स्वतः वर प्रेम करा, आयुष्य सुंदर भासेल!!!

या जगात सर्वात कठीण आहे स्वतःला स्विकारणे. स्वतः मधले दुर्गुण, कमतरता यांच्यासहित स्वतःचा संपूर्ण स्विकार करणे आणि स्वतःवर भरभरून प्रेम करणे. खरंच हे करण्यासाठी खूप धैर्य लागतं. कारण आपण कसे आहोत हे आपल्याला माहीत असतं.

पण प्रामाणिकपणे स्वतः कडे पहाणे गरजेचे आहे. आपल्यातील चांगले गुण ओळखून त्यांचा अभिमान बाळगणे आणि वाईट गोष्टी मनापासून स्विकारल्यामुळे आपली प्रगती होते. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्या सर्वच व्यक्ती आपल्यावर प्रेम करतील असं नाही. पण स्वतःच स्वतःला आवडत असू तर इतरांनी मला आपले म्हटलेच पाहिजे ही अपेक्षा उरतच नाही.

या लेखातून आम्ही तुम्हाला स्वतः वर प्रेम का केले पाहिजे ते सांगणार आहोत.

काही वेळा आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की आपण स्वतःचा द्वेष करु लागतो. आपणच आपल्याला अपराधी ठरवतो. आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो. आणि कठोर शिक्षा देऊन स्वतःचा छळ करत रहातो.

आपण स्वतः वर प्रेम करणं म्हणजे नेमकं काय याचा विचार करुया.

स्वतःवरचं प्रेम असं शोधून सापडत नाही. ते आपल्या आतमध्ये असतंच. फक्त आपण स्वतःभोवती उभारलेल्या खंत, भीती, लाज या भिंतीमध्ये ते बंदिस्त झालेलं असतं. या भावना नाहीशा झाल्या की आपण स्वतःलाच आवडू लागतो. जसे आहोत तसे आवडतो आणि हेच आहे स्वतःच्या प्रेमात पडणे !!!

आणि मगच तुम्ही इतरांचा संपूर्ण स्विकार करु शकता. तुमचे वागणे जास्त समंजस, दयाळू होते. माणूस म्हटले की गुण आहेत तिथे वाईट सवयी पण असणारच ही जाणीव विकसित होते.

स्वतःवर प्रेम करायला शिकावं लागतं. कारण माणसाचा गुण असतो पहिल्यांदा कोणत्याही गोष्टीमधे काय कमी आहे हे शोधणे!!!

स्वतःवरचं प्रेम वाढविण्यासाठी करा या गोष्टी

१. तुमच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडतात?

स्वतःचं प्रामाणिकपणे परिक्षण करा. इतरांनी केलेली फसवणूक, अपमान, निराशा यांचा परिणाम आपल्यावर होत असतो. आणि त्यामुळे कुठेतरी आपला मूळचा स्वभाव हरवतो. जगाकडून जी वाईट वागणूक आपल्याला मिळालेली असते, ती इतरांशी वागताना परतफेड म्हणून आपण देतोय का?

याचा विचार केला पाहिजे. आणि प्रेम, आदर, समजूतदारपणा यांची निवड केली पाहिजे. ज्या गोष्टी तुमच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात, त्याच तुम्ही इतरांना देऊ शकता. म्हणून स्वतःवर मनापासून प्रेम करत असाल तर तुमच्या वागण्यात ते दिसून येते.

२. जसे आहात तसे स्वतःला स्विकारा

परफेक्ट असं या जगात काहीही नाही. त्यामुळे मी जसा आहे तसा माझा स्विकार करतो हे मनाला सांगा. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे मन शांत होते आणि स्वतःचे खरेखुरे स्वरूप ओळखता येते. माझं आयुष्य असंच असलं पाहिजे हा हट्ट न बाळगता जे आयुष्य मला मिळालेले आहे ते मी चांगल्या पद्धतीने जगणार आहे असा विचार करा.

३. इतरांचे मन जिंकण्याचा अट्टाहास सोडून द्या

सतत इतरांनी मला चांगले म्हणावे म्हणून मनाविरुद्ध वागण्यात काही अर्थ नाही. तुमचे आयुष्य तुमच्या मनाप्रमाणे जगा. प्रत्येक वेळी इतरांची परवानगी मिळवणे किंवा त्यांची मर्जी सांभाळणे शक्य नसते. अशी तडजोड करत राहिल्यास तुम्ही आनंदाचे जगूच शकत नाही.

४. सतत टीका करणाऱ्या व्यक्तींपासून दूर रहा

जे तुमच्यावर प्रेम करत नाहीत, तुमची काळजी करत नाहीत अशांसोबत रहाणं म्हणजे निराशा पदरी पाडून घेणं. अशा व्यक्तींसोबत नातं असण्यापेक्षा एकटं राहिलेलं जास्त चांगलं!!! म्हणून स्वतःची किंमत करायला शिका.

तुमच्या सहवासातील माणसे ही प्रेरणा देणारी, आदर दाखविणारी असली पाहिजेत. म्हणून मोजकीच पण खरीखुरी नाती जोडा!!!

५. स्वत:चा भूतकाळ विसरा

भूतकाळात झालेल्या चुका, अपराध यांचे ओझे घेऊन जगू नका. या चुका सुधारण्याचा अवश्य प्रयत्न करा. भूतकाळातील तुमचे चुकीचे वागणे तुम्हाला एक व्यक्ती म्हणून वाईट ठरवत नाही. कदाचित त्यावेळी, त्या परिस्थितीत तुम्ही चुकीचा निर्णय घेतला असेल. चुकीची व्यक्ती निवडली असेल पण त्यामुळे माणूस म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. म्हणून स्वतःला क्षमा करा आणि आयुष्यात पुढे वाटचाल करा.

६. आवश्यक ते बदल करायला घाबरु नका

तुमची एनर्जी शोषून घेणारी परिस्थिती, माणसे यांच्यापासून लांब जा. भलेही यापूर्वी तुम्ही त्यांच्याशी जुळवून घेतलेही असेल. पण आज काय परिस्थिती आहे? कोणते बदल करणे गरजेचे आहे? हे स्वतः ला विचारा.

तुम्हाला आनंद आणि समाधान देणाऱ्या गोष्टी करा.

७. ज्या चुका तुम्ही केलेल्या नाहीत, त्या करुन बघा

याचाच अर्थ नवीन संधी आल्या तर त्यांचा स्विकार करा. आयुष्यात प्रगती करायची असेल तर नवीन वाटेवर चालले पाहिजे. या मार्गावर कदाचित तुम्हाला अपयश येईल. पण सर्व प्रकारचे अनुभव घेतले तरच माणूस म्हणून तुमची समज वाढेल.

८. कृतज्ञता बाळगा

तुम्हाला आयुष्यात जे काही मिळाले आहे त्याबद्दल आभार माना. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होणार नाही. पण त्यामुळे होणारे दु:ख, अपेक्षाभंग आणि त्रास यांचा एक प्रेरणा म्हणून उपयोग करा. प्रत्येक वाईट प्रसंगातून पुढे जाण्यासाठी चांगल्या बाजूवर फोकस ठेवा. ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत म्हणून तुम्ही तक्रार करताय, त्यावेळी जरा आजूबाजूला पहा. तुमच्यापेक्षा वाईट परिस्थितीत जगणारी कित्येक माणसे दिसतील.

९. रोज स्वतःला आनंद होईल अशी एक तरी गोष्ट करा

स्वतः चे छंद किंवा स्वतःची काळजी घेणे अशा गोष्टी केल्याने आपण स्वार्थी होत नसतो. रोज स्वतःचे आयुष्य अधिक चांगले होईल अशी एक तरी गोष्ट करा. भलेही ती कितीही छोटी का असेना. पण त्यामुळे तुम्ही आनंदी रहाल. जर स्वतःच्या जीवनात तुम्ही आनंदी असाल तरच इतरांना सुखात ठेवू शकता.

१०. स्वत:ला नव्याने संधी द्या

नवीन गोष्टी शिकणे, व्यवसाय, नोकरी याठिकाणी नवीन संधी घेण्यासाठी स्वतः ला सिद्ध करा. आपलं चुकलं तर काय होईल? या भीतीपोटी स्वतःची प्रगती थांबवू नका.

११. स्वत:चा आतला आवाज ऐका

प्रत्येक माणसाचा अंतरात्मा त्याच्याशी संवाद साधत असतो. आपल्याला नेमकं काय हवंय हे स्वतःला चांगलं माहीत असतं. म्हणून आत्मविश्वासाने पुढे जा.

ज्या गोष्टी करण्यात तुमचे मन रमत नाही त्या कामात तुम्ही आनंदी रहाणार नाही आणि इतरांना सुद्धा न्याय देऊ शकणार नाही.

१२. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा

तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर कोणतेही काम अशक्य नाही. स्वत:च्या क्षमता ओळखून त्यावर विश्वास ठेवा.

१३. स्वत:चे भवितव्य घडवा

इतर लोकांच्या प्रेरणादायी गोष्टी वाचणे, सुविचार ऐकणे हे एका ठराविक मर्यादेपलीकडे काही उपयोगाचे नाही. तर आपण कष्ट करणे गरजेचे आहे. सोशल मिडीया वरील भुलथापांना बळी पडू नका. बहुतेक वेळा त्यात काही तथ्य नसते. म्हणून इतरांशी तुलना करणे सोडून द्यावे.

१४. सजगपणे जगा

आपल्या आजूबाजूला अनेक संधी उपलब्ध असतात. पण आपण त्यांचा लाभ घेऊ शकत नाही. कारण आपण साचेबद्ध जीवन जगतो. त्याऐवजी जर तुम्ही जागरूक असाल तर आसपास काय घडामोडी चालू आहेत हे समजते. बदलत्या काळानुसार कोणती भूमिका घेतली पाहिजे हे समजले की आपली प्रगती होते.

१५. आयुष्य गंभीरपणे जगू नका

विनोद बुद्धी वापरून कठीण प्रसंगात सुद्धा मार्ग काढता येतो. जर अती गंभीरपणे जगत असाल तर हरघडी निराशा, चिंता यांना सामोरे जावे लागेल. म्हणून खळखळून हसत जगावे. त्यामुळे अडचणीच्या वेळी सुद्धा धीर येतो आणि आयुष्य म्हणजे एक कठीण परिक्षा वाटत नाही.

१६. इतरांना भरभरून प्रेम द्या

‘लाईफ इज ए सर्कल’ अशी इंग्रजी भाषेत म्हण आहे. याचा अर्थ तुम्ही इतरांना जे देता, तेच परत फिरुन तुमच्याकडे येते. म्हणून तुम्ही क्षमाशीलता, प्रामाणिकपणा, आदर या गुणांनी परिपूर्ण असाल तर तुम्ही इतरांचा स्विकार कराल. पण यासाठी सर्वप्रथम हे प्रेम आणि आदर तुम्ही स्वतःला दिले पाहिजे. म्हणूनच स्वतः वर भरभरून प्रेम करा.

‘जब वी मेट’ मधली करिनाने साकारलेली गीत तुम्हाला आठवते का? “मैं अपनी खुद की बडी फेवरेट हूॅ” हा तिचा प्रसिद्ध डायलॉग म्हणजेच स्वतःवरच्या प्रेमाचे उत्कृष्ट उदाहरण!!!

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा. लाईक व शेअर करून उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय