किचन मधली हि ५ उपकरणे तुमची कामे सोपी करतील आणि मुलांना कामांची गोडी लावतील

स्वयंपाकघर हे प्रत्येक घरातील सर्वात आनंदाचं आणि महत्त्वाचं स्थान आहे.
स्वयंपाक करायला खूप जणांना आवडतो, पण स्वयंपाक करणं हे थोडं वेळखाऊ ठरु शकतं.
रूचकर जेवणासाठी खूप वेळ द्यावा लागतो, अगदी चिरणे, सोलणे यासाठी ही वेळ जातो.
पण खरंच तुम्हांला स्वयंपाक करणं आवडत असेल, स्वयंपाकाची प्रोसेस सोपी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हांला तुमच्या स्वयंपाकघरासाठी काही छोटी उपकरणं वापरून स्वयंपाक करण्यात गती आणता येईल.
ज्यामुळे तुमचा धावपळीच्या रुटीनमध्ये ही स्वयंपाक सहज सोप्या पद्धतीने करता येईल.
१) हॅन्ड ब्लेंडर
हॅन्डब्लेंडर हे तुमच्या स्वयंपाकघरासाठी आवश्यक असलेल्या छोट्या उपकरणांपैकी एक महत्त्वाचं उपकरण आहे.
ताक घुसळणे, शिजलेला पालक किंवा शिजलेली डाळ घोटणे यासारखी कामे करण्यासाठी मिक्सर पेक्षा हॅन्ड ब्लेंडरचा पटकन वापर करता येऊ शकतो.
पदार्थ एकजीव करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो.
स्टेनलेस स्टील फिनिश आणि 5-स्पीड असणारे शिवाय टर्बो सेटिंग असणारे ब्लेंडर आज बाजारात उपलब्ध आहेत.
हॅन्डब्लेंडर वापरायला सोपं आणि सोयीस्कर ठरतं.
२) टोस्टर
स्वयंपाक करायला वेळ पुरत नाही?
मग अशावेळी टोस्टर तुमच्यासाठी तारणहार ठरु शकतो. नाश्ता झटपट करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.
यात वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड टोस्ट तयार करता येतात. मैद्याचा ब्रेड घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे टोस्ट करण्या बरोबरच आपली कल्पकता वापरून हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी टोस्टर हे एक परफेक्ट साधन आहे.
ज्युसर, मिक्सर-ग्राइंडर, फूड प्रोसेसर यांचा वापर करून असे मिल्कशेक, स्मूदीज तुम्ही आरामात बनवू शकता. आरोग्यासाठी सुध्दा हे उपयुक्त ठरतील. चौरस आहार घेण्याची सवय यातून तुमच्या कुटुंबाला लागेल.
फूड प्रोसेसर चा वापर करून कणिक मळणे, ज्यूस, मिल्कशेक बनवणे हे सोपे होऊन जाईल.
४) मल्टी कुकर
जर तुम्हाला असं सांगितलं की तळणं, जाळीवर खरपूस भाजणं, वाफेवर शिजवणं, भाजणं यासाठी वेगवेगळ्या स्वयंपाकाच्या भांडयांची गरज नाही तर?
आश्चर्य वाटलं ना ?
तुमचे पैसे आणि जागा वाचवण्यासाठी एक ८ इन-१ मल्टी कुकर बाजारात उपलब्ध आहे.
यात स्वयंपाकाच्या ८ वेगवेगळ्या पद्धतींच वापर करता येतो.
याचा कुकर म्हणून वापर तुम्ही करू शकता, यात पदार्थ वाफवण्यासाठी स्टीम रॅक असते, तळण्यासाठी बास्केट, पदार्थ उकळवण्यासाठी काढता येण्याजोगे नॉन-स्टिकचं भांड यात तुम्हाला मिळतं.
डीप फ्राय, ग्रिल, स्टीम, रोस्ट, स्लो कुक, बेक, शॅलो फ्राय आणि उकळणे हे ८ प्रकार या कुकरमध्ये असतात.
५) फूड स्टीमर
पटकन होणाऱ्या पौष्टिक पदार्थांसाठी फूड स्टीमर तुमच्या स्वयंपाकघरात असणं उपयुक्त ठरतं.
वाफेवर अन्न शिजवणं ही स्वयंपाकाची सगळ्यात उत्तम आरोग्यदायी पद्धत आहे.
वाफेभर शिजणारं अन्न पौष्टिक असतं त्यासाठी कमीतकमी वेळ लक्ष द्यावं लागतं.
स्टीमरमध्ये तुम्ही ढोकळा, इडली, मोदक, मोमोज आणि ब-याच गोष्टीं तयार करू शकता. अंडी बॉईल करण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता.
तर, मित्रमैत्रिणींनो स्वयंपाक करण्याची आवड आधुनिक उपकरणांच्या मदतीने कमी वेळात सोप्या पद्धतीने पुर्ण करता येते.
शिवाय तुमच्या घरात जर कॉलेजच्या वयाची मुले असतील, तर ही अशी उपकरणे वापरून ते कसे किचन मध्ये आवडिने यायला यायला लागतील बघा!!!
तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आणि हो! हा लेख दिलेल्या योग्य पर्यायांचा वापर करून आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा