पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे होणारे साथीचे आजार दूर करण्यासाठी ‘हि’ काळजी घ्या

monsoon diseases

जाणून घ्या पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारांची सविस्तर माहिती.

सध्या महाराष्ट्रात सगळीकडे पावसाने थैमान घातले आहे. बहुतांश ठिकाणी पुरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी पुराच्या पाण्यामुळे किंवा पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे वेगवेगळे आजार पसरतात.

आज आपण पावसाच्या पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. अशा साचलेल्या पाण्यामुळे नेमके कोणते आजार होतात? त्याची लक्षणे कोणती हे माहिती करून घेण्यासाठी हा लेख लक्षपूर्वक वाचा. तसेच ह्या आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी लेखाच्या शेवटी दिलेले उपाय नक्की करा.

थोडा जरी पाऊस पडला तरी हल्ली लगेच सगळीकडे पाणी साठतं. अशा वेळी त्या पाण्यात खेळणे, पावसात भिजणे हा बच्चेकंपनीचा आवडता खेळ असतो. चाकरमानी लोकांना अशा पावसात भिजत ऑफिस गाठण्यावाचून पर्याय नसतो.

परंतु आपण सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे की पावसाच्या अशा साचलेल्या पाण्यामुळे किंवा पुराच्या शहरात शिरलेल्या पाण्यामुळे वेगवेगळे आजार पसरतात. त्यामुळे शक्यतो अशा पाण्यात भिजणे टाळावे. मुलांना फार वेळ अशा पाण्यात भिजू, खेळू देऊ नये. अन्यथा साथीच्या रोगांची शिकार व्हावे लागण्याची शक्यता असते.

पावसाळ्यात मुख्यतः २ प्रकारचे आजार पसरतात. दूषित पाणी आणि अन्नामुळे पसरणारे आजार आणि डास किंवा इतर किडयांमुळे पसरणारे आजार. त्याचबरोबर त्वचेच्या आजारांचे प्रमाण देखील पावसाळ्यात वाढलेले आढळून येते.

पावसाळ्यात दूषित अन्न आणि पाण्यामुळे कॉलरा, डिसेंट्री आणि लेप्टोस्पायरोसिस यासारखे आजार होऊ शकतात. तसेच डासांमुळे आणि इतर कीटकांमुळे  मलेरिया,  डेंग्यू आणि काविळी सारखे आजार होऊ शकतात.

सोरायसिस हा त्वचेचा आजार तसेच डोळे येणे किंवा डोळ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन होणे असे आजार सुद्धा होऊ शकतात. मलेरिया आणि टायफाईड यासारखे आजार साचलेल्या पाण्यामुळे भराभर पसरून त्याचे साथीत रुपांतर होऊ शकते.

आज आपण या आजारांची लक्षणे जाणून घेऊया.

१. डिसेंट्री किंवा अतिसार

डिसेंट्री किंवा अतिसार झाला म्हणजे आतड्याला मोठ्या प्रमाणावर इन्फेक्शन होऊन जुलाब होतात. काहीवेळा शौचावाटे रक्त देखील पडते.

या आजाराची लक्षणे खालील प्रमाणे

१.  पोटात मुरडा येऊन दुखणे.

२.  मळमळणे

३.  उलटी होणे

४.  १०० पेक्षा जास्त ताप असणे

एक प्रकारच्या बॅक्टेरिया मुळे होणारा हा आजार दूषित अन्न आणि पाण्यामुळे पसरतो. या आजारात पेशंटच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे  आजाराचे गांभीर्य वाढते.

या आजाराची लक्षणे खालील प्रमाणे

१.  सौम्य ताप

२.  अंगदुखी

३.  पोटात मुरडा येऊन दुखणे

४.  अतिशय थकवा येणे

५.  खूप तहान लागणे

६.  डोकेदुखी

७.  त्वचा कोरडी पडणे

३.  डेंग्यू

डासांमुळे पसरणारा डेंग्यू हा एक व्हायरल आजार आहे. डेंग्यूचे डास चावल्यामुळे हा आजार होतो. हा एक संसर्गजन्य आजार आहे.

या आजाराची लक्षणे खालील प्रमाणे

१.  खूप तीव्र ताप

२.  त्वचेवर चट्टे उठणे

३.  स्नायू दुखणे

४.  सांधे दुखणे

५.  तीव्र डोकेदुखी

४.  डोळे येणे ( conjunctivitis )

पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांमध्ये डोळे येणे किंवा conjunctivitis  या आजाराचा  प्रामुख्याने समावेश होतो.  या आजारात डोळ्यातील कॉर्नियाच्या बाहेरील बाजूला इन्फेक्‍शन होते.

या आजाराची लक्षणे खालील प्रमाणे

१.  डोळ्याचा पांढरा भाग लाल होणे

२.  सतत डोळ्यात पाणी येणे

३.  डोळ्यातून सतत पिवळ्या रंगाची घाण बाहेर पडणे

४.  डोळ्यांना खाज सुटणे

५.  डोळ्यांची आग होणे

६.  धूसर दिसणे

७.  डोळ्यांना उजेड सहन न होणे

५.  मलेरिया

डासांमुळे पसरणारा हा आजार वेळेवर नियंत्रित केला नाही तर गंभीर स्वरूप धारण करू शकतो. मलेरिया हा संसर्गजन्य आजार आहे. काही वेळा मलेरियाचे निदान लवकर होत नाही. परंतु अशा वेळी वाट न पाहता वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

या आजाराची लक्षणे खालील प्रमाणे

१.  तीव्र ताप

२.  थंडी वाजून येणे

३.  डोकेदुखी व अंगदुखी

४.  खूप घाम येणे

५.  उलट्या व मळमळ होणे

६.  जुलाब होणे

तर ही आहेत पावसाळ्यात पसरणाऱ्या निरनिराळ्या साथीच्या आजारांची लक्षणे. ह्यातील नेमकी लक्षणे ओळखून जर आपल्याला काही त्रास होत असेल तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळेत औषधोपचार सुरू करावेत.

पावसाळ्यात हे असे आजार आपल्याला होऊ नयेत म्हणून नेमकी काय काळजी घ्यावी. 

१.  शक्यतो पावसात भिजू नये. पावसात भिजल्यास अथवा साचलेल्या पाण्यातून  चालत यावे लागल्यास घरी आल्यावर कढत पाण्याने स्वच्छ आंघोळ करावी.  हे अतिशय आवश्यक आहे असे करण्यामुळे कोणत्याही प्रकारचे साथीचे आजार अथवा  त्वचेचे आजार  होणार नाहीत.

२.  पावसाळ्याच्या दिवसात अन्न शिजवताना विशेष खबरदारी घ्यावी.  आपले हात तसेच ज्या भांड्यांमध्ये अन्न शिजवतो ती भांडी अतिशय स्वच्छ असणे आवश्यक आहे.  तसेच स्वयंपाकासाठी उकळलेले पाणी वापरणे श्रेयस्कर.

३.  पावसाळ्याच्या दिवसात बाहेरील उघड्यावरील अन्न खाऊ नये.  त्याच प्रमाणे बाहेरचे पाणी देखील पिऊ नये.  घरून पाण्याची बाटली घेऊन जाण्याची सवय लावून घ्यावी.

४. पावसाळ्याच्या दिवसात उकळून गार केलेले पाणी प्यावे. तसेच ह्या दिवसात जरी तहान कमी लागत असली तरी आवश्यक प्रमाणात पाणी अवश्य प्यावे. अन्यथा डीहायड्रेशन होऊ शकते.

५. सर्दी, खोकला होऊ नये तसेच घशाचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी  सुंठ,  आलं किंवा तुळस वगैरे घातलेला चहा, काढा इत्यादीचे नियमित सेवन करावे.

अशा सर्व उपायांनी आपण नक्कीच आपल्याला या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांपासून सुरक्षित ठेवू शकतो.

तुम्हाला माहित असणारे आजार किंवा त्यावरील उपाय याबद्दलची माहिती कमेंट मध्ये नक्की लिहा.

तसेच या लेखातील माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना याचा फायदा व्हावा म्हणून हा लेख नक्की शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!