तणावाखाली असतानाही मानसिक ताकद टिकवून ठेवणाऱ्या पाच सवयी.

टेन्शन, ताणतणाव आणि स्ट्रेस आपली मानसिक ताकद दुबळी करतात. कठीण प्रसंगात मानसिक संतुलन हरवते आणि मग आपण चुकीचे निर्णय घेत जातो.

त्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडत जाते. हे एक दुष्टचक्र आहे. पण तुम्ही काही व्यक्ती पाहिल्या असतील की ज्या कितीही टेन्शन असले तरी नीट, विचारपूर्वक वागतात.

शांत डोक्याने निर्णय घेतात. योग्य रितीने संवाद साधतात आणि अडचणीतून मार्ग काढतात.

या लोकांचं वैशिष्ट्य काय असतं? असं कोणतं वेगळेपण त्यांच्यात आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही हा खास लेख घेऊन आलो आहोत.

तर कोणत्याही दडपणाखाली वावरताना आपली मन: शांती कायम ठेवायची असेल तर काही विशिष्ट सवयी तुम्ही लावून घेतल्या पाहिजेत.

या सवयींमुळे तुमची विचार करण्याची दिशा बदलून जाईल. पूर्वी अवघड वाटणारे प्रसंग तुम्ही सहजतेने हाताळू शकाल.

पाहूया अशा पाच सवयी ज्या तुम्हाला ताणतणावाच्या प्रसंगातही विजेता बनवतील.

कोणत्या आहेत या पाच सवयी?

१. नेहमी वर्तमानकाळाचा विचार करा.

भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी, झालेल्या चुका यांचे ओझे घेऊन वावरलात तर जगणे त्रासदायक होईल.

कारण घडून गेलेल्या गोष्टी आपण बदलू शकत नाही.

त्याचप्रमाणे भविष्यात काय वाढून ठेवले आहे या विचाराने जर घाबरून गेलात तर आता हातात काय आहे ते सुद्धा निसटून जाईल.

म्हणून फक्त वर्तमानकाळाचा विचार करा. आज, आता, याक्षणी माझ्या हातात काय आहे? आता करत असलेले काम मी अधिक चांगले कसे करु शकतो? यावर फोकस असेल तर अनावश्यक विचार, भीती, चिंता यापासून सुटका मिळेल.

याशिवाय फक्त आताचा विचार केल्यास तुम्ही अधिक प्रॅक्टिकल होऊन विचार करता. एकावेळी एकच विचार केल्यास एकाग्रता वाढते आणि करत असलेल्या कामांची क्वालिटी सुधारते.

म्हणून नेहमी तणावाखाली असताना आता आपल्या हातात कोणत्या संधी आहेत आणि त्यांचा उपयोग कसा करुन घ्यायचा याचा विचार करण्याची सवय लावा.

२. अनेक पर्याय आणि मार्ग शोधणे व ते प्रत्यक्षात आणणे.

कोणत्याही घटनेकडे पाहण्याचे अनेक पैलू असतात. पण तुम्ही फक्त हे किंवा ते असा सरधोपट विचार करत असाल तर मार्ग सापडणे कठीण आहे.

पण हेच जेव्हा तुमची मानसिकता लवचिक असते तेव्हा अनेक पर्याय तुमच्यासमोर खुले होतात आणि अडचणीतून मार्ग सापडतो.

म्हणून मनाची ताकद वाढविण्यासाठी चाकोरीबद्ध विचार करणे सोडून नवनवीन कल्पनांचा विचार करा.

३. सारासार विचार करा

जेव्हा आपण एखाद्या गुंतागुंतीच्या प्रसंगात अडकून पडतो तेव्हा आपल्या भावना खूप तीव्र असतात.

त्यामुळे परिस्थिती आहे त्यापेक्षा खूपच अवघड किंवा भयंकर भासते.

म्हणून अशा वेळी शांतपणे दोन पावलं मागे येऊन पहावे.

म्हणजे विचारांच्या चक्रातून बाहेर यावे आणि त्रयस्थपणे परिस्थितीकडे पहावे.

विशेषत: ज्यावेळी संताप, द्वेष, निराशा अशा टोकाच्या भावना आपला ताबा घेतात तेव्हा वास्तवाचा विसर पडतो.

आपण तीव्र भावनां सोबत वहावत जातो आणि कोणतेही पर्याय दिसेनासे होतात.

आणि मग मी यातून बाहेर पडूच शकत नाही अशी मनाची खात्री होते.

म्हणून विवेक बुद्धी वापरून सारासार विचार करण्याची सवय लावा.

४. परिस्थिती जशी आहे तशी स्विकारा.

भूतकाळात घडलेल्या गोष्टी, इतरांच्या भावना, परिस्थितीचा दोष इतरांना देणे, कोणतीही जबाबदारी न घेणे या सर्व गोष्टी करण्यात काहीच अर्थ नाही.

जेव्हा आपण परिस्थितीचा संपूर्ण स्विकार करतो तेव्हाच यात आपली भूमिका काय हे समजते.

प्रॅक्टिकल पद्धतीने विचार केला तर अडचणीच्या प्रसंगाचे नेमकं स्वरुप आपल्या लक्षात येते.

आणि मग त्यातून बाहेर पडण्यासाठी त्या दृष्टीने विचार सुरू होतो. पण यासाठी परिस्थिती जशी आहे तशी स्विकारणे आवश्यक आहे.

५. स्वत:वर विश्वास ठेवा.

तुमचा निर्णय चुकू शकतो किंवा एखाद्या परिस्थिती विषयी तुमचा अंदाज चुकीचा असू शकणे अगदी स्वाभाविक आहे.

पण त्यामुळे आपल्याकडून कधीच चूक होऊ नये म्हणून काहीच न करणे हे योग्य नाही.

तणावाच्या प्रसंगात धीराने वागणारे वेळीच इतरांची मदत घेतात,

परिस्थितीचे नीट मूल्यमापन करतात आणि त्यानुसार पुढची चाल ठरवतात.

जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर अडचणीच्या वेळी तुम्हाला पटकन काही उपाय सुचतील व त्यानुसार निर्णय घेऊन तुम्ही मोकळे व्हाल.

पण जर आत्मविश्वास नसेल तर हे करु की ते अशी संभ्रमाची स्थिती होते व कोणताच मार्ग सुचत नाही.

मग लाचारपणे इतरांच्या मतांवर विसंबून रहाणे किंवा गप्प बसणे व जे होईल ते पहात रहाणे एवढेच हातात उरते.

जरी या पाच सवयी कठीण प्रसंगात तुम्हाला मानसिक बळ देत असल्या तरी प्रत्येक व्यक्तीला यातील कोणती सवय पटेल किंवा रुचेल हे सरसकट ठरवणे शक्य नाही.

आपल्या सर्वांचा मूळ स्वभाव भिन्न असतो व त्याला अनुसरून आपले व्यक्तिमत्व घडत जाते.

पण कोणत्याही अवघड प्रसंगाचा सामना करण्यासाठी त्या घटनेचा संपूर्ण स्विकार, वास्तववादी विचार, आवश्यक ती कृती आवश्यक आहे.

वरील पाच सवयी अभ्यासाने स्वभावात आणता येतात. या सवयी तुमचा आत्मविश्वास वाढवतील, आपल्या निर्णयावर तुम्ही विश्वास ठेवाल आणि वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची क्षमता तुमच्यात येईल.

म्हणून यापुढे कोणत्याही कठीण प्रसंगात यापैकी एक एक सवय अंमलात आणा.

हा अभ्यास करायला कदाचित काही काळ जावा लागेल. पण यामुळे तुम्ही स्वतःच्या आणि इतरांच्या भावना जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकाल.

आणि मानसिक रित्त्या खंबीर होऊन कोणत्याही आव्हानांचा समर्थपणे मुकाबला कराल.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा. लाईक आणि शेअर करून उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.

Manachetalks

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.

 • अस्थिर मनाला शांत करणारी ही आहेत १५ जादूई वाक्यं!!!
 • तणावाखाली असतानाही मानसिक ताकद टिकवून ठेवणाऱ्या पाच सवयी.
 • निराशेतच दडलाय ध्येय गाठण्याचा मार्ग!!!
 • अडचणीतून मार्ग काढून आयुष्य रुळावर कसं आणावं?
 • मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला शिकवणारे आठ सोपे मार्ग.
 • वाईट विचारांच्या भुताला कसे पळवून लावावे, यासाठीचे तीन नियम!!
 • आयुष्यातील चार कटू सत्य, ‘जी’ स्वीकारली तर तुम्ही एक ‘कणखर व्यक्ती’ बनू शकाल
 • हे तेरा प्र श्नं स्वतःला विचारून स्वतः मधले उत्तम व्हर्जन विकसित करा!
 • तुम्ही भरभरून का जगू शकत नाही? जाणून घ्या कारणे.
 • नीरस आयुष्य सप्तरंगी करण्याचे दहा उपाय.
 • आपला अंतरात्मा काय सांगतो ते ऐका.. या पाच कारणांसाठी.
 • आयुष्याचा आढावा घ्यायचाय? हे चोवीस प्रश्न स्वतः ला विचारा.
 • स्वतःसाठी या दहा गोष्टी करायला कधीच घाबरु नका
 • पॉझिटिव्ह एनर्जी साठी करा हे पाच उपाय!!!
 • मनाशी दोस्ती करण्याचे ५ उपाय.
 • स्वतः वर प्रेम करा, आयुष्य सुंदर भासेल!!!
 • स्वप्नं वास्तवात आणण्यासाठी हे करा…!!!
 • जीवन मूल्य म्हणजे काय? आणि ती जपायची कशी?
 • समाधानी आयुष्याची त्रिसूत्री!!!
 • एक मुक्तपत्र… तुमच्या मनाचे मैत्र!!!

Manachetalks

 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!