पोषण मिळते.

९. वजन कमी करण्यासाठी उपयोगी

अंडे अतिशय पोषक असून त्यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते हे आपण पाहिलेच आहे. वजन कमी करताना असा आहार घेण्याचा सल्ला दिला जातो ज्यामध्ये कार्बस् कमी असून प्रोटीन जास्त असतील. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी भरपूर प्रोटीनयुक्त आणि चवदार असणारी अंडी हा एक चांगला उपाय आहे.

१०. रक्तातील ट्रायग्लिसराईडचे प्रमाण कमी करते

अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात omega-3 फॅटी ॲसिड असते. ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मुळे रक्तातील ट्रायग्लिसराईडचे प्रमाण नियंत्रणात राहते. आहारात नियमितपणे अंड्यांचा समावेश केल्यास शरीराची ओमेगा थ्री फॅटी ऍसिडची गरज पूर्ण होते आणि त्यामुळे रक्तातील ट्रायग्लिसराईडचे प्रमाण नियंत्रणात राहते. ह्याचा हृदयाच्या आरोग्याला फायदा होतो.

तर हे आहेत आहारात नियमितपणे अंड्यांचा समावेश करण्याचे दहा आरोग्यदायी फायदे.

मित्र-मैत्रिणींनो, तुम्ही देखील तुमच्या हा आहारात अंड्यांचा नियमित समावेश करा आणि हे आरोग्यदायी फायदे मिळवा. तसेच तुम्ही अंड्याचा समावेश तुमच्या आहारात कशा प्रकारे करता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख नक्की शेअर करा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय