कशा लोकांशी मैत्री करावी, हे सांगणारी पंचसूत्री!!

जिंकण्याची जिद्द आणि सवय असलेल्या लोकांची ‘संगत’ तुमचे आयुष्य बदलून टाकणारी ठरते.. कशी ते ह्या लेखातून वाचा.

कट्टी तर कट्टी.. बारम बट्टी.. बारा महिने बोलूच नको.. लिंबाचा पाला तोडू नको..

ह्या चारोळ्यांशीवाय कोणाचेच बालपण मजेत गेले नसेल…

भांडण झाल्यावर कट्टी आणि पुन्हा बट्टी घेऊन दिलजमाई.. ही अशी लाडिक कट्टी आणि बट्टी हा आपल्या लहानपणाचा अविभाज्य भाग..

शाळेत, गल्लीत, सोसायटीत असलेल्या आपल्या मित्रपरिवाराबरोबर आपण कधी गट्टी जमावलीये तर कधी कट्टी ही घेतलीये..

असे म्हणतात बालपणीची ही आंबट गोड मैत्री कायम टिकते..

‘लंगोटीया यार’ असतात ना ते आपल्याला अगदी चांगलेच ओळखतात आणि सुखादुःखात शेवटपर्यंत साथ देतात..

मात्र हे झालं बालपणीच्या मैत्रीचं.. जसे जसे मोठे होत जातो.. जग बघत एकेक गोष्ट शिकतो..

तेव्हा मात्र माणसांची पारख करणे खूपच अवघड असते..

कधी जिवाभावाचे मैत्र मिळते तर कधी कोणी दगा फटका करणारे.. पण अश्याच अनुभवातून आपल्याला माणसांची पारख करणे जमायला लागते..

एकदा का भवतालच्या माणसांची पारख करता येऊ लागली की मग आपल्या आयुष्यात कोणाला स्थान द्यायचे ते ठरवले पाहिजे..

संगतच आपल्याला आयुष्याच्या रस्त्यावरून चालायला शिकवते…

जर संगत चुकली तर आयुष्याचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय रहात नाही.. चांगल्या माणसांच्या संगतीत राहिलो तर आपल्या आयुष्याला योग्य दिशा मिळते..

त्यामुळे आपली संगत फारच चाणाक्षपणे जोडावी.. आपल्याला आपल्या ध्येयापासून लांब नेणाऱ्या घटकांपासून, मित्रांपासून लांब राहावे..

आपल्या आयुष्यात असणारी व्यक्ती आपल्या आयुष्यावर, वागण्या बोलण्यावर खूप प्रभाव टाकतात..

आपणही हळू हळू त्यांच्यासारखेच बनायला लागतो..

हे तुमच्या उत्तम आयुष्यासाठी खूपच घातक आहे आणि हे वेळीच लक्षात येणे गरजेचे आहे.. ‘सो चूझ युवर फ्रेंड्स वाईजली..!!’

फ्रेंड्सचांगली माणसे आणि त्यातून सकारात्मक आणि विनिंग ऍटीट्युड असणारी माणसे सहजासहजी लाभत नाहीत..

आपल्याला शोधून काढावी लागतात.. आणि त्यांच्याशी मैत्री देखील करणे क्रमप्राप्त असते..

कारण अशा माणसांची संगत आयुष्यभरासाठी लाभणार असेल तर तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच..!!

कारण अशा माणसांच्या ह्या स्वभाव गुणांमुळे आपणही आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने बघायला शिकतो.. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते..

त्यांचा प्रभाव आपल्याला तिमिरातून तेजाकडे जाण्यास मदत करतो.. कधी कधी तेच आपल्या आयुष्याचे मेन्टरही बनून जातात..!!

नाही खरे वाटत..?? मग जाणून घ्या कसे तुमचे आयुष्य बदलत जाईल चांगल्या मित्रांमुळे!!..

१. चांगल्या मित्रांमुळे आपल्याला आत्मिक शक्ती मिळते:

ही सकारात्मक आणि आयुष्यात काही मिळवायचेच अशी जिद्द असलेली माणसे सतत कार्यरत असतात. त्यांची ही ऊर्जा पॉसिटीव्ह वाईब्स च्या रुपात आपल्यालाही मिळते..

त्यांच्या बरोबर राहिल्याने सतत त्यांच्याशी संवाद साधल्याने आपणही स्वतःला उभारी देत राहतो.. सेल्फ मोटिवेट होत राहतो..

आपला आपल्यावरचा विश्वास दृढ होतो.. आणि आपल्याला आयुष्यात काही करायचे अशी स्वप्ने आपणही पहायला लागतो..

त्या दिशेने प्रयत्नही करतो.. हीच आत्मिक शक्ती आपल्याला एक दिवस यशाच्या शिखरावर नेऊ शकते..

२. आयुष्याकडून काय कमवायचे ते शिकतो:

आयुष्य हे जन्माला येणे, जगणे आणि एक दिवशी त्याचा निरोप घेणे.. हे त्यांच्यासाठी इथपर्यंतच मर्यादित नसते..

आयुष्याचा पुरेपूर फायदा ते करून घेतात.. एकाच ध्येयातून खूप काही मिळवायची उमेद आणि अपेक्षा ठेवतात..

ते करताना भावतालचे जगही सुंदर बनवतात..

अशांना नियती कधीच खाली खेचत नाही.. जणू काही जिंकण्यासाठी जन्माला आलेत असेच आयुष्य ते प्रयत्नपूर्वक घडवतात..

आपणही त्यांच्या ह्या निश्चयी स्वभावामुळे आयुष्याकडून काय आणि कसे कमावले पाहिजे ते शिकतो..

३. स्वतःच्या कृतीतून यशाचे धडे देतात:

आपण सर्वसाधारण मित्रांच्या संगतीत असलो तर आपलेही आयुष्य सर्वसाधारणच असते.. त्यांच्या संगतीत राहणे हा गुन्हा नाही..

पण काही जणांना आयुष्याच्या स्पर्धेतून काहीही कमवायचे नसते..

त्यांची कोणतीही स्वप्ने नसतात.. आला दिवस ढकलण्यापालिकडे ते काहीही करत नाही..

काही मिळालेल्या आयुष्यातून खचून जातात आणि नेहमीच रडगाणी गातात…

काही मित्र त्यांच्या आयुष्यात स्वतः धडाडीने काहीही करायला धजत नाहीत आणि आपल्याला मागे खेचणारेही असतात..

ज्यांच्या आयुष्यात कसलीच ध्येये नसतील ते तुम्हाला तरी काय रस्ता दाखवणार..??

पण ही कमालीची जिद्दी आणि सकारात्मक मंडळी एकदम वेगळी असतात..

स्वतः आयुष्यात काहीतरी अफाट करतात.. आणि तुम्हालाही आपल्या स्वप्नांसाठी कसे झोकून द्यायचे असते ते शिकवतात..

स्वतःचे, स्वतःच्या कार्याचेच उदाहरण आपल्यापुढे ठेवतात.. ज्यातून आपला धडा आपल्याला घेता येतो..

४. आपल्याला सतत कार्यरत राहण्यास प्रवृत्त करतात:

आळशी माणसे तुम्हालाही आळशीच बनवतात.. त्यांच्या कडे अशाच नकारात्मक लहरी असतात..

आणि त्यांच्या जाळ्यात आपण सहज अडकतो ही..

कारण कामचुकारपणा हा कोणी कोणाला शिकवावा लागत नाही.. त्यात काहीही करावे लागत नाही..

एकदा आपण ह्यात अडकलो तर आपले काही खरे नाही..

मात्र ही सतत जिंकणारी माणसे तुम्हाला विना कारण वेळ घालवताना दिसणारच नाहीत..

त्यांचा दृष्टिकोन एखाद्या शिकण्यासाठी आसुसलेल्या विद्यार्थ्यासारखा असतो..

ते स्वतःला परिपूर्ण समजत नाहीत तर आयुष्यभर नवीन काहीतरी शिकत राहतात..

अगदी छोट्या छोट्या कामातून मोठे काहीतरी आचिव्ह करतात..

कारण ते सतत कार्यरत असतात.. अशा लोकांच्या गराड्यात आपण असलो तर काय बिशाद आहे आपण आळशी बनू…!!

आपणही ‘बिझी बी’ बनणार आणि यशाच्या दिशेनेच झेपावणार..

५. जिद्द आणि इच्छाशक्ती वाढवण्यास मदत करतात:

अर्थात यश मिळवणे अथवा न मिळवणे हे तुमच्या इच्छाशक्तीवर आहे..

जर तुम्ही ही आयुष्याला दिशा देण्यास कमी पडत असाल, प्रयत्नात कसूर करत असाल तर कोणीही तुमची मदत करूच शकत नाही..

त्यामुळे स्वतःतली इच्छाशक्ती वाढवणे तितकेच गरजेचे आहे..

सकारात्मक माणसांमध्ये राहिल्याने आपल्या इच्छाशक्तीला खत पाणी मिळते..

आपल्या वाईट सवयी चांगल्या माणसांच्यात राहिल्याने आपोआप सुटतात.. चटकन दुसऱ्याला कॉपी करणे हा माणसाचा स्वभाव असतो..

म्हणून उत्तम टॅलेंट असलेल्या, आयुष्य योग्य दिशेने जगणाऱ्या लोकांना आपण फॉलो करत असू तर का नाही आपल्या अंगी जिद्द बाणवणार..??

जसे आपले पैसे आपण वाटेल तिथे गुंतवत नाही तसेच आपला वेळ, आपले लक्ष आणि आपले प्रयत्न नको तिथे न गुंतवता योग्य मार्गदर्शकांकडे गुंतवले पाहिजे..

जे अभ्यासपूर्ण गप्पा मारतात, भरपूर वाचन करतात, सतत नवीन काही शिकण्याच्या मागे असतात, जे अपयशामधूनही यश मिळवतात अशांच्या संगतीत राहणे हे आपल्या आयुष्याला कलाटणी देणारे निश्चितच ठरते..!!

त्यामुळे स्वतःबरोबर दुसऱ्यांच्याही आयुष्याला उभारी देणाऱ्यांच्या संगतीत राहा.. खूप काही शिका..

आणि आपल्याबरोबर अजून काही जणांना आपल्यासोबत उंचीवर घेऊन चला..!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय