तुमचं स्वयंपाकघर दुर्गंधीमुक्त ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय.

तुमचं स्वयंपाकघर दुर्गंधीमुक्त ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय

दुर्गंधीयुक्त किचन सिंक ही स्वयंपाकघरातील एक सर्वसामान्य समस्या आहे, ज्याचा अनेक घरांमध्ये अनुभव येतो.

अन्न ड्रेनेज पाईप्समध्ये अडकून भयंकर दुर्गंधी निर्माण झाल्यामुळे हळूहळू स्वयंपाक घरात कुबट वास जाणवू लागतो.

शिवाय ओलसर वातावणात बॅक्टेरियाच्या वाढीसाठी योग्य परिस्थिती ही निर्माण होते. आणि या ओल्या भागात सिंकच्या जवळ चाचणं भिरभिरू लागतात.

त्यामुळे आजार ही पसरू शकतात.

स्वयंपाकघराचं सिंक दुर्गंधीमुक्त कसं ठेवायचं?

स्वयंपाकघरातल्या सिंकजवळ दुर्गंधीयुक्त वास येत असेल तर ही दुर्गंधी दूर करण्यासाठी हे सोपे उपाय करून पहा.

१) मीठ आणि बर्फ

सिंकच्या पाईपमध्ये कुजलेलं अन्न वगैरे कचरा असेल तर तो काढून टाका.

आता जो प्रचंड वास येतो तो घालवण्यासाठी तुम्ही खडे मीठ आणि बर्फ वापरू शकता.

सिंकमध्ये बर्फाचे तुकडे ठेवा, नंतर त्यावर मीठ शिंपडा थोड्या वेळाने थंड वाहते पाणी चालू करुन मीठ पाईपमधून वाहून जाऊ द्या.

२) बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा सिंक पाईपमध्ये टाका.

हे दोन घटक बुडबुडे तयार करतील ज्यामुळे जीवाणू आणि बुरशी नष्ट होतील, भयानक वास दूर होईल.

काही मिनिटांनी वाहतं पाणी सुरु करा.

३) भांडी घासण्याचा साबण/पावडर, किंवा डिटर्जंट पावडर

सिंकमधली दुर्गंधी दूर करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे भांड्याचा साबण/पावडर किंवा डिटर्जंट पावडर पाण्यात मिसळून घ्या.

मिश्रण तयार केल्यानंतर, ते सिंकमध्ये ओता दहा मिनिटांनी वाहतं पाणी सोडा.

भांडी घसण्याच्या साबणाचं पाणी किंवा डिटर्जंटचं पाणी वास दूर करायला मदत करेल.

४) लिंबूवर्गीय फळांच्या साली वापरा.

स्वयंपाकघरातल्या सिंकचा प्रचंड कुबट वास दूर करण्यासाठी लिंबू, संत्री यांसारख्या फळांच्या साली तुम्ही वापरू शकता.

या फळांमध्ये नैसर्गिक आम्ल आणि बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध करणारे पदार्थ, तेलं असतात जे दुर्गंधी दूर करतात, एक मंद सुगंध मागे ठेवतात.

संत्री, लिंबू यांच्या साली पाण्यात उकळून घ्या. हे पाणी सिंकमध्ये ओता.

दहा मिनिटांनी साधं वाहतं पाणी जाऊदे. दुर्गंधी कमी झालेली तुम्हांला निश्चितच जाणवेल.

स्वयंपाक घर दुर्गंधीमुक्त ठेवण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे प्रतिबंध.

कुबट वास टाळण्यासाठी सिंकमध्ये अन्नपदार्थ पडणार नाहीत याची काळजी घ्या.

नियमित साफसफाई करा दुर्गंधी निर्माण होऊ नये म्हणून आठवड्यातून किमान एकदा डिटर्जंट आणि ब्लीचने कचरा साफ करा.

अशा साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही सिंक आणि स्वयंपाकघर ताजंतवानं, दुर्गंधीमुक्त ठेवू शकता.

Manachetalks

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आणि हो! हा लेख दिलेल्या योग्य पर्यायांचा वापर करून आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!