Swimming : स्ट्रेस – फ्री करणारा संपूर्ण शरीराचा व्यायाम! पोहोण्याचे ‘हे’ फायदे वाचून थक्क व्हाल!!

पोहण्याचे फायदे वाचाल तर थक्क व्हाल

व्यायाम म्हंटलं की, काही लोकांना ती अत्यंत कंटाळवाणी गोष्ट वाटते. नवीन वर्षाच्या सुरूवातीला सर्वच जण व्यायाम करण्याचा संकल्प करतात, परंतु दोन ते तीन दिवसांच्या वर त्याचे पालन केले जात नाही.

व्यायामामुळे आपले शरीरच नाही तर मनदेखील सुदृढ राहते. अनेक आजारांपासून मुक्त होण्यासाठी डॉक्टर वेगवेगळे व्यायाम सुचवतात.

पण आपला आळस, व्यायाम करण्याचा कंटाळा, जास्त व्यायाम केल्याने होणारी अंगदुखी यासारख्या गोष्टींमुळे आपण व्यायाम करणे अर्धवट सोडतो.

परंतु, एक व्यायाम असा आहे जो तुम्ही जितका कराल तितकी तुमची ऊर्जाशक्ती वाढतच जाईल आणि तुम्हाला तो करावासा वाटेल.

ज्यामुळे, तुम्हाला शारिरीक कष्ट घेऊन इतर व्यायाम करायची देखील गरज पडणार नाही.
सायकलिंग हा सर्वात सोपा आणि संपूर्ण शरीरासाठी केला जाणारा व्यायाम समजला जातो, परंतु तरी काही लोकांना सायकलिंगचाही कंटाळा येतो.

पण सायकलिंगपेक्षाही आरामदायी आणि सुखद असा व्यायाम म्हणजे स्विमिंग होय. स्विमिंग केल्याने संपूर्ण शरीराचा तर व्यायाम होतोच, परंतु त्यामुळे आपले मन सदैव पाण्यासारखे स्वच्छ आणि निरोगी राहते.

आपण कधी तरी फिरायला म्हणून जातो आणि तेवढ्यापुरते पाण्यात उतरतो. परंतु रोजच जर आपण आपला एक तास पाण्यात घालवला तर आपल्या आयुष्यातून शाररीक व्याधी, टेन्शन्स दूर पळून जातील.

माणसाने नेहमी निसर्गाच्या सानिध्यात राहिले पाहिजे असे म्हणतात, त्यासाठी सकाळी लवकर उठून वॉक करणे, सकाळची स्वच्छ हवा घेणे हे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच स्विमिंगसुध्दा अत्यंत महत्त्वाचे आहे.

तर या लेखात आपण स्विमिंगचे असे अनोखे फायदे बघणार आहोत, ज्यामुळे तुम्ही एकदम आरामात तुमच्या शरीराची योग्यरित्या काळजी घेऊ शकाल.

१. आराम – स्विमिंग हा व्यायामप्रकार म्हणून पाहिलाच जात नाही. कित्येक जण स्विमिंगकडे आरामदायी गोष्ट म्हणून बघतात. सकाळी झोपेतून उठल्यानंतर किंवा संध्याकाळी काही जण एक-दोन तास पाण्यात घालवतात.

कोणत्याही प्रकारचे स्ट्रोक न करता केवळ काही वेळ पाण्यात घालवल्यानेदेखील तुम्हाला खूप फरक जाणवेल.

आपल्याला अत्यंत प्रसन्न वाटू लागते. कोणतीच व्यक्ती टेन्शन घेऊन पाण्यात उतरू शकत नाही. पाण्यात उतरल्यानंतर आपल्याला आपले शरीर मोकळे सोडावे लागते.

जसे आपण शरीर मोकळे सोडतो तसेच आपले मनदेखील प्रसन्न होते. मानसिक स्वास्थ्यासाठी डॉक्टर स्विमिंग करणे सुचवतात.

२. श्वासात सुधारणा – स्विमिंग हा श्वासासाठी सर्वात उत्तम व्यायाम आहे. श्वासावर नियंत्रण मिळवायचे असेल तर तुम्ही स्विमिंग केलेच पाहिजे.

पाण्यावर तरंगून पोहण्यासाठी आपल्याला श्वास पोटात घ्यावा लागतो व तो टप्प्याटप्प्याने सोडावा लागतो.

३. संपूर्ण शरीराचा व्यायाम – स्विमिंगमुळे पोट, हात, पाय, नितंब अशा सर्वच भागाची हालचाल होते व त्यामुळे तेथील अतिरिक्त चरबी कमी होऊन आपले शरीर फिट बनते.

आपल्याला इतर व्यायाम करण्याची जास्त गरज भासत नाही. शरीर फिट झाल्याने मनावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो.

४. भूक व झोप वाढते – आजच्या धकाधकीच्या काळात आपले कित्येकदा आपल्या जेवणाकडे दुर्लक्ष होत असते. जेवणाच्या वेळा पुढे-मागे होतात व त्यामुळे सहाजिकच शरीरावर वाईट परिणाम होतो.

परंतु, स्विमिंग केल्याने आपली भूक प्रचंड वाढते. भूकेमध्ये वाढ झाल्यामुळे भरपोट जेवण्याशिवाय गत्यंतर नसते.

त्यामुळे ज्यांना भूक न लागणे किंवा झोप न लागणे अशा समस्या असतील तर अशांनी नक्कीच रोज स्विमिंग केले पाहिजे.

स्विमिंगमुळे शांत व गाढ झोप लागते. झोप छान लागल्याने आपण दिवसभर प्रसन्न राहतो व आपली सर्व कामे नीट पार पडतात.

५. चिंता, टेन्शनपासून मुक्तता – अनेकजण ताणतणाव कमी करण्यासाठी स्विमिंग करतात. स्विमिंगमुळे खरोखरच मनावरील ताण दूर होतो. स्विमिंग करताना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागत नाही.

त्यामुळे हा व्यायामप्रकार हसत खेळत करता येण्यासारखा आहे. यामुळे शरीराच्या स्नायूंमधील ताण नाहीसा होतो व मनावरील दडपणही निघून जाते.

त्यामुळे, तुम्ही जर तणावग्रस्त असाल तर मनावरचे व शरीरावरचे ओझे कमी करण्यासाठी स्विमिंग एक उत्तम उपाय आहे.

स्विमिंगचे जसे फायदे आहेत, तसेच काही साईड इफेक्ट्सही आहेत जसे की, केस गळणे, त्वचा काळपट होणे इत्यादी. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा तेथील ट्रेनरच्या सल्ल्याने हवी ते केसांची व त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे.

ज्यांना पाण्याची भिती आहे किंवा इतर गंभीर आजार आहेत अशांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने स्विमिंग सुरू करावे.

Manachetalks

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आणि हो! हा लेख दिलेल्या योग्य पर्यायांचा वापर करून आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!