नियमितपणे प्या हळदीचे दूध, होतील आश्चर्यकारक फायदे

हळदीचे दूध मुलांसाठी खूप फायदेशीर आहे, त्यातून हे ४ फायदे मिळतात.

तुमच्या स्वयंपाकघरातला एक महत्त्वाचा घटक हळद हा एक अद्भुत मसाला आहे.

हळदीमुळे भाज्यांना फक्त उत्कृष्ट रंगच मिळत नाही तर तुम्हांला अनेक आरोग्यदायी फायदेसुद्धा मिळतात.

दुधात जर हळद मिसळली तर त्याचे फायदे जास्त पटीने मिळतात.

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, जेंव्हा तुम्ही खूप थकता किंवा किरकोळ दुखापत होते तेव्हा तुमची आई तुम्हांला हळदीचं दूध देते.

ज्यामुळे तुम्हांला आराम मिळतो.

याचं कारण हेच की हळदीमध्ये बरेच औषधी गुणधर्म असतात.

आरोग्याच्या अनेक समस्यांपासून मुक्त होण्यासाठी पारंपारिक औषधांमध्ये हळदीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

सर्दी आणि खोकल्यासारख्या विषाणूजन्य संसर्गावरही रामबाण उपाय आहे.

हळदीच्या दुधाचं सेवन करणे हा हळदीपासून फायदे मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.

पण तुम्हाला माहित आहे का? हळदीचं दूध फक्त मोठ्या व्यक्तींसाठीच नाही तर लहान मुलांसाठीही खूप फायदेशीर आहे.

लहान मुलांना अनेकदा छोट्या छोट्या समस्यांनी घेरलेलं असतं.

जर तुम्ही अर्धा चमचा हळद पावडर, १ ग्लास दुधात मिसळून प्यायलं, तर मुलांच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा होते.

या लेखात आम्ही तुम्हाला हळदीचं दूध पिण्याचे देण्याचे ४ महत्त्वाचे फायदे सांगणार आहोत.

१) त्वचेच्या जखमा लवकर भरतात.

आपली त्वचा अतिशय नाजूक असते. बऱ्याच वेळा काही कारणाने अंगावर किरकोळ ओरखडे किंवा जखमा होतात.

त्वचेवर जखमा झाल्या तर त्वचा जळजळते.

अशा वेळो दूधात हळद घेतली तर जखम लवकर बरी व्हायला मदत होते.

हळदीतील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म जंतुनाशक म्हणून काम करतात.

हे जखमेच्या जलद उपचारांनासुद्धा मदत करतं.

२) प्रतिकारशक्ती मजबूत करते.

जेव्हा हवामानात बदल होतो, तेव्हा त्या काळात लहान मुलं किंवा मोठी माणसं सुद्धा पटकन आजारी पडतात.

लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते त्यामुळे ते विषाणूंना सहज बळी पडतात.

हळद व्हायरल इन्फेक्शनशी लढायला मदत करते.

याशिवाय पांढऱ्या रक्त पेशी वाढवायला ही हळद उपयुक्त आहे.

हळदीचे दूध प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊन आजार बळावण्याचं प्रमाण कमी होतं.

३) ऍलर्जी आणि श्वसनाच्या समस्या कमी करते

लहान मुलांमध्ये ऍलर्जी असणं खूप सामान्य आहे.

लहान मुलांना काही पदार्थ, औषधं, कीटक, धूर किंवा पाळीव प्राण्यांची ऍलर्जी असू शकते.

यामुळं त्वचेचा संसर्ग, छातीत घट्टपणा, श्वासोच्छवासाचा त्रास, फुफ्फुसाचा त्रास, दमा किंवा अतिसार अशा समस्या उद्भवू शकतात.

हळदीचे दूध मुलांमध्ये ऍलर्जीचा धोका कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतं.

हळदीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असतं.

त्यामुळे शरीराला हायड्रेटेड ठेवायला आणि शरीरातील द्रवपदार्थांचं संतुलन राखायलाही मदत होते.

हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन जळजळ कमी करतं आणि फुफ्फुसांचे कार्य सुधारायला मदत करतं.

त्यामुळे श्वास लागणे आणि दम्यासारख्या समस्यांचा धोकाही कमी होतो.

४) पचन सुधारते

ज्यांची पचनशक्ती कमजोर असते त्यांना उलट्या, जुलाब, पोटदुखी अशा समस्या नेहमी जाणवतात.

हळदीच्या दुधाचं सेवन केल्यामुळे आतड्यातील जळजळ कमी व्हायला मदत होते.

तसेच पोटातून गॅस बाहेर पडायला मदत होते.

रोज सकाळच्या न्याहारीत हळदीच्या दुधाचा समावेश करणं म्हणजे निरोगी जीवनशैली आत्मसात करण्याचा एक अतिशय प्रभावी उपाय आहे.

दूध पिताना त्यात अर्धा चमचा हळद आवर्जून घाला. स्वस्थ राहा मस्त राहा!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय