या ५ साध्या आणि सुंदर मेहंदी डिझाईन्सने फक्त १० मिनिटात मनमोहक मेंहदी काढा

सण असो की लग्नसोहळा महिलांना हातावर मेहंदी काढून घ्यायला खासकरून आवडतं. आणि श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना!!

आपली मेंहदी सगळ्यात खास असावी असं प्रत्येकीला वाटतं. पण नेमकं कोणतं डिझाइन काढावं याविषयी संभ्रम असतो.

तर हा संभ्रम दूर करुन तुमची मेहंदी खास ठरण्यासाठी या रचना पहा. या ५ प्रकारे सजवलेली सुंदर आणि साधी रचना तुम्हांला नक्कीच आवडेल.

बर्‍याच महिलांना मेहंदी इतकी आवडते की मेहंदी लावण्यासाठी काही कारण समोर नसेल तर सहज म्हणून मेहंदी लावून ही त्या आनंद घेतात.

चला तर मग कोणत्या पद्धतीने तुम्ही खास समारंभासाठी मेहंदी डिझाइन ठरवू शकता हे पाहूया.

१) अरबी मेहंदी

अरबी किंवा अरेबिक नावानं प्रसिद्ध असणारं मेहंदी डिझाइन हे वेलीसारखं रेखाटलं जातं.

थोड्याशा प्रँक्टीसने तुम्ही अरेबिक डिझाइन स्वतः रेखाटू शकता.

हे डिझाइन आजही ट्रेंडमध्ये आहे आणि बऱ्याच महिलांच्या आवडीचं सुद्धा आहे.

अरेबिक डिझाइन रेखाटायला सोपं असतं. जेंव्हा वेळ कमी असतो तेंव्हा तुम्ही अरेबिक डिझाइनने तुमचे हात सुंदर बनवू शकता.

arebik-mehendi

२) दुहेरी वेलीची डिझाईन मेहंदी.

अरबी मेहंदीच्या एकेरी वेलासारखीच तुम्ही हातावर दुहेरी वेल रेखाटू शकता.

या डिझाईनमुळे हातांचे सौंदर्य तर वाढवेलच, पण तुमचे हात भरगच्च, अधिक सुंदर दिसतील.

या मेहंदी डिझाइनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते दिसायलाही खूप आकर्षक दिसतं.

३) तळहाताच्या मध्यभागी गोलाकार ठिपके

हाताच्या मध्यभागी गोल ठिपक्यांची मेहंदी सुंदर दिसते.

मेहंदीचा हा प्रकार पारंपारिक शैलीचा आहे.

तुम्ही तळहातावर गोलाकार, त्रिकोण किंवा चौरस डिझाइनसुद्धा काढू शकता.

तुमच्या तळहाताएवढ्या मोठ्या गोलची डिझाईनसुद्धा ट्रेंडमध्ये आहे, जी मुलींना जास्त आवडते.

तुम्ही जर कामात असाल, मेहंदीसाठी अगदीच थोडा वेळ तुमच्या हातात असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं डिझाईन बनवू शकता, कारण ही मेहंदी रंगल्यावर खूपच सुंदर दिसते.

नृत्यासाठी अशा पद्धतीच्या डिझाइनला पसंती दिली जाते.

arebic-mehendi

४) अर्ध्या हातावरची मेहंदी डिझाइन

ब-याच महिलांना किंवा मुलींना मेहंदीने पुर्ण व्यापलेले हात आवडत नाहीत.

तुम्हालाही भरगच्च हात आवडत नसतील तर हाफ पाम मेहंदी म्हणजेच अर्ध्या तळहातावरची डिझाइन तुम्हांला आवडू शकेल.

सध्या हाफ पाम मेहंदीच्या डिझाईन्सला खूप पसंती दिली जाते.

फॅशननुसार ती खूप ट्रेंडमध्ये आहे.

मेहंदी लावताना लक्षात ठेवा की करंगळीकडून मेहंदी लावायला सुरुवात करा आणि अर्धा तळहात डिझाईनने भरा आणि अंगठ्यावर आणून डिझाइन पूर्ण करा.

५) झालर मेहंदी

भरगच्च मेहंदी ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी आणखी एक वेगळा पर्याय म्हणजे झालर मेहंदी.

या डिझाईनमध्ये संपूर्ण हातावर मेहंदी न लावता कडेने हात सजवले जातात.

अंगठा, अनामिका आणि करंगळी यावर डिझाइन काढतात.

झालर मेहंदीची रचना हातावर खूप चांगली दिसते, म्हणूनच बहुतेक महिलांना देखील हे डिझाइन आवडते.

मेहंदीच्या निरनिराळ्या रचना पूर्वापार आपल्याकडे चालत आलेल्या आहेत.

काळानुरूप त्यात बरेच बदल ही घडत गेले, त्यामुळे मेहंदीची लोकप्रियता किंचीत ही कमी झालेली नाही !

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय