स्वतःला प्राधान्य देणे म्हणजे स्वार्थ नाही

स्वतःला प्राधान्य देणे म्हणजे स्वार्थ नाही

आपल्या समाजात बहूतेक वेळा स्वतःचा विचार करणारी, स्वतःचे हित जपणारी व्यक्ती ही स्वार्थी ठरवली जाते.

विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत तर हे प्रकर्षाने जाणवते. अगदी पूर्वापार आपल्या मनावर हेच बिंबवले गेले आहे. स्त्री मग ती आई, बहिण, आजी, प्रेयसी कोणीही असो, तिने त्याग मूर्ती असावं अशीच अपेक्षा असते.

लहान सहान गोष्टींमध्ये जरी तिने स्वतःची आवड जपली, इतरांच्या मनाविरुद्ध जरा काही केलं की तिला नावं ठेवायला सगळे मोकळे!!!

पण स्वतःला प्राधान्य देणं आणि स्वार्थी असणं यात फरक आहे. प्रत्येक व्यक्तीला आपले हित जपण्याचा अधिकार आहे.

विशेषत: त्याग या उदात्त नावाआडून कोणी आपल्यावर अन्याय करत असेल, गृहीत धरत असेल किंवा गैरफायदा घेत असेल तर स्वतःसाठी स्टॅण्ड घेतलाच पाहिजे.

मितभाषी, भिडस्त स्वभावाच्या पुरुषांनाही गृहीत धरले जाते. या लेखातून आम्ही काही प्रसंगांचे उदाहरण देऊन तुम्हाला सांगणार आहोत की स्वतःला जपणे हा स्वार्थ नसतो.

समजा तुम्ही एक गृहिणी आहात. सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही घरासाठी राबता. प्रत्येकाची आवड निवड जपता. आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचे दोन तास तुम्ही छंद म्हणून गायन किंवा इतर तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टीसाठी द्यायचे ठरवले तर घरातील इतर सदस्यांनी तुमच्यासाठी हा एवढा वेळ ॲडजेस्ट करणे अपेक्षित आहे. त्यांनी जर आम्हाला तू घरात नसल्यामुळे स्वतः चहा करून घ्यावा लागतो किंवा इतर क्षुल्लक कारणे सांगितली आणि त्यावर तुम्ही ठाम राहून आपले म्हणणे अजिबात मागे घेतले नाही तर तुम्ही स्वार्थी नाही.

जर एखाद्या दिवशी घरात काही आजारपण किंवा गंभीर समस्या असेल तरीही केवळ हट्टापायी तुम्ही आपले दोन तास कोणत्याही परिस्थितीत इतरांसाठी खर्च करत नसाल तर याला स्वार्थ म्हणता येईल.

ऑफिस मध्ये तुम्ही नेहमीच इतरांना शक्य ती सर्व मदत करत असाल, त्यांना सुटीची गरज असेल तर त्याचवेळी तुमची रजेची गरज समंजसपणे थोडी बाजूला ठेवत असाल आणि तुम्हाला एखाद्या प्रसंगात तुमच्या सहकाऱ्यांच्या मदतीची गरज लागली तर त्यांनी मदतीचा हात पुढे केला पाहिजे. जर काही कारणे सांगून ते अंग काढून घेत असतील तर ओळखून जा की सहकारी आपला गैरफायदा घेत आहेत.

अश्यावेळी दर वेळी त्यांच्या मदतीसाठी धावून न जाता तुम्ही हाच वेळ स्वतः ला द्यायचे ठरवले तर तुम्ही स्वार्थी नाही.

कमावत्या स्त्रीने आपली कमाई स्वतःच्या मनाप्रमाणे खर्च करणे हा तिचा हक्क आहे. पण नवऱ्याने किंवा आई वडिलांनी जबरदस्तीने तिला रोखणे, तिच्या एकटीच्या नावाने स्वतंत्रपणे पैसे सेव्ह करण्यावर आक्षेप घेणे हे गैर आहे.

स्वतः मिळवलेले पैसे कसे खर्च करावेत हा त्या व्यक्तीचा प्रश्न आहे.

पण घरी काही निकड असेल आणि तरीसुद्धा मी माझे पैसे देणार नाही असे सांगणे हा स्वार्थीपणा!!!

याचप्रमाणे स्वतः आजारी असताना आराम करणे, उच्च शिक्षण किंवा प्रमोशन स्विकारणे, मूल कधी होऊ द्यावे, किती मुलं असावीत, कोणते कपडे वापरावेत अश्या अनेक बाबतीत स्वतःच्या म्हणण्यावर आग्रही असणे वेगळे आणि दुराग्रही असणे वेगळे.

जेव्हा तुम्ही स्वतः ला प्राधान्य देता त्यावेळी माणूस म्हणून तुम्ही स्वतः चा आदर करता. आपल्या मानसिक, भावनिक गरजा ओळखून त्यावर ठाम असणे आवश्यक आहे. अन्यथा इतर कोणीही तुमचा आदर करणार नाही. सतत इतरांच्या दबावाखाली रहाणे, तडजोड करत जगणे यामुळे उदास वाटते. डिप्रेशन येण्याची शक्यता असते. मनात संताप धुमसत रहाणे, व्यक्त न होणे हे इतर शारीरिक आजारांचे कारण ठरते.

अशा व्यक्ती अहंकारी, बेपर्वा आणि भावनिक दृष्ट्या परिपक्व नसतात. 

आता हा फरक लक्षात घेऊन आग्रही रहा पण दुराग्रही नको. लेख जरूर शेअर करा. लाईक करा कमेंट करा. तुमचे अनुभव आम्हाला लिहून पाठवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!