पेट्रोल पंपावरच्या फसवणुकीपासून सावधान!!! अशी घ्या काळजी .

पेट्रोल पंपावर फसवणूक? कोणत्या प्रकारे केली जाते? ग्राहक म्हणून आपण कोणती काळजी घ्यावी?
या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही हा खास लेख घेऊन आलो आहोत.
भारतातील दिवसेंदिवस वाढत असलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या संख्येमुळे प्रत्येक पेट्रोल पंपावर तुम्हाला गर्दी दिसत असेल. आपणही बहुतेक वेळा घाईत असल्यामुळे इथे कशी फसवणूक होते याकडे आपलं लक्ष जात नाही.
किंवा कधीकधी संपूर्ण माहिती नसल्यामुळे आपले नुकसान होते. हे टाळण्यासाठी काय करावे ते या लेखातून तुम्हाला समजेल.
पेट्रोल पंपावर तेलाची क्वालिटी योग्य नसणे किंवा कमी प्रमाणात टाकी भरणे असे अनेक प्रकार होतात. पण याच्यामुळे गाडीचे इंजिन खराब होते किंवा मायलेज कमी होते.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत भयंकर वाढ होत आहे. सामान्य माणसाला तर या गोष्टीची इतकी चिंता वाटते की सकाळी उठल्यावर सर्वात आधी तो पेट्रोल आणि डिझेलचे भाव चेक करतो.
त्याचबरोबर पेट्रोल पंपावर होणाऱ्या फसवणूकीचे प्रकार वाढत चालले आहेत. जरा दुर्लक्ष झालं की तुमच्या खिशाला फटका बसलाच म्हणून समजा!!!
पेट्रोल पंपावर येणाऱ्या समस्या
- भेसळयुक्त इंधन
- कमी पेट्रोल भरणे
या समस्येमुळे गाडीचे नुकसान होते. इंजिन खराब झाले तर दुरुस्तीचा खर्च खूपच जास्त येतो. त्यामुळे तुम्ही ग्राहक म्हणून याबाबत जागरूक असणे खूप गरजेचे आहे.
आम्ही तुम्हाला अशा काही युक्त्या सांगणार आहोत की, ज्यामुळे आपण फसवले जात आहोत हे लगेच तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही सावध होऊन तुमचे नुकसान टाळू शकाल.
टाकीमध्ये कमी पेट्रोल भरले हे कसे चेक कराल?
तुम्ही पेट्रोल साठी लाईन मध्ये असताना तुमच्या गाडीच्या टाकीत पेट्रोल भरण्यापूर्वी मशीनचा इंडिकेटर झीरो आकडा दाखवतोय ना याची पूर्ण खात्री करून घ्या.
काही वेळा पंपावरचे कर्मचारी आधीच्या गाडीत इंधन भरल्यावर मशीन झीरोवर न आणताच तसेच पुढच्या गाडीत पेट्रोल भरणे सुरु करतो असं झाल्यास ताबडतोब त्यांना थांबवा आणि ही गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे याची जाणीव करून द्या.
तरीही तुमचे समाधान झाले नसेल किंवा तुम्हाला काही शंका येत असेल तर ५ लिटर टेस्ट करायला सांगा.
याव्यतिरिक्त पेट्रोल भरत असताना मशिनजवळ उभे राहून पेट्रोलचा दर चेक करा, झीरो आकडा स्वतः बघून खात्री करा आणि तिथे तुम्हाला इतर काही संशयास्पद वाटतंय का हे सुद्धा जागरुकपणे पहाण्याची सवय ठेवा.
टाकी अर्धी संपल्यावर पेट्रोल भरा.
आपण दिवसभर कामात एवढे व्यस्त होऊन जातो की गाडी रिझर्व्ह मधे पडली की मगच घाईघाईने पंपावर धाव घेतो. पण असं केल्याने काय नुकसान होतं याची तुम्हाला कल्पना आहे का?
पेट्रोल भरत असताना जर मिटर वारंवार थांबून परत सुरू होत असेल तर तुम्ही सावध होण्याची गरज आहे. अशाप्रकारे इंधन भरले तर पेट्रोल कमी प्रमाणात भरले जाते.
अशी मशीन ज्या पंपावर असेल तिथे गाडी नेऊ नका. अशा दोषयुक्त मशीन मुळे आपल्या गाडीचे नुकसान होऊ शकते.
भेसळयुक्त तेलापासून दूर रहा, फिल्टर तेल वापरा.
पेट्रोल पंपावरील सर्वात मोठी समस्या म्हणजे भेसळयुक्त तेल. यामुळे इंजिनवर वाईट परिणाम होतो. आणि गाडीचे मायलेज कमी होते.
म्हणून जर तुम्हाला भेसळयुक्त तेलाबाबत काही शंका असल्यास पेट्रोलची फिल्टर पेपर टेस्ट करुन घ्या.
काय आहे पेट्रोलची फिल्टर पेपर टेस्ट?
ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी कंझ्यूमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986 अंतर्गत सर्व पेट्रोल पंपावर फिल्टर पेपर टेस्ट ची सुविधा असणे बंधनकारक आहे. ही टेस्ट करण्यासाठी फिल्टर पेपर वर तेलाचे काही थेंब टाकले जातात.
जर पेपरवर तेलाचे डाग पडलेले दिसले तर तेल भेसळयुक्त आहे हे समजते.
अशाप्रकारे आपले हक्क जाणून घेऊन सुजाण आणि सावध ग्राहक म्हणून स्वतः चे नुकसान टाळा.
वाहनाबाबत कोणत्याही प्रकारची फसवणूक हे फक्त आर्थिक नुकसान नसून त्यामुळे आपला जीव सुद्धा धोक्यात येऊ शकतो. म्हणून सावध व्हा आणि सुरक्षित व्यवहार करा.
हा लेख लाईक व शेअर करून महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.
साधे पेट्रोल आणि पॉवर पेट्रोल बद्दल ही माहिती तुम्हाला असलीच पाहिजे
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा