नोकरीची चिंता विसरा! या सरकारी संस्थेमध्ये फक्त ५,००० रुपये गुंतवून भरपूर कमाई करा!

पोस्ट ऑफिस फ्रँचायझी योजनेअंतर्गत, कोणतीही व्यक्ती कमीत कमी पैसे जमा करून आणि काही मूलभूत प्रक्रिया पूर्ण करून पोस्ट ऑफिस उघडू शकते.
पोस्ट ऑफिस हे एक यशस्वी व्यवसाय मॉडेल आहे. यातून तुम्ही भरपूर कमाई करू शकता.
तुम्हाला एखाद्या सरकारी संस्थेबरोबर व्यवसाय करायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला एक भन्नाट कल्पना सांगणार आहोत.
यातून तुम्ही सरकारी संस्थेबरोबर दरमहा मोठी कमाई करू शकता.
मित्रांनो, तुम्ही तुमच्या भागात पोस्ट ऑफिस फ्रँचायझी उघडू शकता.
सध्या देशात १.५५ लाख पोस्ट ऑफिसेस आहेत.
शासनाने वेळोवेळी त्यांच्या सुविधांचा विस्तार केला असून त्यातून अनेकांना रोजगार ही मिळालेला आहे.
मनीऑर्डर पाठवणे, स्टॅम्प आणि स्टेशनरी पाठवणे, छोटी बचत खाती उघडणे अशी बरीच कामं पोस्ट ऑफिसमध्ये केली जातात.
देशातील अनेक भागात पोस्ट ऑफिस अजूनही उपलब्ध नाही हे लक्षात घेऊन इंडिया पोस्टने नवीन पोस्ट ऑफिस उघडण्यासाठी फ्रँचायझी योजना सुरू केली आहे.
१) दोन प्रकारच्या फ्रँचायझी उपलब्ध आहेत
पोस्ट ऑफिसकडून दोन प्रकारच्या फ्रँचायझी दिल्या जातात.
यामध्ये, पहिली फ्रँचायझी आउटलेटची आहे आणि दुसरी पोस्टल एजंट्सची फ्रेंचायझी आहे.
तुम्ही यापैकी कोणतीही फ्रँचायझी घेऊ शकता.
शहरी आणि ग्रामीण भागात घरोघरी पोस्टल स्टॅम्प आणि स्टेशनरी पोहोचवणारे एजंट पोस्टल फ्रँचायझी एजंट म्हणून ओळखले जातात.
पोस्ट ऑफिस फ्रँचायझी योजनेअंतर्गत, कुणीही व्यक्ती थोडीशी रक्कम जमा करून आणि काही प्रक्रिया पूर्ण करून पोस्ट ऑफिस उघडू शकते.
कोणतीही १८ वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती फ्रँचायझी घेऊ शकते.
मात्र त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणताही सदस्य पोस्ट खात्यात नसावा.
शिवाय त्या व्यक्तीकडे मान्यताप्राप्त शाळेतील किमान ८वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
तुम्हाला पहिल्यांदा फॉर्म भरून फ्रँचायझीसाठी अर्ज करावा लागतो.
यानंतर, निवड झाल्यावर, इंडिया पोस्टसोबत सामंजस्य करार करावा लागतो
जर पोस्टाच्या गुंतवणुकीबद्दल विचार केला तर फ्रँचायझी आउटलेटमधील गुंतवणूक कमी आहे हे लक्षात येईल.
यातलं महत्त्वाचं काम सेवा देण्याचं असल्यामुळे त्यात गुंतवणूक कमी आहे.
दुसरीकडे, पोस्टल एजंटसाठी मात्र गुंतवणूक जास्त करावी लागते.
कारण स्टेशनरी वस्तूंच्या खरेदीत जास्त पैसा खर्च होतो.
पोस्ट ऑफिस उघडण्यासाठी किमान २०० स्क्वेअर फूट ऑफिस एरिया असणं आवश्यक आहे.
३) ५००० रुपये सुरक्षा रक्कम म्हणून भरावे लागतात.
पोस्ट ऑफिस फ्रँचायझी उघडण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने ५००० रुपये भरावे लागतात.
तुम्हाला पोस्ट ऑफिस फ्रँचायझीसाठी अर्ज करावा लागेल.
यासाठी तुम्ही…. https://www.indiapost.gov.in/VAS/DOP_PDFFiles/Franchise.pdf अधिकृत लिंकला भेट देऊ शकता.
कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, स्पीड पोस्टसाठी ५ रुपये, मनीऑर्डरसाठी ३ ते ५ रुपये, पोस्टल स्टॅम्प आणि स्टेशनरीवर ५% कमिशन उपलब्ध आहे.
त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सेवांसाठी वेगवेगळे कमिशन उपलब्ध आहेत.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा