कमी उंची आहे म्हणून लोक करायचे चेष्टा, आज आहेत यशस्वी वकील

पंजाबच्या जालंदर कोर्टातल्या अँडवोकेट हरविंदर कौर उर्फ रुबी या सध्या खूप लोकप्रिय ठरल्या आहेत.
२४ वर्षाच्या हरविंदर कौर भारतातल्या सगळ्यात कमी उंचीच्या ऍडवोकेट आहेत.
त्यांची उंची ३ फूट ११ इंच एव्हढीच आहे.
जीवनातल्या अडथळ्यांवर मात करत यशाचं एक उत्तुंग शिखर त्यांनी गाठलेलं आहे.
खरं तर हरविंदर यांचे स्वप्न एअर होस्टेस बनण्याचं होतं.
पण एअर होस्टेस व्हायचं, तर त्याच्यासाठी सणसणीत उंची हवी.
उंची अभावी हरविंदर यांचं एअर होस्टेस बनण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं.
हरविंदर यांच्या परिवारांनं सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या डॉक्टरना दाखवून उंची वाढवण्यासाठी उपचार करून घेतले होते.
योगाचा ही सहारा घेतला होता, पण हरविंदर यांची उंची काही केल्या वाढलीच नाही.
कमी उंचीवरून लोक नेहमी चेष्टा करायचे.
त्यामुळे नाराज झालेल्या हरविंदर यांनी स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलं.
पण असं किती दिवस चालणार? शेवटी हिम्मत करून यातून बाहेर पडायचं ठरवलं.
अभ्यास करून हरविंदर यांनी वकील व्हायचं ठरवलं.
एकदा मनात घेतल्यानंतर त्यांनी जीव तोडून मेहनत केली आणि वकील बनल्या.
यशस्वीरित्या वकील झाल्यानंतर हरविंदर यांचा प्रवास थांबला नाही.
हरविंदर एक उत्साही व्यक्तिमत्व आहे.
अनोळखी लोक आजही हरविंदर यांना छोटी मुलगी समजतात.
कोर्ट रूम मध्ये सुद्धा एका लहान मुलीला वकिलांचा ड्रेस घालून का आणलं? असं सुरुवातीला विचारलं जायचं.
मात्र त्यांच्या सहकाऱ्यांनी या एक वकील आहेत हे स्पष्ट केलं.
सध्या हरविंदर वकिली मध्ये गुन्हेगारी केससाठी आपलं कसब पणाला लावत आहेत.
ज्युडीशिअल सर्विसेसचीही त्या तयारी करत जज बनण्यासाठी अभ्यास करत आहेत.
जज होऊन परिवाराचं नाव उज्वल करायचा हरविंदर यांचा मानस आहे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा