वृद्धत्व आनंदात घालवायचे पाच उपाय

वृद्धत्व कसं असावं असं तुम्हाला वाटतं? रडकं, हतबल, निराश की ग्रेसफुल, मॅच्युअर, परिपक्व, हसरं आणि समाधानी?

वृद्ध माणसांना जर खरंच आनंदाने जगायचं असेल तर त्यांनी फक्त आपले विचार बदलले पाहिजेत. तुमचं मन नेहमी तोच विचार करत असतं जे तुम्ही मनाला वारंवार सांगता!!!

जर मनाला सांगाल की, मी आता म्हातारा झालो, निरूपयोगी झालो तर खरंच तुम्ही घरातील एक अडगळीची, अडचणीची वस्तू होऊन जाल. आणि कोणालाच तुम्ही हवेहवेसे वाटणार नाही.

जर म्हातारपण एंजॉय करायचं असेल तर हे पाच उपाय करा. हमखास आनंद तुमच्या मुठीत असेल!!!

वृद्धत्व आनंदाने जगण्याचे पाच उपाय?

१. म्हातारपण म्हणजे कंटाळवाणे आयुष्य नाही

बरेच वृद्ध आयुष्याला कंटाळलेले असतात. मरण येत नाही म्हणून नाईलाजाने जगतात. अशी माणसे ना स्वतः आनंदी रहातात, ना इतरांना सुखाने जगू देतात. ह्यांच्या कुटुंबातील लोक सुद्धा यांचे सततचे रडगाणे ऐकून वैतागून जातात. मग सगळेच यांना टाळतात.

फॅमिली फंक्शन, गेट टुगेदर इथे यांना कोणी बोलावत नाही. कारण बोलण्यातून नकारात्मकता ओसंडत असेल तर आनंदाच्या क्षणांना कोण गालबोट लावून घेईल? मग ही माणसे अजूनच एकटी आणि निराश होतात. म्हणून कंटाळा या गोष्टीला तुमच्या आयुष्यात थाराच देऊ नका.

सतत कार्यरत रहा. रिटायरमेंट नंतर आता फक्त आराम असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हाच आळस चोरपावलांनी तुमच्या आयुष्यात प्रवेश करतो हे लक्षात घ्या. रिटायर झालात ते नोकरी किंवा धंद्यामधून, आयुष्यातून रिटायर होऊन जाऊ नका.

नियमितपणे बाहेर पडा, व्यायाम करा. घरच्या लोकांना मदत करा. उपयुक्त छंद किंवा वाचन यात मन रमवा. करण्यासारखे खूप काही अजून बाकी आहे आणि मी आयुष्यात ते करणार आहे असे मनाला दररोज सांगा. मग तुमचे मन तुम्हाला म्हातारे होऊ देणार नाही.

२. अट्टाहास कमी करा

असं म्हणतात ना, की म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण!! साठी बुद्धी नाठी!!!

म्हणजे या वयानंतर माणसाच्या स्वभावातील ॲडजेस्ट करण्याची कुवत हळूहळू कमी होते. राग लवकर येतो. उदास वाटते. याला अनेक घटक कारणीभूत आहेत.

जसजसे शरीर थकते तसे मन देखील थकून जाते. याशिवाय आतापर्यंत कर्तेपणा मिरवलेला असतो. आता नकळतपणे कुटुंबातील नव्या दमाच्या व्यक्तीकडे ही जबाबदारी जाते.

त्यामुळे अहंकार दुखावला जातो आणि माणूस तर्कटी स्वभावाचा होतो. लहान सहान गोष्टींमध्ये खेकसणे, अडून बसणे, जेवणा खाण्यात हेच पाहिजे, तेच नको अशी माणसं मग इतरांना नकोशी वाटतात.

यांच्याशी न बोलण्यातच शहाणपण असं समजून संवाद हळूहळू कमी होतो व काही काळाने बंद होतो. म्हणून हटवादी होऊ नका. या वयात नाती ताणून तुम्ही काय मिळवणार आहात?

म्हणून थोडे नरमाईचे धोरण ठेवा. याचा अर्थ लाचार व्हा असा अजिबात नाही पण तिरसटपणा आणि स्वाभिमान यातील फरक ओळखा.

३. अपेक्षा कमी करा

पूर्वीच्या काळात वृद्ध झाल्यावर वानप्रस्थाश्रम म्हणजे संसाराचा त्याग करून वनात जाणे अशी पद्धत होती. याचाच अर्थ संसारातील आसक्ती, हव्यास कमी करणे.

आपली मते इतरांवर न लादणे. एका ठराविक वयानंतर विरक्त होणे खूप गरजेचे आहे. म्हणजे घरदार सोडून जंगलात जाणे असा शब्दशः अर्थ नाही तर आपल्या वासना, इच्छा, वृत्ती यांना आळा घालणे. यात अगदी खाण्यापिण्यापासून ते खर्च करणे, बोलणे हे सर्व कमी करावे. अर्थात आवाक्या बाहेरच्या खर्चांची अपेक्षा करू नये.

निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन करण्याची कारणे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन कसे करावे हे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मोजकाच पण सकस, ताजा आहार घ्यावा, जास्तीत जास्त बचत कशी होईल हे पहावे, बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. इतरांना फुकटचा सल्ला देणे आवर्जून टाळावे.

कोण काय बोलले, कोणी माझा अपमान केला, काय भेट दिली, गॉसिपिंग, चहाडी करणे, नातवंडांचे भलते लाड करून त्यांच्या आईवडिलांना व्हीलन ठरवणे हे करु नये. यामुळे तुमचा मान राखला जात नाही.

तुमच्या मुलांना त्यांची पालकांची भूमिका त्यांच्या मताप्रमाणे पार पाडू द्या. तुम्ही अंतर्मुख होऊन स्वतःचा आनंद शोधा. वयाच्या या वळणावर असे काहीतरी काम करा की मुलाबाळांना, नातवंडांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे.

समाजकार्यात काही ना काही खारीचा वाटा उचला. आर्थिक मदत शक्य नसेल तर इतर मार्ग आहेत. ते शोधा पण अपेक्षांचा त्याग करा.

कारण जेवढ्या जास्त अपेक्षा तेवढा मोठा अपेक्षाभंग होण्याची शक्यता असते. म्हणून आनंद हवा तर अपेक्षांना टाटा बाय बाय करा !!!

४. परिस्थितिचा स्विकार करा

म्हातारपण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. जन्माला आलेल्या कोणत्याही व्यक्तीला वृद्धत्व टाळता आलेले नाही. त्यामुळे म्हातारपणातील सर्व बदल ग्रेसफुली स्विकारा. हळूहळू सौंदर्य कमी होईल, ताकद कमी होईल, परावलंबित्व सुद्धा येऊ शकते पण या गोष्टी अटळ आहेत. आपण फक्त शेवटपर्यंत शरीर चालते फिरते राहील यासाठी प्रयत्न करु शकतो. व्यसनांचा त्याग, साधा आहार, योग्य व्यायाम, नियमितपणे चेक अप ही काळजी घेऊन आनंदात राहीले तर आयुष्य सजा वाटत नाही. काही वेळा मुले परदेशात असल्याने, जोडीदाराचा मृत्यू झाल्याने वृद्ध एकटे पडतात. त्यांनी या परिस्थितीचा संपूर्ण स्विकार करणे खूप गरजेचे आहे.

आपले आयुष्य ही आपली जबाबदारी आहे. आणि शेवटच्या श्वासापर्यंत माझे आयुष्य मी समाधानाने जगले पाहिजे हे स्वतःला सांगावे. अशावेळी एकट्याने कुढत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा वृद्धाश्रमात समवयस्क लोकांच्या सोबतीने जगण्याचा पर्याय निवडता येतो.

५. वास्तववादी व्हा

म्हातारपणी भावनेच्या भरात काही वृद्ध आपले घर, प्रॉपर्टी, बॅंक बॅलन्स सर्व काही मुलांना देऊन टाकतात पण दुर्दैवाने काही वेळा त्यांच्यावर लाचार, बेघर होण्याची वेळ येते. म्हणून तुम्ही कमावलेला पैसा, घर तुम्ही या जगातून जाईपर्यंत दुसऱ्या कुणालाही देऊ नका. अगदी तुमच्या स्वतःच्या मुलांना सुद्धा!!!

याच बद्दल उद्योगपती विजयपथ सिंघानिया यांनी कथन केलेली आपबिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कारण मानहानी आणि अपमानास्पद जीवन मृत्यूपेक्षा भयंकर असते. आपल्या पश्चात पैसे, घर यांचे काय करायचे, कोणत्या मुलाला काय देणार याची चर्चा अगोदरच सर्वांसमक्ष करुन ठेवा. आपल्या जोडीदाराची आपल्या पश्चात हेळसांड होऊ नये याची पुरेपूर काळजी घ्या.

इच्छापत्र, मृत्यूपत्र यांची कायदेशीर बाजू वकिलांकडून जाणून घ्या. त्यांचा सल्ला घेऊन पुढील सर्व तजवीज वेळीच आपल्या हयातीत करून ठेवा. मृत्यूनंतर शक्यतोवर आपल्यामुळे कोणाला कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.

नेत्रदान, देहदान, अवयवदान करणार असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक त्या फॉरमॅलिटीज पूर्ण कराव्यात. म्हातारपणी आजारपण आणि हॉस्पिटलचा खर्च लक्षात घेऊन पूर्वीपासूनच आरोग्य विमा/ हेल्थ पॉलिसी यात गुंतवणूक करावी म्हणजे म्हातारपणी चिंता सतावत नाही.

झाडावरचे पिकलेले पान जसे वाऱ्यावर अलगद गिरक्या घेत डौलाने खाली येते आणि सहजपणे पुन्हा मातीशी एकरूप होते, तसेच आपले वृद्धत्व असावे.

वयाबरोबर सर्वार्थाने परिपक्व होत जावे आणि मृत्यूची हाक येताच आनंदाने त्याच्या कुशीत कायमची विश्रांती घ्यावी. असे सर्वांना हवेहवेसे जगावे आणि हेवा वाटावा इतके सहज या जगातून निघून जावे.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा. मनातील गोष्टी बोलत रहा. मनाचेTalks लाईक व शेअर करा. स्वस्थ आणि मस्त रहा, आनंदी जीवन जगा!!!

Manachetalks

असेच मनाचेTalks चे विविध लेख तुम्ही ऍमेझॉन किंडल वर जाहिरातींविना वाचू शकाल.

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.

  • अस्थिर मनाला शांत करणारी ही आहेत १५ जादूई वाक्यं!!!
  • तणावाखाली असतानाही मानसिक ताकद टिकवून ठेवणाऱ्या पाच सवयी.
  • निराशेतच दडलाय ध्येय गाठण्याचा मार्ग!!!
  • अडचणीतून मार्ग काढून आयुष्य रुळावर कसं आणावं?
  • मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला शिकवणारे आठ सोपे मार्ग.
  • वाईट विचारांच्या भुताला कसे पळवून लावावे, यासाठीचे तीन नियम!!
  • आयुष्यातील चार कटू सत्य, ‘जी’ स्वीकारली तर तुम्ही एक ‘कणखर व्यक्ती’ बनू शकाल
  • हे तेरा प्र श्नं स्वतःला विचारून स्वतः मधले उत्तम व्हर्जन विकसित करा!
  • तुम्ही भरभरून का जगू शकत नाही? जाणून घ्या कारणे.
  • नीरस आयुष्य सप्तरंगी करण्याचे दहा उपाय.
  • आपला अंतरात्मा काय सांगतो ते ऐका.. या पाच कारणांसाठी.
  • आयुष्याचा आढावा घ्यायचाय? हे चोवीस प्रश्न स्वतः ला विचारा.
  • स्वतःसाठी या दहा गोष्टी करायला कधीच घाबरु नका
  • पॉझिटिव्ह एनर्जी साठी करा हे पाच उपाय!!!
  • मनाशी दोस्ती करण्याचे ५ उपाय.
  • स्वतः वर प्रेम करा, आयुष्य सुंदर भासेल!!!
  • स्वप्नं वास्तवात आणण्यासाठी हे करा…!!!
  • जीवन मूल्य म्हणजे काय? आणि ती जपायची कशी?
  • समाधानी आयुष्याची त्रिसूत्री!!!
  • एक मुक्तपत्र… तुमच्या मनाचे मैत्र!!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय