हृदयाला हानिकारक फॅट्स न वाढवणारे तूप बनविण्याच्या ५ पद्धती

भारतीय जेवण आणि आयुर्वेद यामध्ये तुपाल अनन्यसाधारण महत्त्व आहे.

प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात तुपाचे स्थान हे अबाधित आहे. मग ती चपाती असो, खिचडी असो किंवा साधा डाळ-भात पण तुपाचा वापर केल्याशिवाय जेवणात परिपूर्णता येत नाही.

स्वयंपाकात वापरण्याव्यतिरिक्त भाजलेल्या त्वचेवर किंवा कोरड्या त्वचेवर मॉईस्चरायझर म्हणून सुद्धा तूप गुणकारी आहे.

तुपात मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात, तसेच त्यात अँटीइंफ्लेमेट्री म्हणजेच दाहकता कमी करणारे गुणधर्म असतात. आणि सामान्यतः असा समज असतो की, तुपाचे सेवन जास्त झाले तर चरबी वाढते. म्हणूनच या लेखात असे ५ अन्नपदार्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांचा वापर तुपाबरोबर केला तर हृदयाला उपयुक्त चरबी, शास्त्रीय भाषेत ‘गुड कोलेस्टेरॉल’ चे प्रमाण वाढते. इतकेच नाही तर त्याचे आरोग्यासाठी उपयुक्त गुणधर्म सुद्धा वाढतात.

तूप आरोग्यदायी कसे बनवायचे?

1. हळद: तुपाप्रमाणेच, हळद प्रत्येक भारतीय घरात एक महत्त्वाचा जिन्नस आहे आणि आरोग्यासाठी आहारात त्वचेसाठी फेस पॅक मध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारे हळदीचा वापर होतो.

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या अहवालानुसार, हळदीमध्ये असलेल्या नैसर्गिक फायटोकेमिकल कर्क्यूमिनमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इंफ्लेमेट्री गुणधर्म असतात.

शास्त्रीय अभ्यासातून असे दिसून आले आहे की कर्क्यूमिन सांधेदुखी वर गुणकारी औषध ठरते.

हळदयुक्त तूप बनवण्यासाठी १ कप तुपात १ चमचा हळद आणि १/२ टीस्पून काळी मिरी पावडर घाला आणि हवाबंद बरणीत ठेवा.

2. तुळस: तुळशीचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. तुळशीची पाने A, C आणि K जीवनसत्त्वाने समृध्द असतात. त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतात.

वैज्ञानिक अभ्यासानुसार, तुळस रक्तातील ग्लुकोज, रक्तदाब आणि लिपिड लेव्हल सामान्य करण्यास मदत करते.

तुळशीमध्ये असलेल्या अँटी डिप्रेसंट गुणधर्मांमुळे काही मानसिक तणाव कमी करण्यात सुद्धा तुळस फायदेशीर ठरते.

तुपासह तुळशीचा वापर करण्यासाठी, लोणी उकळताना तुळशीची काही पाने घाला. याचे इतर आरोग्य दायी फायदे जसे आहेत, तसेच तुपाल एक चांगला सुगंध सुद्ध याने येतो.

3. दालचिनी: दालचिनी हे एक अँटिऑक्सिडेंट आहे, त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. टाइप-2 डायबिटीस मध्ये इन्श्युलीन नियंत्रणात ठेवण्या बरोबरच, रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी देखील दालचिनी उपयुक्त ठरते.

दालचिनीमध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. त्वचेच्या सौंदर्यासाठी सुध्दा दालचिनी फायदेशीर आहे.

तुम्ही दालचिनीचे तूप दोन प्रकारे बनवू शकता. लोणी उकळताना दालचिनी घाला आणि मिश्रण गाळून घ्या किंवा पॅनमध्ये तूप घाला आणि त्यात दोन दालचिनीच्या काड्या टाका. हे तूप पाच मिनिटे गरम करून थंड होऊ द्या.

4. कापूर: कापराची ओळख सहसा सर्वांना देवपूजे पुरतीच असते. पण कापूर आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त असतो. एडीबल म्हणजे खाण्यायोग्य कापूर सुद्धा बाजारात उपलब्ध असतो.

कापूर हा कापूर झाडाच्या सालापासून तयार होतो. कापूर पचनासाठी चांगला असतो, कापरात अँटी इंफ्लेमेट्रि गुणधर्म असतात. सांधेदुखीच्या रुग्णांना मदत कापराच्या वापराने फायदे होतात. कापराचे तेल हे वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते.

ते तुपात वापरण्यासाठी, तुपात खाण्यायोग्य कापराचे (Edible Camphor) एक-दोन तुकडे टाका आणि पाच मिनिटे गरम करा. थंड होऊ द्या आणि हवाबंद बरणीत गाळून घ्या.

5. लसूण: ऑलिव्ह ऑइल प्रमाणेच तुपात लसूण देखील एक उत्तम संयोजक आहे. चवीशिवाय, लसूण रोगप्रतिकार शक्ती वाढवते, त्यात अँटी ऑक्सिडंट्स बरोबरच अँटी इंफ्लेमेट्रि गुणधर्म असतात. हृदयरोग, उच्च रक्तदाब, कॅन्सर या आजारांमध्ये लसूण गुणकारी ठरतो.

लसणाने युक्त तूप बनवण्यासाठी, लसणाच्या काही पाकळ्या चिरून घ्या आणि तुपाच्या भांड्यात घाला. साधारण पाच मिनिटे मंद आचेवर ढवळून पॅन झाकून ठेवा. तसेच लोणी कढताना त्यात लसणाच्या काही पकळ्या घातल्या तरी तुपात लसणाचे गुणधर्म उतरतात.

अशा प्रकारे बनवलेले तूप हे जेवणाची लज्जत वाढवण्याबरोबरच आरोग्यासाठी सुद्धा गुणकारी ठरते.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय