ती

रोज मी एक कविता करतो,
त्या कवितेत फक्त तिलाच बघतो..
तिला पाहून,
गालातल्या गालात हसतो…
अन हळूच भरलेले डोळे पुसतो…
आई ने विचारलं, “काय झाल?”,
तर तिला काहीतरी थाप मारतो…
अन् शब्दांच्या विश्वात,
परत तिलाच मी शोधत फिरतो ..
रोज मी हेच करतो…
माझी नसणाऱ्या तिला,
रोज मी कवितेत बघतो…
अन् सत्यात जरी ती माझी नसली,
तरीही..
रोज तिला मी कवितेत,
फक्त माझीच करतो…
रोज तिला मी कवितेत,
फक्त…
…. माझीच करतो….

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा