बघा सौंदर्य खुलवण्यासाठी मिठाचा वापर कसा करावा

चेहऱ्यावर लावण्यासाठी पॅक आणि फेशियल टोनर म्हणून समुद्री मिठाचा उपयोग करा, तुमच्या त्वचेला उजळपणा मिळवून द्या.
त्वचेची स्निग्धता जपणारं, औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेलं समुद्री मीठ इतरही काही समस्या कमी करण्यासाठी उपयोगी आहे.
चेहऱ्याचं सौंदर्य जपण्यासाठी समुद्री मीठाचा वापर करायचा, तर त्याचे काही फायदे जाणून घेऊया.
विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेची विशेष काळजी घेण्यासाठी तुम्ही ब-याच गोष्टींची मदत घेत असाल.
उन्हाळ्यात त्वचेच्या समस्या कमी करून त्वचेचा उजळपणा अबाधित राखणं तसं खूप अवघड काम आहे.
पण, तुम्हाला माहीत आहे का की, फेस पॅक आणि समुद्री मिठाने (Sea salt) बनवलेलं टोनर यांचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा निश्चितपणे उजळवू शकता.
उन्हाळ्यात, त्वचेचा तेलकटपणा कमी करुन त्वचेला जाणवणारी, खाज घालवण्यासाठी सी सॉल्ट फेस मास्कचा वापर उत्तम ठरतो.
सी सॉल्ट फेस मास्क तयार कसा करायचा?
अगदी सोप्या पद्धतीने, कमी वेळात, आणि कमीत कमी पदार्थ वापरून घरच्या घरी हा फेसमास्क तुम्ही वापरु शकता.
साहित्य
- २ चमचे समुद्री मीठ
- ४चमचे मध
याच प्रमाणात मीठ आणि मध नीट एकत्र, एकजीव करुन घ्या आणि हलक्या हाताने त्वचेवर लावा.
१० ते १५ मिनिटं हा मास्क चेहऱ्यावर असूद्यात.
हा मास्क चेहऱ्यावरच वाळल्यानंतर कोमट पाणी हलकेच चेहऱ्यावर फवारा.
अर्ध्या मिनिटाने कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
आंघोळीच्या पाण्यातही समुद्री मीठ मिसळा आणि सौंदर्य उपचार घ्या.
समुद्री मीठचा त्वचेसाठी नैसर्गिक स्क्रबर म्हणून वापर होतो.
टब नसेल तर बादलीत मीठ विरघळून घेऊन पाणी अंगावर घेत, हलक्या हाताने त्वचा घासा.
यामुळे काय होईल? तर त्वचेच्या छिद्रांमध्ये साठलेली धूळ निघून जाईल आणि त्वचा उजळ दिसायला लागेल.
सी सॉल्ट टोनरचा वापर करा
समुद्री मीठापासून तयार केलेलं फेशियल टोनर उन्हाळ्यात तुमची त्वचा बॅक्टेरियामुक्त तर करतच, पण मृत त्वचेच्या पेशी काढून टाकून चेहरा स्वच्छ ताजातवाना करतं.
सी सॉल्ट टोनरचा वापर केल्यामुळे त्वचेचा ओलावा जपला जातो
चेहऱ्यावरचे पिंपल्स आणि मुरुम कमी होतात.
कोमट पाण्यात १ चमचा समुद्री मीठ मिसळून डोळे बंद करून चेहऱ्यावर हे मिश्रण हलकेच फवारा काही वेळ तसच राहू द्या मग चेहरा सावकाश धुवून टिपून घ्या.
समुद्री मिठाचा उन्हाळ्यात असा करा वापर.
उन्हाळ्यात तुमच्या कोरड्या पडणा-या निस्तेज, निर्जीव त्वचेला टवटवीतपणा आणण्यासाठी समुद्री मिठाच्या या पद्धतीने वापर करा.
१०० मिली पाण्यात फक्त १ चमचा समुद्री मीठ मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरून ठेवा.
उन्हातून घरी आल्यावर त्वचा निस्तेज झाली आहे असं तुम्हांला वाटलं तर चेहऱ्यावर हे मिश्रण स्प्रे करा.
रखरखीत, कोरड्या, निस्तेज त्वचेला टवटवी आणण्यासाठी चेहरा उजळ करण्यासाठी समुद्री मीठाचा योग्य प्रमाणात वापर तुम्ही करु शकता.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा