मिक्सर ग्राइंडर नीट साफ करण्यासाठी या टीप्स तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरतील.

मिक्सर ग्राइंडर साफ करण्याची पद्धत

मैत्रीणींनो, समजा तुम्हांला सांगितलं आज स्वयंपाक करताना अजिबात मिक्सर ग्राइंडर वापरायचा नाही, तर काय होईल?

तुम्ही म्हणाल “अशक्य”!

मिक्सर ग्राइंडर हा नेहमीच स्वयंपाकघरातला आणि स्वयंपाकाचासुद्धा अविभाज्य घटक आहे.

आता, तर मिक्सर ग्राइंडर मध्ये इतक्या वेगवेगळ्या गोष्टी सहजपणे करता येतात त्यामुळे त्याचं महत्त्व अधिकच वाढलं आहे.

मिक्सर ग्राइंडरमध्ये तुम्ही भाज्या चिरू शकता, मसाले बारीक करु शकता, प्युरी तयार करू शकता, ते ही अवघ्या काही मिनिटात!

रोजच वापरल्या जाणा-या या मिक्सर ग्राइंडरचे जार प्रत्येक वापरानंतर तर स्वच्छ करावेच लागतात, पण आठवड्यातून एकदा त्यांना नीट साफ करणं, त्यांची निगा राखणं गरजेचं आहे.

लक्षात घ्या कोणत्याही उपकरणाची कालांतराने झीज होते, त्यामुळे जास्त काळ टिकण्यासाठी आपल्या मिक्सर ग्राइंडरची नियमितपणे काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

वेळोवेळी काळजी घेतल्यामुळे मिक्सर ग्राइंडर सतत बिघडणार नाहीत.

मिक्सर ग्राइंडरचे जार साफ करण्याचे बरेच मार्ग आहेत.

चला, आज आपण मिक्सर ग्राइंडरचा जार साफ करण्याचे काही सोपे उपाय पाहूया.

१) लिक्विड डिटर्जंट वापरा

प्रत्येक वापरानंतर दररोज मिक्सर ग्राइंडरचा जार स्वच्छ करण्यासाठी भांड्याचा साबण वापरला जातो.

पण त्याऐवजी लिक्विड डिटर्जंट जर तुम्ही वापरलंत तर साफसफाई करणं सोपं होतं.

लिक्विड डिटर्जंटचे अगदी काही थेंब पुरेसे ठरतात.

या लिक्विड डिटर्जंटचा वापर कसा करायचा?

लिक्विड डिटर्जंटचं द्रावण थोडावेळ जारमध्ये तसंच राहू द्या आणि नंतर मिक्सर ग्राइंडरचा जार स्वच्छ पाण्याने धुवा.

२) लिंबाची सालं वापरा.

तुमच्या मिक्सर ग्राइंडरचा जार साफ करण्याचा हा सगळ्यात स्वस्त आणि मस्त मार्ग आहे.

लिंबामध्ये असणारं सायट्रिक ऍसिड घट्ट चिवट डाग काढायला मदत करतं. अँटी बॅक्टेरियल गुणधर्मामुळे मिक्सरच्या ब्लेड चे पाते आणि इतर हात पोहोचण्यासाठी अडचणीची ठिकाणे स्वच्छ व्हायला मदत होते.

लिंबाची साल डाग कमी करून आणि तीव्र वासाला ही कमी करु शकते, डिटर्जंटमुळे डाग आणि वास पटकन कमी होत नाहीत.

लिंबाची साल घ्या आणि ती झाकणांवर आणि मिक्सर ग्राइंडरच्या जारच्या आत घासा. १५ मिनिटांनंतर जार पाण्याने स्वच्छ धुवा.

लिंबू वापरण्याचा दुसरा एक मार्ग म्हणजे लिंबाचा रस तुमच्या लिक्विड डिटर्जंटमध्ये मिसळून वापरा.

३) बेकिंग सोड्याची पेस्ट वापरा.

बेकिंग सोडा मिक्सर जारमध्ये अडकून बसलेल्या पिठाला आणि प्युरीला प्रभावीपणे साफ करतो.

बेकिंग सोड्यात सौम्य अल्कधर्मी गुणधर्म असतात जे चिकट गोष्टी सहज स्वच्छ करतात.

आठवड्यातून एकदा बेकिंग सोड्याचा वापर तुमच्या मिक्सर ग्राइंडरच्या जारना स्वच्छ ठेवतो.

मिक्सर ग्राइंडर जारमध्ये पाणी आणि बेकिंग सोडा समान प्रमाणात घाला.

एक छोटा चमचा बेकिंग सोडा घेतला असेल तर तितकंच पाणी घ्या. काही सेकंदांसाठी मिक्सर चालू करा. आणि जार स्वच्छ धुवून घ्या.

अजूनही काही डाग दिसत असतील तर जार कोमट पाण्याने आणि साबणानं लगेच धुवा.

४) पाणी आणि व्हिनेगर वापरा.

मराठी कुटुंबांमध्ये दाण्याचा कूट घातलेली भाजी किंवा खडा मसाला बारीक करून केलेली भाजी याचा रोजच्या जेवणात समावेश असतो.

याचाच अर्थ मिक्सर ग्राइंडरचा जवळजवळ रोजच वापर केला जातो.

करीसाठी मसाला बारीक केल्यानंतर जार नीट साफ केला नाही तर डाग पक्के बसतात.

हे कठीण डाग कमी करण्यासाठी व्हिनेगर आणि पाणी यांचं द्रावण तुम्हांला मदत करू शकतं.

त्यासाठी २ चमचे व्हिनेगर थोड्याशा पाण्यात मिसळा आणि मिक्सरमध्ये घाला. काही सेकंदांसाठी मिक्सर फिरवा आणि नंतर जार पाण्याने धुवा.

प्युरी उडून डाग झाकणावर पडले असतील तर त्यावर व्हिनेगर आणि पाणी समान भागात मिक्स करून वापरू शकता.

५) रबिंग अल्कोहोल वापरा

रबिंग अल्कोहोल हे हात आणि पृष्ठभाग निर्जंतुक करण्यासाठी वापरलं जातं.

रबिंग अल्कोहोल मिक्सर ग्राइंडर साफ करण्यासाठी, निर्जंतुक करण्यासाठीसुद्धा वापरता येतं.

माईल्ड रबिंग अल्कोहोल चा वापर तुम्ही करू शकता.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

1 Response

  1. Vijay says:

    छान माहिती मिळाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!