शरीराची आणि मनाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फक्त ‘या’ १० गोष्टी करा, आणि चमत्कार अनुभवा

धकाधकीचं आयुष्य जगता जगता माणूस मेटाकुटीला येऊन जातो. जसा वस्तूंचा ‘गॅरंटी पिरियड’ संपत आला कि त्या खराब होऊ लागतात, तसंच आपलं शरीर सुद्धा वयोमानानुसार तक्रारींचा पाढा वाचू लागतं.

तब्बेतीच्या तक्रारी वाढू लागल्या तर हळूहळू उदास वाटू लागतं. सततच्या रुटीनचा कंटाळा येऊ लागतो आणि मनावर निराशेचं मळभ दाटू लागतं.

परंतु आज आपण अशा काही उपयुक्त टिप्स पाहूया ज्यामुळे ह्या उदासपणावर मात करून आपण आनंदी राहू शकू.

आनंदी राहण्यामुळे आपण सध्याच्या परिस्थितीवर तर मात करू शकतोच, पण एकूणच जीवनातला ताण, नैराश्य सुद्धा कमी करू शकतो.

आनंदी राहण्यामुळे आयुष्य वाढते असे म्हणतात ते काही उगाच नाही. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे आता सांगण्यासारखे असे आहे, कि आनंदी राहण्याने तुमची इम्युनिटी सुद्धा वाढेल…. हो हे अगदी खरे आहे. या लेखात दिलेल्या १० टिप्स वाचून हा प्रयोग नक्की करून बघा.

आपल्या रोजच्या जीवनात छोटे छोटे सोपे बदल करून आपण आनंदी राहू शकतो. कसे ते पाहूया.

आनंदी राहण्याच्या १० टिप्स

१. उठल्याबरोबर एक सकारात्मक विचार मनात आणा

आपल्यापैकी बहुतेकांना उठल्याबरोबर मोबाइल फोन हातात घ्यायची सवय असते. मग आपण तिथे असलेल्या माहितीमध्ये वाहावत जातो.

परंतु असे न करता रोज सकाळी उठल्याबरोबर एक सकारात्मक विचार मनात आणा. आजचा दिवस कसा घालवायचा ह्याचे प्लॅनिंग करा.

मुख्य म्हणजे ह्यासाठी लवकर उठणे आवश्यक आहे.

अलार्म बंद करून टाकून, पुन्हा झोपण्याची सवय आपल्यापैकी बऱ्याच जणांना असते. सकाळी लवकर उठण्यासाठी काय करावे, याचे जालीम उपाय वाचण्यासाठी येथे क्लिक करा. (आपल्याकडे असे सगळे निन्जा टेक्निक्स आहेत, तुम्ही फक्त नियमितपणे वाचत जा😍)

आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस असणार आहे, असा पॉझिटिव्ह आणि ऊर्जा देणारा विचार करून प्रत्येक दिवसाची सुरुवात करा.

सकाळच्या प्रसन्न वातावरणाचा, पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आनंद घ्या.

चांगले स्तोत्र किंवा गाणे ऐका, सकाळच्या मोकळ्या हवेत फिरायला जा, (सध्या मात्र हे करायचे नाही) ह्यामुळे मन आनंदी होईल आणि दिवस चांगला जाईल.

२. दिवसातला थोडा तरी वेळ स्वतःसाठी काढा

आपण सगळेच दिवसभर आपापली कामे करत असतो. परंतु सगळ्या धावपळीत स्वतःसाठी थोडा वेळ काढायला मात्र आपण विसरतो.

अर्थात हा स्वतःसाठीचा वेळ हा मोबाईल किंवा टीव्ही पाहण्यात न घालवता मन आनंदी होईल अशा काहीतरी कामात घालवा.

३० मिनिटे चालणे किंवा पळणे, काही योगासने करणे अशी मनाला उत्साह देणारी कामे तुम्ही करू शकता.

ह्यामुळे व्यायाम तर होतोच पण पुढचा दिवस आनंदात आणि उत्साहात जातो.

३. पौष्टिक आणि आवडता आहार घ्या

असे म्हटले जाते की आपण जे खातो त्याचे प्रतिबिंब आपल्या व्यक्तिमत्वात दिसते.

नेहेमी चांगला पौष्टिक आहार घेणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायद्याचे असते आणि आपले आरोग्य चांगले असले की आपोआप चिंता, त्रास आपल्यापासून दूर पळतात. आपण आनंदी राहू लागतो.

म्हणून नियमितपणे पौष्टिक आहार घेणे आणि प्रोसेस्ड फूड, जंक फूड पासून दूर राहणे आवश्यक आहे.

पौष्टिक असण्या बरोबरच, आवडता आहार असणे चांगले कारण ‘गुड फूड, गुड मूड’ हे ही तितकेच खरे आहे.

४. रोजचा दिवस भरभरून जगा

हल्लीच्या तरुणांच्या भाषेत YOLO(you only live once) असा शब्दप्रयोग सारखा असतो.

ह्याचा अर्थ असा की आपल्याला हे आयुष्य एकदाच मिळाले आहे ते भरभरून जगा.

ही गोष्ट आपण सतत लक्षात ठेवली पाहिजे की हे आयुष्य ही आपल्याला मिळालेली देणगी आहे.

त्यामुळे आपला रोजचा दिवस उदासवाणा न घालवता आनंदात कसा घालवता येईल ह्याचा विचार करा.

काही ना काही छंद जोपासणे, एखाद्या चांगल्या कामात स्वतःला व्यस्त ठेवणे असे आपण करू शकतो.

दिवसातला फावला वेळ वाया न घालवता काहीतरी चांगले काम करणे केव्हाही चांगले.

५. व्यवस्थितपणा जोपासा

आपले घर, आपली झोपण्याची खोली, कपड्यांचे कपाट किंवा काम करण्याचे टेबल जर अस्ताव्यस्त असेल तर आपल्याला काही वस्तु सापडत नाहीत, गैरसोय होते हे तर आहेच पण एकूणच अशा अव्यवस्थितपणामुळे रोजच्या जगण्यावर एक प्रकारचे निराशेचे मळभ येते.

आपलेच आपल्याला उदास वाटू शकते. म्हणून आपण व्यवस्थितपणा अंगी जोपासला पाहिजे.

आपल्या आजूबाजूचे वातावरण नेहेमी स्वच्छ राहील ह्याची काळजी घ्या.

आपली खोली, आपले ऑफिस नेहेमी नीटनेटके असेल, व्यवस्थित असेल इकडे लक्ष द्या.

त्यामुळे काम करायला उत्साह येतो आणि दिवस आनंदी बनतो.

६. आत्मपरीक्षण करा

कोणाचेच आयुष्य कधीच परिपूर्ण नसते. प्रत्येकाला काही ना काही अडचणी येतात, काही त्रास होतात, हातून काही चुकाही होतात.

ह्या सगळ्याचा बाऊ न करता ह्यातून नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करा.

आपल्या हातून झालेल्या चुका समजून घेऊन त्या पुन्हा होणार नाहीत इकडे कटाक्षाने लक्ष द्या.

तसेच आज येणाऱ्या अडचणीमुळे आपण त्यावर मात करायला शिकलो, असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.

त्यामुळे आपण जीवनाचा आनंद पुरेपूर घेऊ शकू.

७. ‘लेट गो’ करायला शिका

आपल्याला आयुष्यात वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे अनुभव येत असतात.

काही लोक आपल्याशी चांगले वागतात तर काही वाईट.

पण वाईट लोकांचे वागणे मनाशी धरून ठेवून उदास वाटून घेणे, राग येणे यातून काहीही हासील होणार नाही, हे मनाला समजावून सांगा…

अशा लोकांचे वागणे सोडून देता येणे जमले पाहिजे.

तसेच काही वेळा परिस्थितीमुळे आपल्यावर अन्याय झालेला असू शकतो.

अशा वेळी देखील त्याबाबतीत मनात राग, नकारात्मकता धरून न ठेवता हे विचार सोडून देऊन आनंदाने जगा.

८. आपले प्रेम आणि काळजी व्यक्त करा

बरेच वेळा आपण आपल्या कुटुंबावर, मित्र मैत्रिणींवर खूप प्रेम करत असतो.

त्यांची खूप काळजी करत असतो. परंतु ते व्यक्त करणे मात्र आपल्याकडून राहून जाते.

असे न करता आपले प्रेम, आपली काळजी वेळोवेळी व्यक्त केली पाहिजे.

त्यामुळे समोरच्या व्यक्तिला देखील ते समजेल आणि त्यांच्याकडून तसेच प्रेम, काळजी तुम्हाला मिळेल. आयुष्य आनंदाने भरून जाईल.

आपल्या आवडत्या व्यक्तिसोबत वेळ घालवणे, लांब असतील तर त्यांना सरप्राईज भेट देणे, फोन करणे अशा छोट्या छोट्या गोष्टी पण खूप महत्वाच्या असतात.

९. इतरांचा सल्ला ऐका

कोणी जर तुम्हाला काही सल्ला देत असेल, तुमची काही चूक सांगत असेल तर त्यांचे म्हणणे आपण ऐकून घ्या.

एकदम चिडून न जाता समोरच्याचा विचार ऐकून घेऊन त्याचे म्हणणे अमलात आणणे हे आपल्याला फायद्याचे सुद्धा ठरू शकते.

१०. झोपताना सकारात्मक विचार करून झोपा

रोज रात्री झोपताना आपल्या आयुष्याबद्दलच्या चांगल्या गोष्टी मनात आणून त्याबद्दल देवाचे आभार मानणे, आपल्या मनाला आनंद देऊ शकते.

रोज वेळेवर झोपणे आणि झोपताना कुठलाही नकारात्मक विचार मनात न आणता उलट चांगले विचार मनात आणणे हे आपल्या मनाला उभारी देण्यास उपयोगी पडते आणि आपण पुढच्या दिवसाचे नव्या उत्साहाने स्वागत करू शकतो.

तर ह्या आहेत उदास वाटू न देता आनंदी राहण्याच्या काही टिप्स.

असेच मनाचेTalks चे विविध लेख तुम्ही ऍमेझॉन किंडल वर जाहिरातींविना वाचू शकाल.

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय