‘सा रे ग म प’ चा ध्वनी ऐकवणारे हंपी मधले विजया विठ्ठल मंदिर.

भारतातील मंदिरं स्थापत्यशास्त्राचा अदभूत आविष्कार तर आहेतच पण विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी ह्यांच्या मिलाफाचा आणि एका अत्युच्य संस्कृतीचे द्योतक पण आहेत. प्रत्येक मंदिर बघताना त्यात असेलेल्या किंवा वापरल्या गेलेल्या तंत्रज्ञानाने आपण अवाक होतो. पूर्वीच्या पिढ्यांकडून आपण नेहमी ऐकलं असेल कि एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघत असायचा. पण सोन्याचा धूर निर्माण करायला तंत्रज्ञान, विज्ञान लागते हे सांगण्यास मात्र आपले पूर्वज विसरले हे मात्र खेदाने सांगावेसे वाटते. आपल्या अचाट बुद्धिमत्तेला त्यांनी देवाचं रूप दिलं. कर्मकांड करताना आपण तंत्रज्ञान आणि विज्ञानाला विसरून गेलो. म्हणून आजही त्या देवळांकडे श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या दोन खिडक्यानमधून बघण्यात येत. अगदी काहीच कळलं नाही तर परग्रहावरून कोणीतरी येऊन ह्याची निर्मिती केली असं म्हणून हि आपण अनेकदा मोकळे होतो. पण त्यात लपलेल्या तंत्रज्ञान आणि विज्ञान ह्याचा मागोवा घेण्याचं धाडस किंवा इच्छा खूप कमी लोक दाखवतात.

एका वेगळ्या तंत्रज्ञानाचा अविष्कार आजही आपल्या समोर घेऊन उभं असलेलं एक मंदिर भारतात आजही उभं आहे. मुस्लीम राजवटी नी केलेला अत्याचार, इंग्रजांनी केलेली लुट ह्या सगळ्याला पुरून उरत २१ व्या शतकातहि न समजलेल्या तंत्रज्ञानाला आपल्यासमोर टिकवून आहे. हे मंदिर आहे हंपी, कर्नाटक येथील विजया विठ्ठल मंदिर. विजयनगर साम्राज्याचे अनेक अवशेष आजही Humpi मध्ये बघायला मिळतात. २५ चौरस किमी च्या क्षेत्रात आजही ह्या भारतातील एका श्रीमंत आणि गौरवशाली राजवटीचे अवशेष आपल्याला त्या काळातील सुबत्तेची जाणीव करून देतात. १५ व्या शतकात बांधलेलं हे मंदिर किंवा हा पूर्ण भागच स्थापत्यशास्त्राचा एक अमूल्य ठेवा आहे. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कला ह्यांचा सुरेख मेळ इथल्या प्रत्येक कलाकृतीत ठासून भरला आहे. भगवान विष्णूच्या विठ्ठल अवतारावर हे मंदिर आधारित आहे.

ह्या मंदिरातील तंत्रज्ञानाचा अविष्कार म्हणजे इकडे असलेला ‘सा, रे, ग, म’ मंडप. नावावरून लक्षात आलं असेलच कि भारतीय संगीतात असलेल्या सप्तसुरांवर आधारित असलेला हा मंडप आहे. ह्या मंडपाचे ५६ खांब म्हणजे एका रहस्यमयी तंत्रज्ञानाचा आविष्कार आहेत. ह्या खांबावर हाताने मारलं असता त्यातून ध्वनीची निर्मिती होते. प्रत्येक खांबाच्या रचनेत एक मोठा खांब ७ छोट्या खांबांनी वेढलेला आहे. ह्यातले ७ खांब हे त्यावर हाताने मारल्यावर वेगवेगळ्या ध्वनींची किंवा नादांची निर्मिती करतात.

भारतीय संगीत संस्कृतीत असलेल्या सप्तका प्रमाणे प्रत्येक खांब वेगवेगळ्या ध्वनीनादांची निर्मिती करतो. हे सगळे खांब एकाच दगडातून बनवले गेले असून त्यांची उंची, जाडी, आकार सारखाच आहे. तरीपण प्रत्येक खांब हा वेगळ्या ध्वनी ची निर्मिती करतो. चंदनाच्या लाकडाने ह्यावर संतुलित पद्धतीने मारल्यास ह्यातून वेगवेगळ्या संगीत वाद्यातून निघणाऱ्या संगीताची निर्मिती होते. जसं कि तार असणारी वाद्य गिटार किंवा मडक्यातून निघणारा ध्वनी किंवा जलतरंग सारख्या वाद्यातून निघणाऱ्या सुरांची निर्मिती हि खांबातून होते. हे इकडे च थांबत नाही. तर इकडे असणाऱ्या मूर्तीच्या गळ्यात असणाऱ्या प्रतीकात्मक ढोलकी मधून ढोलकी चा आवाज येतो.

ह्या मंडपाच्या छतावरती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. वर वर पाहताना ते साधारण वाटेल पण त्यातल्या नक्षीच्या मागे हि तंत्रज्ञान आहे. ध्वनीचे नाद हे एका विशिष्ठ पद्धतीचे तरंग निर्माण करतात. काही वर्षापूर्वी झालेल्या संशोधनातून हे सिद्ध झालं आहे कि हे तरंग जर व्हायब्रेट झाले तर वेगवेगळ्या नक्षी बनवतात. ह्याला सायमॅटिक्स असं म्हणतात. (Cymatics, from Greek: κῦμα, meaning “wave”, is a subset of modal vibrational phenomena. The term was coined by Hans Jenny (1904-1972), a Swiss follower of the philosophical school known as anthroposophy. Typically the surface of a plate, diaphragm or membrane is vibrated, and regions of maximum and minimum displacement are made visible in a thin coating of particles, paste or liquid.[1] Different patterns emerge in the excitatory medium depending on the geometry of the plate and the driving frequency.)

मंदिराच्या छतावर असलेल नक्षीकाम हे ह्या ध्वनीमधून निर्माण होणाऱ्या पॅटर्नशी अगदी जुळते. ह्याचा अर्थ हा छतावर काढलेल्या नक्षी साधारण नसून सायमॅटिक्स सारखं ध्वनीचं तंत्रज्ञान आणि त्याचा अभ्यास त्याकाळी झालेला होता. त्याशिवाय ह्या मंडपात त्याचं अस्तित्व शक्य नाही.

इंग्रजांना हि त्याकाळी ह्या ध्वनी उत्पन्न करणाऱ्या खांबांचं कुतूहल वाटलं. आत काय असेल ह्यासाठी मंदिरातील दोन खांब कापले पण आत काही मिळालं नाही. अभियांत्रिकी शाखेचा अभ्यास केलेल्या सगळ्यांसाठीच हे कुतूहल असेल कि अगदी सारखा आकार, लांबी, रुंदी, जाडी आणि त्यात वापरला गेलेला दगड जर सारखा आहे तर प्रत्येक खांब वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी ची निर्मिती कशी करू शकतो. ह्यामध्ये कोणतेही होल केलेले नाहीत त्यामुळे जर अश्या स्थितीत एकच बदल ह्याला कारणीभूत होऊ शकतो तो म्हणजे ह्या दगडांची घनता (डेन्सिटी) वेगळी करणं. जर तसे असेल तर प्रत्येक खांबात वापरला गेलेला दगड हा वेगळ्या घनतेचा आहे. जसे आपण आत्ता अलॉय बनवतो ज्यात वेगवेगळे धातू मिसळून वैशिष्ठ असणारं संयुग बनवलेले असते. त्याच प्रमाणे ह्या खांबांच्या दगडात सिलिका आणि धातू एका विशिष्ठ प्रमाणात मिसळून त्यांची निर्मिती केली गेली आहे. ह्याचा अर्थ ग्रानाईट सारखा कठीण दगड वितळवून त्याची संयुग बनवण्याचं विज्ञान, शास्त्र, तंत्रज्ञान हे माहित असल्याशिवाय हे शक्य नाही.

बरं नुसतं कोणत्याही प्रमाणात कसंही संयुग बनावयाचं नाही. कारण त्यातील प्रत्येक घटकांचं प्रमाण हे त्यातून निघणारा नाद ठरवणार. म्हणजे आधी संयुगं बनवून त्यातून निघणाऱ्या आवाजाची नोंद करून मग त्या पद्धतीने सप्तकाचे ध्वनी निर्माण करणारे खांब आणि त्याचं निर्माण करणं म्हणजे भारतीय तंत्रज्ञान किती उच्च दर्जाच होतं ह्याचा आपण विचार पण करू शकत नाही. कारण इकडे नुसतं स्थापत्यशास्त्र नाही, नुसती अभियांत्रिकी नाही, नुसतं विज्ञान तंत्रज्ञान नाही तर त्या सोबत ध्वनीची जाण आणि त्याचं महत्व ओळखणारं शास्त्र ह्या सगळ्यांचा सुंदर मिलाफ केलेला आहे. ह्या मंडपात आधी दगडांच्या चेन ओवलेल्या होत्या असे म्हंटले जाते. त्याचे हुक आजही इकडे अस्तित्वात आहेत. दगडांचे हुक सँडस्टोन म्हणजे वाळूखडकाचे आहेत तर छत हे ग्र्यानाईटचं आहे. आधुनिक तंत्रज्ञाना प्रमाणे जर दोन वेगळे धातू जोडायचे असतील तर एका धातूला वितळणं गरजेचं आहे. म्हणजे दगडांना वितळवून त्यांना वेल्डिंग करणारं तंत्रज्ञान त्या काळी ज्ञात असल्याशिवाय हे शक्य नाही.

आज आपले लोक तिकडे जाऊन ह्या खांबाना लोखंडाने मारून आवाज करतात. तसेच कॉईन घेऊन त्यावर आपटून नाद निर्मिती करण्याचा मूर्ख प्रयत्न करतात. ज्यात ह्या दगडी खांबाना हानी होत आहे. कारण ज्यावर बोटांनी मारल्यावर नाद निर्मिती होते किंवा चंदनाचं लाकूड मारल्यावर नाद निर्मिती होते तिकडे लोखंडाची काय गरज? पण २१ व्या शतकाचं प्रतिनिधित्व करणारी सो कॉल्ड उच्चशिक्षित लोक ह्या ऐतिहासिक ठेव्याची वाट लावत आहेत. सेल्फी, पिकनिक ला आल्यासारखं वागणं, आपल्या पैश्याचा माज आणि आम्ही मोठे असल्याची जाणीव निदान ह्या ठिकाणी तरी बाजूला ठेवण्याची आणि तसा सिविक सेन्स आपल्यात निर्माण करण्याची गरज आहे. ह्या मंदिरांकडे बघताना डोळसपणे बघण्याची गरज आहे. श्रद्धा असली तरी त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन ते शिकण्याची किंबहुना निदान त्याचा विचार करण्याची प्रगल्भता आपल्याला ह्या ठिकाणी भेट देताना यायला हवी. ह्या जागेचं पावित्र्य, इथली संस्कृती. इथलं सौंदर्य हे पुढल्या पिढीकडे देण्यासाठी आपल्याला आधी आपल्या आत बघण्याची गरज आहे.

प्रश्न हा नाही कि किती वर्ष आपण भारताच्या त्या संस्कृतीचे गोडवे गायचे प्रश्न हा आहे कि आपण आधी समजून तरी घेतली आहे का ती संस्कृती? कारण त्याकाळी सगळ्यात वर होतं विज्ञान, तंत्रज्ञान आणि म्हणूनच आज शेकडो वर्षानंतर त्याचे अवशेष आजही त्यातल तंत्रज्ञान आणि विज्ञान आपल्यासमोर मांडत आहेत. आपण इतके करंटे कि एकतर आपण फक्त हात जोडतो किंवा आता किती वर्ष त्यात अडकायचं म्हणून अमेरिकेची वाट धरतो. पण आपल्याच संस्कृतीच्या ह्या अनमोल ठेव्यांकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघत नाही. ह्या सिरीज चा उद्देश तो वेगळा दृष्टीकोन निर्माण करणं आहे.

Manachetalks

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “‘सा रे ग म प’ चा ध्वनी ऐकवणारे हंपी मधले विजया विठ्ठल मंदिर.”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय