गुरु लघु आहाराची चिंता‍ कोणी करु नये…..

aayurved

आतापर्यंत आपण आपण लघु आणि गुरु आहाराचा आयुर्वेदीय संदर्भ आणि गुरु-लघु आहाराची विशेष काळजी कोणी घ्यावी? हे बघितले. तर, गुरु लघु आहाराची चिंता‍ कोणी करु नये ते आता पाहू! म्हणजे अमुक पदार्थ पचायला जडं 🍗🍖नि तमुक हलका🍵 असा विचार कोणी करणे फारसे गरजेचे नाही ते पाहू!

बलिन

शक्ति उपचय युक्त अर्थात बलवान 💪व्यक्ति. उदाः जे कष्ट सहज सहन करु शकतात.
डबल सिट सायकल🚵‍♂🚴‍♀ चालवताना, मैदानी खेळ🏑🏒🏏🤾‍♀ 🏸🥅⚾🏈⚽खेळताना, डोंगर 🧗‍♂🧗‍♀किंवा जिने चढताना ज्यांची लगेच दमछाक होत नाही. सामान शिफ्ट करताना ज्यांचे धाबे दणाणत नाही.

व्यायाम करताना जे दिवसेंदिवस अधिक वजने 🏋उचलू शकतात. प्रवासानंतर 🚎सुध्दा जे लगेच काम करु शकतात-असे व्यक्ति.

खरभक्ष्या

ज्यांना वेळेला काहिहि खाऊन🍔🥗🍦 पचवायची सवय असते!

दिप्ताग्नय

ज्यांचा अग्नि प्रदिप्त😋😋 असतो,म्हणजे ज्यांची भट्टी🔥 वेळिच पेटलेली असते असे व्यक्ति.

कर्मनित्या

जे सतत कोणत्या ना कोणत्या कार्यात व्यस्त🤼‍♀🏂🏋‍♀😋 असतात, आयुष्याला खडे मारत बसणे किंवा केवळ बघ्याची👀 भूमिका घेणे ज्यांच्या धोरणात बसत नाही असे व्यक्ति. जे नित्य व्यायाम ⛹‍♀🚴‍♀🏊‍♀करतात ते ही यातच समाविष्ट होतात.

ऊपरोक्त मंडळी प्रायःसर्व काही पचवण्यास समर्थ असतात, पण म्हणून रोजच अतिरेक करण्याचा परवाना मिळाला असे वागू नये ही विनंती! अन्यथा अग्नि मंद होऊन अजीर्ण होणार हे ठरलेलच! कारण प्रत्येक गोष्टिला ठराविक मर्यादा असतात, हे विसरुन कसं चालेलं!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.