आग, महापुरात/ कठीण काळात काय करायचं याची तालीम मुलांना द्या

सध्या बातम्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट अशा बातम्या आपण वाचतो, ऐकतो.
जिथं कधी स्वप्नातही विचार केला नव्हता अशा ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली गेल्या ३/४ वर्षात दिसून आली आहे.
अशी अचानक पूरस्थिती उद्भवली तर काय करायला हवं याविषयी मुलांशी बोला.
उपलब्ध साहित्यातून आपला आणि इतरांचा जीव कसा वाचवता येईल यावर चर्चा करा.
दोरांना कपड्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी मारुन बचावासाठी कसा प्रयत्न करता येईल हे प्रत्यक्ष करुन पहा. हे फक्त मोठ्या अडचणीच्या वेळीच कामाला येईल असे नाही, छोट्या-छोट्या घटनांमध्ये सुद्धा या गोष्टी मुलांसाठी महत्त्वाच्या ठरतात.
तेच आगीच्या बाबतीत. आग लागल्यानंतर सुरक्षित ठिकाणी कसं जाता येईल कशी मुव्हमेंट असावी याचं प्रात्यक्षिक करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा