करिअरिस्ट आईचे भावविश्व!!

आई होणे हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव आहे. पण हीच स्त्री नोकरी, व्यवसाय याद्वारे आपल्या करिअरला प्राधान्य देणारी असेल तर आईपणाचा हा आनंद ती निखळ मनाने उपभोगू शकत नाही.

कारण काही दिवसांतच तान्ह्या बाळाला मागे ठेवून तिला ऑफिस गाठायचं असतं. अशावेळी या बाळाच्या गरजा एक आई म्हणून आपण व्यवस्थित पुऱ्या करतोय का?

करिअर की बाळ कोणाला जास्त महत्त्व द्यावं? हे प्रश्न साहजिकच तिच्या मनात येतात. आणि एक प्रकारची भावनिक ओढाताण सुरु होते.

करिअर वुमन ही हळवी, प्रेमळ नसते का? की स्वतःच तयार केलेल्या विचारांच्या चक्रात ती फसलेली असते? आणि या अपराधी भावनेतून बाहेर पडण्यासाठी काय करावे हे सांगणारा हा विशेष लेख.

स्त्री साठी काय महत्वाचे?

जसे आई होणे हा स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे त्याचप्रमाणे आपल्या आवडीचे क्षेत्र निवडणे, त्यात मनाजोगे काम करणे, खूप मेहनत करून प्रगती करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

मूल झाले म्हणजे तिने एवढे कष्ट करून मिळवलेले यश, करिअरचा आनंद, आर्थिक स्वातंत्र्य सोडून द्यावे असा होत नाही. तर या दोन्हींचा योग्य मेळ साधला तर कोणत्याही प्रकारे गिल्ट किंवा अपराधी भावना मनात येणार नाही.

जाणून घेऊया असे काही उपाय ज्यामुळे तुम्ही करिअर आणि बाळ दोन्हींना न्याय देऊ शकता.

सर्वात आधी जाणून घेऊया करिअरिस्ट स्त्रीला कोणत्या प्रसंगात अपराधी वाटू शकते

१. मुलाला पाळणाघरात किंवा घरातच मदतनीस किंवा आई, सासूबाई यांच्याकडे सोपवून नोकरीला जाताना साहजिकच मनात विचार येतो की सततच्या सहवासाने बाळाला माझ्यापेक्षा यांचाच लळा जास्त लागला तर…

२. रात्री उशीरा ऑफिस मधून आल्यावर मुलांच्या आवडीचे जेवण बनवायला वेळ आणि एनर्जी नसते. रोज साधासाच पटकन होणारा स्वयंपाक वाढताना मनात अपराधी वाटतं.

३. मुलांच्या शाळेत त्यांच्या काही महत्त्वाच्या मिटींग किंवा कार्यक्रम पहायला जाणार असाल आणि ऐनवेळच्या महत्त्वाच्या ऑफिस मिटींगमुळे प्लॅन कॅन्सल करावा लागतो तेव्हा मुलाचा नाराज चेहरा डोळ्यासमोर येत रहातो.

४. याउलट मुलांना शाळेत त्यांचा प्रोग्राम बघायला यायचं तुम्ही प्रॉमिस केलंय आणि त्यासाठी ऑफिसमधून लवकर निघायची परवानगी मागताना बॉस काय म्हणतील हा विचार मनात छळत रहातो.

५. तुम्ही मॅटर्निटी लिव्हवर असताना तुमच्या टीम मधील सहकारी अधिक वेळ थांबून तुमच्या टीमचे काम पूर्ण करत होते आणि आता जॉईन झाल्यावर लगेच तुम्हाला बाळाच्या आजारपणासाठी पुन्हा सुटी हवीय.

६. बाळाच्या जन्मानंतर सुटी संपवून तुम्ही ऑफिसला जायला, नव्याने काम करायला उत्सुक आहात पण हा आनंद मोकळेपणाने घरच्या लोकांना दाखवू शकत नाही. कारण ही एवढ्या छोट्या बाळाला सोडून जाताना एवढी खुश कशी? असं ते म्हणतील का हा विचार तुम्हाला अस्वस्थ करतो.

मैत्रिणींनो असे अनेक प्रसंग तुमच्या आयुष्यात आले असतील जेव्हा द्विधा मनस्थिती होते आणि आपण नक्की कशाला प्राधान्य द्यायचे हे कळत नाही. आणि यातूनच गिल्टी फिलींग जन्माला येते.

यावर उपाय काय?

१. सुपरवुमन होण्याचा हट्ट सोडून द्या
कामाच्या ठिकाणी आणि आई म्हणून मी सर्व काही स्वतःच करणार हा हट्ट धरणे चुकीचे आहे. यात तुमची इतकी दमछाक होईल की तुम्ही कोणत्याच एका गोष्टीला न्याय देऊ शकणार नाही.

सर्वाप्रथम स्वतःला सांगा की तुम्ही सुद्धा माणूसच आहात. त्यामुळे लहान सहान चुका तुमच्या कडून होऊ शकतात. सर्व गोष्टी तुम्ही एकट्याने करु शकत नाही. तुमच्या मर्यादा ओळखून त्यानुसार काम करा.

२. मदत मागायला लाजू नका

घरकामासाठी मदतनीस असेल तर अखंड कामाला जुंपून रहाण्याऐवजी तोच वेळ तुम्ही मुलांबरोबर आनंदाने घालवू शकता. तसेच ऑफिसमध्ये सुद्धा आवश्यक तिथे मदतीसाठी विनंती करा. मदत मागणे म्हणजे कमकुवतपणा नाही. इतरांनी केलेल्या मदतीबद्दल वेळोवेळी आभार व्यक्त करा.

३. सपोर्ट सिस्टीम तयार करा

तुमच्या अनुपस्थित तुमची कामे सुरळीत पार पडतील किंवा तुमच्यावरच एकटीवर सर्व कामांचा ताण येणार नाही यासाठी आधीपासूनच नीट योजना करून ठेवणे.

यात घरी नवऱ्याला किंवा घरातील इतर माणसांना थोडा वेळ बाळाला सांभाळायची जबाबदारी देणे. घरकामातही कामे वाटून देणे यामुळे तुम्हाला थोडा वेळ आराम मिळेल याशिवाय कधी कामानिमित्त ऑफीसमध्ये जास्त वेळ थांबावे लागले तरी बाळाला इतर माणसांसोबत रहाण्याची सवय असल्याने अगदीच अडणार नाही.

४. इतरांचे बोलणे जास्त मनावर घेऊ नका

आपल्या समाजात काही चुकीच्या धारणा आहेत. त्यापैकी एक म्हणजे आईसाठी बाळ हेच सर्वस्व असले पाहिजे. यावरुन काही माणसे तुम्हाला नावं ठेवतील, उपदेश करतील, टोमणे मारतील पण या जगात तुम्ही प्रत्येक व्यक्तीचे मन जिंकू शकत नाही.

तुम्हाला काय महत्वाचे वाटते त्यावर लक्ष द्या. आपली प्रगती, समाधान यात आनंद माना. उगीच वाद घालत बसू नका आणि कुढतही राहू नका.

५. आर्थिक स्वातंत्र्याचे फायदे नीट समजून घ्या

तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असणे हे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास टिकून रहातो. दुर्देवाने काही कठीण परिस्थिती ओढवली तर तुम्ही त्यातून सावरु शकता.

याशिवाय आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असल्याने मोठा मानसिक आधार असतो.

६. करिअरिस्ट असणे म्हणजे स्वतःचा आदर करणे

तुम्ही कष्टाने घेतलेले शिक्षण, तुमची बुद्धिमत्ता यांचा तुम्ही आदर करत आहात. तुम्ही आईच्या भूमिकेत शिरताना हे सर्व विसरून जायची गरज नाही. प्रत्येक सुजाण व्यक्तीला जीवनात प्रगती करण्याचा, मनाप्रमाणे काम करण्याचा हक्क आहे.

प्रसंगानुरूप तुम्ही मुलांच्या संगोपनासाठी करिअर काही काळ बाजूला ठेवू शकता किंवा एखाद्या कमी जबाबदारी असलेल्या पोस्टवर काही काळ काम करु शकता पण हा निर्णय सर्वस्वी तुमचा स्वतःचा असला पाहिजे. कोणत्याही दबावाखाली असा निर्णय घेणे योग्य नाही.

करिअर सोडून उत्तम पालकत्व निभावणे हे सुद्धा महत्वाचे आणि खूप धाडसी असाच निर्णय असतो पण पुढे जाऊन आपण आपल्या हाताने करिअर संपवले असा पश्चात्ताप होऊ न देणे आपल्याच हातात असते.

७. इतरांशी तुलना करु नका

प्रत्येक व्यक्तीची क्षमता, स्वभाव, तिला मिळणारा सपोर्ट, फॅमिली बॅकग्राऊंड वेगवेगळे असते. त्यामुळे इतर व्यक्तींसोबत सतत स्वतःची तुलना करु नका.

नेहमीच वरवर दिसणारी परिस्थिती खरी असेल असंही नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यात कोणतेही निर्णय घेताना इतरांशी तुलना करुन घेऊ नका.

८. टाईम मॅनेजमेंट

घरी आणि ऑफिसमध्ये करायची कामे यांची लिस्ट बनवा. यात आज करायची कामे, आठवड्यानंतर आणि महिन्यानंतर अशी विभागणी करा. म्हणजे काम करताना त्या क्रमाने होईल.

आठवड्याचा मेन्यू तयार ठेवा म्हणजे तुम्ही किचनमध्ये अडकून पडणार नाही. हातासरशी काम उरकून टाका. आपली विश्रांती, छंद यांनाही तुम्ही न्याय देऊ शकाल.

टाईम इज मनी. निरर्थक गोष्टी करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा वेळेची बचत करा आणि हाताशी उरणारा वेळ हा क्वालिटी टाइम म्हणून वापरा.

९. स्वत:ची नीट काळजी घ्या

करिअर आणि बाळ दोन्ही सांभाळताना तुमची दमछाक होणे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे स्वत:ची शारीरिक आणि मानसिक उत्तम प्रकारे काळजी घ्या. खाण्यापिण्याच्या वेळा नीट सांभाळा.

पौष्टीक आहार, पुरेशी विश्रांती, व्यायाम हे सर्व कोणतीही सबब न सांगता केलेच पाहिजे अन्यथा तुम्ही या दोन्ही आघाड्यांवर यशस्वी होऊ शकत नाही.

हे नियम किंवा उपाय जर तुम्ही प्रत्यक्षात आणलेत तर तुमची भावनिक ओढाताण होणार नाही. कोणत्या वेळी कशाला प्रायोरिटी द्यावी हे तुमच्या मनात स्पष्ट असेल.

त्यामुळे आई म्हणून बाळासोबत तुम्ही आनंदाचे क्षण जगू शकता आणि आपल्या करिअर ग्रोथची सुद्धा काळजी घेऊ शकता.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा. लाईक व शेअर करा.

Manachetalks

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय