मेंदूच्या आरोग्याचं रहस्य दडलंय प्रोटीनमध्ये!!! | Healthy brain foods in Marathi

मेंदूच्या आरोग्याचं रहस्य

मानवी मेंदू ही एक रहस्यमय, गुंतागुंतीची रचना आहे.

आपला मेंदू फॅटी ॲसिड्स आणि पाण्यापासून बनला आहे.

कार्यक्षम रहाण्यासाठी मेंदूला ग्लुकोजची गरज भासते.

यातील बरेचसे ग्लुकोज दैनंदिन कामांसाठी खर्च केले जाते. पण मेंदूमध्ये प्रोटीन मात्र अतिशय कमी प्रमाणात आढळते.

साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल की मेंदूला प्रोटीनची गरज आहे का? असली तर कशासाठी? मेंदूच्या आरोग्याचा आणि प्रोटीनचा नेमका काय संबंध आहे?

या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देण्यासाठी आम्ही हा खास लेख घेऊन आलो आहोत.

यातून तुम्हाला प्रोटीनचे योग्य प्रमाण आणि त्याचे महत्त्व याबद्दल वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्वाची माहिती मिळेल.

मेंदूची कार्यक्षमता आणि प्रोटीन यांचा संबंध

मेंदूतून शरीराकडे जे संदेश पाठवले जातात ते न्यूरॉन्समार्फत नियंत्रित केले जातात.

या न्यूरॉन्सपासून बनलेला मार्ग म्हणजे न्यूरोट्रान्समिटर्स.

हा अमायनो ॲसिड पासून बनलेला असतो.

आणि अमायनो ॲसिडचा मुख्य घटक आहे प्रोटीन.

त्यामुळे प्रोटीनचे प्रमाण योग्य नसेल तर मेंदूचे कार्य योग्य रीतीने होऊ शकत नाही.

प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे मेंदूवर होणारे दुष्परिणाम

 1. प्रोटीन्स अभावी मेंदूची कार्यक्षमता बिघडली तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो.
 2. प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे म्हातारपण लवकर येते.
 3. मेंदू लवकर थकून जातो.
 4. ऑटिझम, मुलांमधील संरचनात्मक विकार
 5. फीट्स येणे
 6. अस्वस्थता
 7. नैराश्य
 8. हार्मोन्सचे असंतुलन

योग्य प्रमाणात प्रोटीन्स घेण्याचे फायदे

 1. अल्झायमर होण्याची शक्यता कमी होते.
 2. विस्मरणाचा धोका कमी होतो.
 3. वैचारिक क्षमता वाढते.
 4. प्रोटीन्स योग्य प्रमाणात घेतल्यास लहान मुलांच्या मेंदूची वाढ योग्य तऱ्हेनं होते.
 5. हार्मोन्सची निर्मिती योग्य प्रमाणात होते.
 6. मूड, एनर्जी लेव्हल चांगली रहाते.

यावरून तुमच्या लक्षात येईल की प्रोटीन्सचा संबंध मेंदूच्या कार्यक्षमतेशी किती जवळचा आहे!!!

आता पाहूया प्रोटीन्सचे संतुलन कसे राखावे?

भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असलेला आहार घेतल्याने मेंदूमधील अमायलॉइड बीटाचे प्रमाण कमी होते ज्यामुळे अल्झायमर होण्याची शक्यता खूपच कमी होते.

दररोज आहारात १२०ग्रॅम प्रोटीन असले पाहिजे.

साधारणत: हृदयासाठी लाभदायक असलेले आहार पदार्थ हे मेंदूचे आरोग्य देखील उत्तम ठेवतात.

प्रोटीन युक्त आहारामुळे खूप वेळ पोट भरलेले रहाते. त्यामुळे वारंवार भुकेची जाणीव होत नाही. परिणामी वजन नियंत्रणात रहाते.

शरीरावरील सूज निघून जाते. आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते.

गर्भावस्थेत आणि जन्मानंतर वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत मुलांच्या मेंदूची योग्य वाढ होण्यासाठी आहारात प्रोटीन भरपूर प्रमाणात असले पाहिजे.

शरीरातील हार्मोन्स व एन्झाईम्स प्रोटीन्स पासून तयार होत असल्याने सुद्धा आहार काळजीपूर्वक घ्यावा.

आपला मूड आनंदी असेल तर एनर्जी जाणवते. शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन्सचा पुरवठा झाला नाही तर मेंदूमधील विशिष्ट प्रकारच्या केमिकल अभावी मूड स्विंग, उदास वाटते, भूक लागत नाही आणि ताकद कमी होऊन गळून गेल्यासारखे वाटते.

नैराश्य, अस्वस्थता, मुलांमधील मेंदूच्या वाढीशी संबंधित काही आजार यांचे मूळ आहारातील प्रोटीनशी निगडीत आहे.

आहाराचा मानसिक अवस्थेशी निकटचा संबंध आहे. याचे कारण आपल्या शरीरात विशिष्ट आहार घेतल्याने निर्माण होणारे हार्मोन्स!!!

तुम्ही एक प्रयोग घरीच करुन बघू शकता. जास्त कार्बोहायड्रेट्स युक्त आहार घेतल्यावर तुम्हाला कसे वाटते हे नोंद करुन ठेवा.

झोप येणे, आळस, निरुत्साह अशा भावना जाणवतील. आणि याविरुद्ध जर तुम्ही भरपूर प्रोटीन युक्त पदार्थांचा आहारात समावेश केलात तर तुम्हाला हलकेपणा, उत्साह जाणवेल.

यामागचे कारण म्हणजे कार्बोहायड्रेट्स शरीरात सिरोटोनिनची लेव्हल वाढवते तर प्रोटीन्स मुळे डोपामिनची मात्रा वाढते.

यांचा परिणाम एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहे. त्यामुळे एका आहाराने आळस तर दुसऱ्याने उत्साह वाढतो. म्हणून सजगपणे आहारावर लक्ष दिले पाहिजे.

आहारातील मैदा, साखरेचे प्रमाण नियंत्रित करावे दारु किंवा इतर कोणत्याही स्वरूपात तब्येतीवर घातक परिणाम करणाऱ्या सवयी कमी केल्या तरच संपूर्ण स्वास्थ्य सुधारते.

फक्त आहारातील प्रोटीन वाढवून आरोग्य सुधारणार नाही. यासाठी आपली जीवनशैली चांगली असणे आवश्यक आहे.

प्रोटीन पासून हार्मोन्स बनतात. लिव्हर, किडनी, थायरॉईड, प्रजनन संस्थेचे कार्य नीट चालण्यासाठी हार्मोन्सचे संतुलन चांगले राखले पाहिजे.

ज्या अमायनो ॲसिड मधून हे प्रोटीन तयार होतात ते शरीर स्वतःहून बनवू शकत नाही त्यामुळे आहारातूनच याचा योग्य पुरवठा करावा लागतो.

मेंदूमधील न्यूरोट्रान्समीटर्स सशक्त आणि क्रीयाशील रहाण्यासाठी एन्झाईम्स महत्त्वाचे आहेत.

यांच्याअभावी मेंदूवर प्लाक म्हणजे पांढरे पिवळसर चट्टे तयार होतात व मेंदू हळूहळू अकार्यक्षम होत जातो.

मेंदूच्या आरोग्यासाठी कोणता आहार चांगला?

प्राणीजन्य प्रोटीन पदार्थांमध्ये फॅटस् जास्त प्रमाणात असतात.

पण वनस्पतीजन्य प्रोटीन हे कमी फॅटस् व एन्झाईम्स जास्त असलेले असे असल्याने शरीरासाठी अधिक फायदेशीर आहेत.

सोयाबीन, सुकामेवा, दाणे, विविध वनस्पतींच्या बिया, द्विदल धान्य यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात शिवाय यातील फॅटस् मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात.

रिफाईंड अन्नपदार्थ खाण्याऐवजी फायबर युक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. स्टार्च आणि कोंडा युक्त न चाळलेले धान्य पीठ वापरावे.

चौरस आहार ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे हे लक्षात घेऊन त्यानुसार विविध चवींचा आहारात समावेश करावा.

वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोटीन मधे विविध एन्झाईम्स असतात. म्हणून आठवडाभरात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोटीनचा आहारात अंतर्भाव करावा.

म्हणजे शरीर आपल्या गरजेनुसार त्यातील अमायनो ॲसिड्स वापरते.

मानवी मेंदू हा प्रगल्भ अवयव असून स्वतः ची काळजी कशी घ्यायची हे ज्ञान उपजतच मेंदूला मिळालेले आहे फक्त आपण योग्य त्या आहाराचा नियमितपणे पुरवठा केला की हे कार्य सुरळीतपणे चालू रहाते.

या लेखातून तुम्हाला प्रोटीनचे महत्त्व समजले असेल. आपला आहार सजगपणे निवडा आणि अधिक कार्यक्षम रहा. तुमच्या मेंदूचे तारुण्य टिकून राहिले तर वय वाढले तरी तुम्हाला खऱ्या अर्थाने म्हातारपण येणार नाही!!!

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हे सात उपाय करा

 

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!