सर्टिफाइड बलात्कार…

लग्नसंस्था हि अशी एक संस्था आहे कि ज्यात प्रवेश केला कि आपसूक काही अधिकार मिळतात. ह्यात पुरुषसत्ताक सामाजिक व्यवस्थेमुळे बरचसे अधिकार हे पुरुषांकडे आपसूक येतात तर काही बाबतीत स्त्री ला त्यात वाटा मिळतो. पण किती? कसा? केव्हा? ह्या प्रश्नांची उत्तरं तितकीच सापेक्ष आहेत जितकी लग्न हे सापेक्ष आहे. कारण जिकडे १०० किलोमीटर वर भाषा बदलते तिकडे लग्नसंस्थेच्या नियमात हि तितकेच अमुलाग्र बदल केले आहेत किंवा निदान चालत आलेले आहेत.

लग्न म्हणजे खरे तर दोन अपूर्णांकांनी जवळ येऊन एक पूर्णांक बनवत आयुष्याच्या एका नवीन वळणावर जोडीने सुरवात करण्याची वेळ पण अनेकदा किंबहुना नेहमीच ह्याला एक सामाजिक व्यवस्था ज्यात दोन व्यक्ती म्हणजे तो पुरुष आणि ती स्त्री ह्यांनी शारीरिक संबंध ठेवण्याची मान्यता इथवर बघितलं जातं. आजही अनेक ठिकाणी सामाजिक मान्यतेसाठी लग्न केले जाते. कारण लग्नाशिवाय शारीरिक संबंध हे निदान समजात वाईट अथवा पाप किंवा त्यांच्याकडे चांगल्या नजरेने बघितल जात नाही. ह्याच्या वाईट टोकाला त्यात असलेली स्त्री नेहमीच बांधलेली असते. क्वचीत वेळेला पुरुष हि त्यात येतो पण अश्या घटना कमीच आहेत.

लग्न होऊन एका नवीन संसाराची सुरवात करताना त्या दोन व्यक्ती अनकेदा अनोळखी असतात तर बऱ्याचदा ओळखीच्याही असतात. एकमेकांची आवड निवड माहित असते किंवा कळत जाते तर कधी सगळेच नवीन असते. पण ह्या सगळ्यात आपल्याला मिळालेली सामाजिक मान्यता हा आपला अधिकार आहे अस बऱ्याच पुरुषांना वाटत असते. लग्न होऊन आपल्या सोबत असलेली स्त्री आता त्याला आपला मालकी हक्क वाटू लागते. कारण आता समाजाने स्वीकारल्यावर मी तिला कसाही वागवू शकतो हा माज, गर्व अनेक पुरुषांना असतो किंवा आजही आहे. अगदी प्रगल्भ आणि उच्चविद्याविभूषित संस्कारी संसारात पण हा समज दिसून येतो.

आधी विचारून किंवा न झालेली शारीरिक जवळीक आता अधिकार वाटू लागतो. मग सुरु होतो तो सर्टिफाइड बलात्कार. स्त्री ची इच्छा असो वा नसो पुरुषाची इच्छा झाल्यावर त्याची तृप्ती करणं किंवा ती भागवणं हे स्त्री ला क्रमप्राप्त ठरते. ते जर ती करू शकली नाही तर ती जोडीदार असण्याच्या लायकीची नाही असे समाज समजतो. किंबहुना लग्न होणाऱ्या अनेक स्त्रियांना त्या आधीच त्यांच्या आई वडील आणि कुटुंबाकडून तुझ्या नवऱ्याला सुखी ठेवण हेच तुझ परम कर्तव्य आहे असे निक्षून सांगितल जाते. पुरुषाला मात्र असं काही सांगितल जात नाही. त्याला फक्त आता तु बिनधास्तपणे स्त्री ला वापरू शकतो हा विश्वास दिला जातो.

अनेकदा हा अधिकार इतक्या स्तराला जातो कि आपण त्याच्या जोरावर माणुसकीला काळिमा फासतो आहोत ह्याचंही भान रहात नाही. दारू पिऊन, मारझोड करून शारीरिक संबंध अनेकदा इच्छा नसताना केल्याची अनेक उदाहरणं चार भितींच्या आत आपली आसवे लपवत असतात. बाहेर सगळ छान सुंदर असताना त्या चार भिंतीच्या आत होणाऱ्या सर्टिफाइड बलात्काराची शिकार ती स्त्री असते. ह्याची तीव्रता कमी अधिक असते. स्त्री च्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध मग अगदी ते नवरा बायकोच्या नात्यात का असेना करणं म्हणजेच सर्टिफाइड बलात्कार. सर्टिफाइड एवढ्यासाठी कारण त्याला लग्नाने दिलेली सामाजिक मान्यता असते पण तो एक बलात्कार आहे हि जाणीव समाज म्हणून पुरुषांनमध्ये बिंबवण्यास आपण कमी पडतो आहोत हे नक्की.

स्त्री ने अश्या अन्यायाला वाचा फोडावी असं अनेकदा सांगण्यात येतं पण ते खरच तितक सोप्प असतं का? मुलांची जबाबदारी, दोन्ही बाजूने सहानभूती हि पुरुषाच्या बाजूने असताना एकटी स्त्री लढणार किती आणि कोणासोबत? कारण त्या काळात जवळ येणारे पण टाळूवरचं लोणी खाण्यासाठी जवळ येतात हे अनेक उदाहरणात दिसून येते. प्रत्येक वेळी अन्यायाची परिसीमा हि वेगळी असू शकते. बायको म्हणून प्रत्येक वेळी नवऱ्याच्या इच्छेचा मान ठेवणं हे जेव्हा अभिप्रेत असते तिकडे तिच्या नाही चा सन्मान करण हे किती पुरुष समजून घेतात. स्त्री आणि पुरुष दोन वेगळी व्यक्तिमत्व असताना जेव्हा एखाद्याची इच्छा होईल तेव्हा दुसऱ्याची होईलच असे नाही. करणे अनेक असतील कधी मानसिक, कधी भावनिक, कधी शारीरिक तर कधी अनेक दिवस, वर्षांची साथ. त्यात आलेला तोचतोचपणा. पण ह्या सगळ्यात तो नकार पचवण्याची किती पुरुषांची मानसिकता असते.

सर्टिफाइड बलात्कार हे वास्तव आज अनेक घरात बघायला मिळते. अर्थात अनेकदा त्या चार भिंतीच्या आतच त्याचं अस्तित्व असतं. चार भिंतीतील गोष्टी बाहेर आणून त्याचा समाजात भोभाटा न करण्याचे संस्कार आपल्यात असल्याने त्या गोष्टी तिकडेच राहतात. त्यामुळे आपण असं काही करत आहोत ह्याची जाणीव कित्येकदा न त्या स्त्री ला असते न त्या पुरुषाला. कारण कळून सुद्धा लग्न ह्या संस्थेने आपल्याला दिलेला हक्क आहे असं पुरुष मानतो तर आपल्या नवऱ्याच्या इच्छा पूर्ण करण हे आपलं कर्तव्य आहे असं स्त्री मानते. मुळातच सेक्स ह्या विषयी उघडपणे न बोलणं तसेच ती काहीतरी घाण गोष्ट आहे ह्या विचारांचा आपला पगडा जोवर कमी होत नाही. तोवर असे सर्टिफाइड बलात्कार अनेक घरात त्या चार भिंतीच्या आत राजरोस सुरूच राहणार.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.


(opens in a new tab)

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय