या गणेश चतुर्थीला तुमची संपत्ती व्यवस्थापित करण्यासाठी गणपतीबाप्पाकडून शिका ५ धडे

श्री गणेशाचे आगमन झाले आहे, वातावरणात उत्सव आणि उत्साह आहे.

भारतात, धार्मिक समारंभ नेहमी गणेशाला नमन करून सुरू होतात.. गणेशाला “प्रथमेश” होण्याचा अनन्यसाधारण मान हिंदू धर्मात दिलेला आहे.

गणपतीला नवीन आरंभाचा स्वामी, अडथळे दूर करणारा (विघ्नहर्ता), तसेच समृद्धी, संपत्ती आणि बुद्धीची देवता म्हणूनही ओळखले जाते.

आजच्या दिवशी या लेखात श्री. गणेशाने दिलेले काही शाश्वत धडे आपण शिकणार आहोत. ते पूर्णपणे शिकण्यासाठी आणि ते आमलात कसे आणायचे हे समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नीट वाचा.

गणेशाचे रूप पाहून आत्मसात करण्याचे हे धडे, पर्सनल फायनान्स आणि गुंतवणूकीच्या जगात देखील तितक्याच चपखलपणे लागू होतात.

या गणेशोत्सवात, विघनहर्त्यापासून प्रेरणा घ्या, आणि आपल्या संपत्तीचे सूज्ञपणे नियोजन करण्याची सुरुवात करा.

१) गजानन – हत्तीसमान मुख (ज्ञानाचा विशाल महासागर)

गणपतीचे मोठे हत्तीचे डोके मोकळे मन, काळाच्या पुढचे विचार आणि ज्ञानाच्या विशाल महासागराची आठवण करून देतात.

त्याचप्रमाणे हत्तीचे मुख हे गणेशाला शंकर भगवनांनी पर्याय म्हणून बसवले होते, तसेच आर्थिक नियोजन करताना कुठलीही अडचण उभी राहिली तरी, पर्यायी व्यवस्था म्हणून ‘रिझर्व्ह फ़ंड्स’ किती गरजेचे आहेत, हे समजून घेऊन त्या साठी तुम्ही तयारी सुरू केली पाहिजे.

रिझर्व्ह फ़ंड्स म्हणजे काय आणि ते कसे जमवावे याबद्दल माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा

कष्टाने कमावलेले पैसे व्यवस्थापित करण्यासाठी आर्थिक साक्षर असणे आवश्यक आहे. म्हणून, आर्थिक आणि गुंतवणूक यावरील विविध लेख आणि ब्लॉग वाचून तुम्ही तुमचे ज्ञान वाढवले पाहिजे. या विषयीचे ज्ञान तुम्हाला नक्कीच समृद्धीच्या मार्गाने वाटचाल करायला शिकवेल. यासाठी तुम्ही मनाचेTalks वर विविध लेख वाचू शकता.

2. लांबकर्ण – लांब कान (लक्ष केंद्रित करण्याची क्षमता)

तुम्ही भगवान गणेशाच्या लांबकर्ण/ गजकर्ण या अवतारापासून प्रेरणा घेऊ शकता.

त्याचे हे कान एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करण्याची शिकवण देतात. जेव्हा आपण आपले मन एखाद्या ध्येयावर ठेवतो, तेव्हा त्यावर लक्ष केंद्रित करणे आणि ते साध्य करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलणे महत्त्वाचे असते. योजनेशिवाय ध्येय हे फक्त एक स्वप्न ठरते.

एकदा तुमच्याकडे योजना तयार झाली की, तुमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आणि त्यात सातत्य ठेवले पाहिजे.

ऐकून शिकलेल्या गोष्टी अमलात आणताना विचलित होण्यापासून परावृत्त होण्यासाठी खर्च आणि बचत करण्याची शिस्त अंगी लावून घेतली पाहिजे.

खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी बजेट तयार करा. अकारण आणि उत्पन्नाचा आढावा न घेता खर्च करणे टाळले पाहिजे.

ही सवय तुम्हाला तुमचे पैसे व्यवस्थापित करण्यात आणि अनावश्यक खर्च टाळण्यास मदत करेल. तुम्ही सर्वात जास्त कुठे खर्च करता आणि कोणते खर्च कमी केले जाऊ शकतात हे निर्धारित करण्यासाठी तुम्ही तुमच्या खर्चाचा आढावा घ्या.

अशा प्रकारे, तुम्ही फक्त तुमचा खर्च कमी करणार नाही, तर तुमच्या बचत आणि गुंतवणुकीला देखील चालना द्याल.

3. लंबोदर – मोठे पोट (आर्थिक जोखीम पत्करण्याची तयारी)

गणेशाचे लंबोदर आपल्याला जी प्रेरणा देते ती आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात खूप गरजेची आहे.

जोखीम पचवण्याची अफाट क्षमता ज्या माणसात असते त्याला कोणीही हरवू शकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. जोखीम घ्यायला जो घाबरला तो स्वतःच आपल्या प्रगतीचे मार्ग बंद करतो.

आयुष्यात अनिश्चितता केव्हाही येऊ शकते. आर्थिक विषय जेव्हा येतो, तेव्हा सुद्धा जोखीम पत्करण्याची तयारी ठेवणे ज्याला जमते तो झपाट्याने समृद्धीच्या मार्गाने पुढे जातो.

कोणत्याही अनपेक्षित घटनेमुळे तुमच्या मार्गात येणाऱ्या आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी तुम्ही सक्षम असले पाहिजे.

कोणत्याही आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी तुम्ही आपत्कालीन निधीसह (रिझर्व्ह फ़ंड्स) वेगवेगळ्या प्रकारची सुरक्षा तयार ठेवली पाहिजे. ही सुरक्षा म्हणजे जीवन विमा आरोग्य विमा यांची तरतूद योग्य वयात केली पाहिजे.

4. विघ्नहर्ता – जीवनातील अडथळे दूर करणारा (आर्थिक सुरक्षिततेचि निश्चिती)

भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणूनही ओळखले जाते. कोविडच्या दिवसात आपण पाहिले होते की जीवन किती अनिश्चित आहे.

आणि या अनिश्चिततेसाठी तयार राहायलाही आपण शकले पाहिजे. पुरेशा प्रमाणात विमा संरक्षण खरेदी करून भविष्यात येणाऱ्या अडथळ्यांना आणि अडचणींना सामोरे जाण्यासाठी तयार राहून आपण गणेशाच्या विघ्नहर्ता अवतारापासून प्रेरणा घेतली पाहिजे.

तुम्ही भविष्याचा अंदाज लावू शकत नाही पण तुम्ही स्वतःला आणि तुमच्या प्रियजनांना पुरेसे जीवन आणि आरोग्य विम्याचे सुरक्षा कवच देऊन अकस्मात होणाऱ्या आघातापासून वाचवू शकता.

एक चांगली विमा योजना अचानक उदभवणारी आरोग्य समस्या, कुटुंबातील एकमेव कमावत्या सदस्याचा मृत्यू इत्यादी परिस्थितींमध्ये मदत करते.

विघ्न हरण्यासाठी तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला कोणती माहिती असली पाहिजे ते वाचा या लेखात

5. मुषक (भगवान गणेशाचे वाहन)

हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान गणेशाचे वाहन, म्हणजे मूषक.

साधी राहणी आणि चपळता याचे प्रतीक म्हणजे गणेशाचे वाहन.

भगवान गणेशाने आपले वाहन म्हणून ‘उंदीर’ निवडला कारण त्याला अगदी लहान साधनांचीही किंमत माहीत होती.

यावरून हेही लक्षात घेतले पाहिजे की आपण छोट्या छोट्या गोष्टींच्या सामर्थ्याला कमी लेखू नये.

तुमची संपत्ती चाणाक्षपणे व्यवस्थापित करायची असेल, तेव्हा गुंतवणुकीचे नियोजन हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

शक्य तितक्या लवकर बचत सुरू करणे आणि म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीद्वारे नियमितपणे गुंतवणूक करणे यासारख्या छोट्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका.

म्युच्युअल फंडातील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIPs) हा गुंतवणुकीचा एक आदर्श पर्याय आहे आणि या SIPs म्हणजे तुमचा संपत्ती निर्मितीचा प्रवास सुरू करण्यासाठी तुम्हाला उचलावी लागणारी छोटी पावले आहेत.

एसआयपी मधील गुंतवणूक तुम्हाला चक्रवाढ शक्तीचा लाभ देतात, यासाठी तुम्ही छोट्या रकमेपासून सुरुवात करू शकता,

तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये दरमहा रु. 500/- इतकी कमी गुंतवणूक सुरुवात करू शकता आणि हळूहळू रक्कम वाढवू शकता.

Banner

गणपती बाप्पाला नवीन सुरुवातीचा स्वामी म्हणून ओळखले जाते, या गणेश चतुर्थीला श्री. गणेशाचे आशीर्वाद घ्या आणि संपत्ती निर्मितीचा तुमचा प्रवास सुरू करा,

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे सगळं तर समजलं, पण याचा उपयोग कसा करायचा, तर सोपं आहे, हे सगळं अमलात आणायला शिकायचं असेल तर उद्यापासून आमच्याबरोबर ३० दिवसांच्या प्रवासात सहभागी व्हा!

उद्यापासून मनाचेTalks च्या फेसबुक पेजवर 30 Days Challenge For Financial साठी मनाचेTalks चे फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. हा लेख तुमच्या मित्र परिवारात शेअर करा. म्हणजे तुमची इच्छुक मित्र मंडळी मनाचेTalks सुद्धा मध्ये सहभागी होऊन प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करू शकतात.

या प्रवासात सहभागी व्हायचे असेल तर कमेंट्स मध्ये जरूर सांगा. मनाचेTalks बरोबर जोडले जाण्यासाठी लिंक खाली दिलेल्या आहेत.

तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “या गणेश चतुर्थीला तुमची संपत्ती व्यवस्थापित करण्यासाठी गणपतीबाप्पाकडून शिका ५ धडे”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय