पावसाळ्यात आणि हिवाळ्यात च्यवनप्राशचे सेवन करा, आजार पळवा, हे १० आश्चर्यकारक फायदे मिळवा.

हिवाळ्यात च्यवनप्राश सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं, हे तर तुम्हांला माहीत असेलच.
पण तुम्हाला च्यवनप्राश खाण्याचे हे १० फायदे कदाचित माहिती नसतील.
तर च्यवनप्राशचे हे १० आश्चर्यकारक फायदे नक्की जाणून घ्या…
१) हिवाळ्यात च्यवनप्राश रोज खाल्यानं शरीरात उष्णता निर्माण होऊन थंडीचे दुष्परिणाम टाळता येतात, शिवाय च्यवनप्राश खाल्ल्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढून आजार दूर राहतात.
२) सर्दी, खोकला, फ्लू, कफ यांवर च्यवनप्राश खाणं अतिशय फायदेशीर ठरतं. हिवाळ्यात रोज सकाळ-संध्याकाळी च्यवनप्राश खाल्ल्यामुळं सर्दी खोकल्या सारखे आजार होत नाहीत.
३) च्यवनप्राश हे पचनाशी संबंधित समस्यांमध्ये खूप फायदेशीर ठरतं, दररोज खाल्ल्यामुळे पचनाच्या सर्व समस्या दूर होऊन पचनक्रिया मजबूत होते.
४) च्यवनप्राशमध्ये आवळ्यासारखी काही औषधी वनस्पती असतात, ज्या तुमच्या शरीराला जीवनसत्त्वं आणि खनिजं देतात त्यामुळे तुमची क्रियाशीलता वाढते तसंच लैंगिक शक्ती वाढते.
५) कमी वयात जर तुमचे केस पांढरे होत असतील तर च्यवनप्राश खाणे तुमच्यासाठी उत्तम उपाय आहे. रोज च्यवनप्राश खाल्ल्यामुळं तुमचे पांढरे होणारे केसही काळे होऊ शकतात. नखंही मजबूत होतात.
६) सर्दीमध्ये खोकला होणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे, पण जर तुम्हांला जुनाट खोकल्याचा त्रास असेल तर च्यवनप्राश नक्की खा. यामुळे खोकल्यापासून पूर्ण आराम मिळेल, शिवाय च्यवनप्राशमुळे तुमचे हिमोग्लोबिनही वाढेल.
७) लहान मुलांमध्ये होणार्या कित्येक समस्या या नुसत्या नियमित च्यवनप्राशमुळे कमी होतात. थंडीमुळे लहान मुलांनाही आरोग्याच्या समस्यांना जाणवतात मात्र जर मुलांना नियमित च्यवनप्राश दिलं तर मुलांना आंतरिक शक्ती मिळते.
८) महिलांसाठी ही च्यवनप्राश नियमित खाणं खूप फायदेशीर आहे. मासिक पाळी नियमित नसेल तर च्यवनप्राश खाल्यामुळं मासिक पाळीशी संबंधित तक्रारी कमी होतात
९) लहान मुले असो किंवा प्रौढ व्यक्ती, च्यवनप्राशचे नियमित सेवन केल्यामुळे त्यांच्या मेंदूची क्रियाशीलता आणि एकाग्रता वाढते. मानसिक ताण कमी होऊन मन निरोगी राहते.
१०) मानवी शरीरातील अवयवांची स्वच्छता आणि शरीरातले हानिकारक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी च्यवनप्राश मदत करतं. रक्तदाबाची पातळी नियंत्रित ठेवायला च्यवनप्राशची मदत होते.
तर मित्रांनो हिवाळ्यात उत्तम आरोग्यासाठी च्यवनप्राश नक्की खा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा