मनाशी दोस्ती करण्याचे ५ उपाय – प्रेरणादायी विचार

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?

शांत आणि समाधानी मन म्हणजे सुख. आयुष्यात तुम्ही भरपूर पैसा मिळवला, बंगला, गाडी सर्व काही असेल पण मानसिक शांतता नसेल तर …?

या मनाचं सगळं काही अजबच आहे!!! म्हणून तर मनाला उपमा देताना कवी म्हणतात,” मन मनास उमगत नाही…”

“मन के जीते जीत है, मन के हारे हार ….” अशी अनेक गीतं, कथा, कादंबऱ्या, चित्रपट गीतं मन या एकाच विषयाला वाहिलेली आहेत आणि तरीही हे मन मात्र या सर्वांच्या पल्याड भासतं.

मनाशी दोस्ती केली, त्याला समजून घेतलं तर ते सुद्धा समजूतदारपणा दाखवतं.

मनाशी अशीच दोस्ती करण्यासाठी मनाचेTalks खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे हा विशेष लेख !!!

यात सांगितलेले पाच उपाय तुम्ही अंमलात आणा आणि पहा तुमच्या आयुष्यात शांतता, समाधान सहजपणे येईल.

मनाशी दोस्ती करण्याचे कोणते आहेत पाच उपाय?

१) प्राणायाम

मनाची अवस्था श्वासाशी निगडीत आहे. जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केले तर लक्षात येईल की जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा श्वासाची गती वाढलेली असते.

याचप्रमाणे भीती, काळजी, चिंता मनात असेल तर छातीवर दडपण आल्यासारखे वाटते. श्वास घ्यायला त्रास होतो.

म्हणून संकटाच्या वेळी छाती दडपून गेली असं म्हणतात. मग जर योग्य रीतीने श्वास घेण्याची आपण सवय केली तर त्यामुळे भावनिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते.

प्राणायाम या शब्दाचा अर्थ प्राण म्हणजे आपल्या शरीरातील चैतन्यशक्ती आणि आयाम म्हणजे वाढविणे किंवा लांबवणे.

प्राणायाम करताना फक्त श्वास घेणे आणि सोडणे एवढेच अपेक्षित नाही. तर श्वास सजगपणे घेणे. दरक्षणी, प्रत्येक श्वासागणिक आपल्यातील चैतन्य जागृत ठेवणे.

इथे चैतन्य याचा संबंध उत्साह, शांती, समाधान, आनंद यांच्याशी जोडला आहे. कारण जर या गोष्टी नसतील तर मन शांत राहूच शकत नाही.

म्हणून दररोज सकाळी निदान पंधरा मिनिटे प्राणायाम करावा. एक वेगळीच ऊर्जा दिवसभर अनुभवता येईल.

प्राणायाम शास्त्रशुद्ध पद्धतीने करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे योग्य मार्गदर्शन घेऊनच प्राणायाम करावा.

२) योगनिद्रा

ही योगशास्त्रातील एक विशिष्ट क्रिया आहे. शवासना मध्ये शरीर असताना योगनिद्रा केली जाते. जरी निद्रा असे नाव असले तरी ही आंतरीक जागृतीची प्रक्रिया आहे.

शवासना मध्ये पूर्ण शरीर शिथिल करुन योगनिद्रा करावी. आपल्या अवचेतन मनाची ताकद विलक्षण आहे.

सकारात्मक संकल्प करुन आपण ही ताकद अनुभवू शकतो. आणि योगनिद्रेद्वारे असाच संदेश मनाला दिला जातो.

जगभरात यावर संशोधन केले जात आहे. आणि त्याचे निष्कर्ष आश्चर्यकारक आहेत. मनोकायिक आजार, डिप्रेशन, फोबिया, भयगंड, काळजी मुळे झोप न येणे अशा अनेक अवस्थांमध्ये योगनिद्रा हा प्रभावी उपचार ठरतो.

मनाचे सामर्थ्य वाढले की नकारात्मक भावना दूर जातात आणि मन:शांतीचा अनुभव येतो. योगनिद्रा अनुभवी योग शिक्षकांकडून शिकून घ्यावी आणि नित्यनेमाने सकाळी अथवा रात्री साधारणपणे अर्धा तास याची उजळणी करावी.

लवकरच चिडचिड, भांडणे, त्रागा करणे, दोष देणे असे स्वभावदोष कमी होऊ लागतात. प्रगाढ शांतीचा अनुभव येतो.

३) ओंकार

अस्वस्थ मनाला शांत करायचे असेल तर हुकमी उपाय म्हणजे ओंकार !!! ध्यानावस्थेत शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करावे. आणि ओंकाराचे उच्चारण करावे. ओंकार केल्यावर मेंदूमध्ये विशिष्ट प्रकारच्या ध्वनी लहरी उत्पन्न होतात.

या लहरींमुळे मानसिक शांतीचा अनुभव घेता येतो. यावरही जगभरात बरेच संशोधन चालले आहे.

गर्भसंस्कारामध्ये ओंकार जप फार महत्त्वाचा आहे. आईने केलेले ओंकार ध्यान गर्भातील बाळाच्या हालचाली स्थिर, शांत करण्यासाठी उपयोगी आहे.

सोनोग्राफी, ईईजी इत्यादी चाचण्या करून गर्भातील बाळावर तसेच मानवी मेंदू वर होणारे ओंकाराचे परिणाम पडताळून पहाता येतात.

सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी जो पहिला ध्वनी निर्माण झाला तो म्हणजे ओंकार!!!

म्हणून याला प्रणवोच्चार असेही म्हणतात. ओंकाराचा झटपट प्रत्यय घ्यायचा असेल तर व्यवहारात रोजच्या प्रसंगांमध्ये घेता येतो.

इंटरव्ह्यूला जाताना प्रत्यक्ष केबिनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी पाच मिनिटे मनातल्या मनात ओंकार जप करावा. लगेच शांत वाटते.

परिक्षेच्या हॉलमध्ये पेपर हातात येण्यापूर्वी मनातच ओंकार केला तर धडधड, भीती कमी होते. याचप्रमाणे स्टेजवर भाषण देण्यापूर्वी किंवा कोणत्याही ताणाच्या प्रसंगात आपण याची प्रचिती घेऊ शकतो.

नियमित ओंकार करणारी व्यक्ती समाधानी, आत्मविश्वासपूर्ण, शांत, आनंदी दिसते.

४) मंत्रजप

मंत्र या शब्दाचा संस्कृत भाषेतील अर्थ आहे ‘मननात् त्रायते इति मंत्रम्’ म्हणजे मनाला एका ठिकाणी स्थिर करणारा. एकाग्रता वाढविणारा तो मंत्र !!!

साहजिकच मन स्थिर, शांत असेल तर आयुष्य सुखकर होईल. मंत्र हे अनेक आजारांमध्ये पूरक उपचार म्हणून वापरतात.

यात मनाची ताकद वाढविणे हा हेतू असतो. मनाची साथ मिळाली की शरीर उपचारांना अधिक चांगला प्रतिसाद देते.

आपल्या संस्कृतीत मंत्रांचे महत्त्व विशद केले आहे. महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र हे याचे उदाहरण.

याशिवाय योगशास्त्रात शरीरातील सप्तचक्र आणि त्यांचे वेगवेगळे बीज मंत्र सांगितले आहेत. या मंत्रांचा उपयोग नक्कीच होतो पण पूर्ण श्रद्धा ठेवून आणि योग्य प्रकारे उच्चार केला पाहिजे. मंत्र म्हणताना विशिष्ट शब्द, अक्षरे यावर जोर देऊन उच्चार केला की अपेक्षित फायदा होतो.

सुयोग्य, प्रशिक्षित, अनुभवी व्यक्ती किंवा गुरुंचे मार्गदर्शन घेऊन मगच मंत्रजप करावा.

५) प्रार्थना

जगभरातील सर्व धर्म, पंथ , संस्कृती प्रार्थनेचे महत्त्व सांगतात. प्रत्येकाची पद्धत भिन्न असेल पण उद्देश मात्र एकच आहे… मन:शांती!!! प्रार्थना करताना अहंकार गळून पडतो.

मी पणाचा लोप झाला की मन हलके होते. प्रार्थनेमुळे मनात सात्विक भाव जागृत होतात. क्षमा, शांती करुणा यांचा उदय झाला की नकारात्मक भावना कमी होतात.

विनोबा, गांधीजी रोज आपल्या आश्रमात सकाळी आणि सायंकाळी प्रार्थना घेत असत. पूर्वी दिवेलागणीला घराघरांतून परवचा, प्रार्थना केली जायची पण बदलत्या काळानुसार हे सर्व मागे पडले.

घरातील लहानथोरांनी एकत्रित प्रार्थना केली तर ऐक्य भावना वाढीस लागते. मतभेद असले तरी ते टोकाला जायची शक्यता कमी होते.

व्यसनमुक्तीच्या प्रवासात प्रार्थना मानसिक बळ टिकवून ठेवते. प्रार्थनेत हिलींग पॉवर असते. सामुदायिक प्रार्थना सकारात्मक वातावरण निर्माण करते.

तुम्हीही हे पाच उपाय करून मानसिक शांतीचा अनुभव घ्या. यापैकी कोणते उपाय तुम्ही आधीपासून करत आहात हे कमेंट करुन सांगा.

सकारात्मक संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय